Topic icon

बुद्धीबळ

0

एन पासंट हा बुद्धिबळातील एक विशेष नियम आहे.

जेव्हा प्यादे त्याच्या सुरुवातीच्या स्थानावरून दोन घरे पुढे सरळ चालते, तेव्हा ते प्रतिस्पर्धी प्याद्याला 'एन पासंट' नियमानुसार मारण्याची संधी देते.

उदाहरणार्थ: समजा पांढऱ्या खेळाडूचे प्यादे पाचव्या रांगेत आहे आणि काळ्या खेळाडूचे प्यादे त्याच्या सुरुवातीच्या स्थानावरून दोन घरे सरळ चालले, तर पांढरा खेळाडू ते प्यादे जणू काही ते एक घरच पुढे आले आहे, असे मानून मारू शकतो.

हा नियम फक्त प्याद्यांसाठी आहे आणि तो त्याच चालीत वापरला गेला पाहिजे, अन्यथा तो हक्क नाहीसा होतो.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5280
5
उत्तर याआधी मी दिले आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
उत्तर लिहिले · 7/2/2019
कर्म · 35170
24
तुझ्यासारख्या च्या एक दोन थोबाडीत ठेवून देवा असं वाटतं


तू एवढा मोठा घोडा झाला तुला अजून पर्यंत माहित नाही घोडा कसा चालतो
अशा कोणत्या दुनियेत राहतो रे तू

तबडक तबडक अशा आवाजात घोडा चालतो

भारत माता इसे कुछ नही आता

घोडा कोणता चार पाय वाला का चेस मधला
उत्तर लिहिले · 20/10/2018
कर्म · 14865
8
बुद्धीबळ हा मूळ भारतीय खेळ असून,
प्राचीन काळी तो ‘चतुरंग’ या नावाने
ओळखला जात असे. हा खेळ प्राचीन काळी
भारतातच सुरू झाला, हे आता निर्विवादपणे
सिद्ध झाले आहे. ‘रॉयल एशियाटिक
सोसायटी’चे अध्यक्ष सर विल्यम जोन्स,
ऑक्सफर्डचे टॉमस हाइड तसेच मरी, स्टॉन्टन इ.
अनेक संशोधकांनी बुद्धिबळाचा उगम
भारतातच झाला असल्याचे दाखवून दिले आहे.
सिंहासन बत्तिशी मध्ये व काही पुराणांतही
या खेळाचे उल्लेख सापडतात. इ.स. पाचव्या
शतकापासून या खेळाचे निश्चित उल्लेख
सापडतात. भारतातून हा खेळ इराण,
अरबस्तानमार्गे यूरोपमध्ये तसेच काश्मीरमार्गे
चीनमध्ये जाऊन तेथून कोरिया, जपान इ.
ठिकाणी प्रसृत झाला असावा. रशियात तो
तिबेट, पर्शियामार्गे गेला असण्याचा संभव
आहे. पर्शियन ‘छतरंग’, अरबी ‘शतरंज’, मलायी
‘छतोर’ मंगोल ‘शतर’ चिनी ‘सियांकी; इ. मूळ
संस्कृत चतुरंगाचीच विविध रूपे होत.
भारतात इ.स. पाचव्या व सहाव्या शतकांच्या
सुमारास चतुरंग खेळला जात होता. भारतीय
युद्धातील रथ, हत्ती, घोडे, व पायदळ या
चतुरंग सेनेवरून या खेळाला हे नाव पडले. चतुरंग
केव्हा सुरू झाला असावा, याविषयी अनेक मते
आढळतात.तो इ.स. पू. चार हजार वर्षांपूर्वी
सुरू झाला असावा, असे काही विद्वानांचे
मत आहे. कार्नामक-इ-आर्तखत्री या पेहलवी
भाषेतील ग्रंथात इ.स. ५५० च्या सुमाराला
चतुरंग हा खेळ इराणमध्ये प्रचलित असल्याचा
उल्लेख सापडतो.
हारून-अल्-रशीद बादशहाचा मुलगा मुसासिक
बिल्ला खलीफ याने रचलेला ‘अल्ली शतरंज’
हा डावही प्रसिद्ध आहे. चतुरंग या खेळाचे
शतरंज हे नाव अद्यापही भारताच्या काही
भागांत प्रचलित आहे.
उत्तर लिहिले · 18/12/2017
कर्म · 11700
6
खूपच छान प्रश्न आहे.मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणे खरच अवघड आहे.पण आजच्या जगात तर्क करणाऱ्या लोकांची गरज आहे.आज पर्यंत 90%लोकांनी पिढ्यान पिढ्या आलेल्या चाली रीती फक्त अनुकरण केल्या पण का हा प्रश्न केला नाही.ज्या 10%लोकांनी केला त्यांना प्रचंड त्रासाला समोर जावा लागलं.पृथ्वी सूर्या भोवती भिरते (शेष नागाच्या डोक्यावर उभा नाही)आम्हाला आता कळाले,पण अजून ग्रहाची स्थिती अजून आमच्या आयुष्यावर कशी परिणाम करते याचा तर्क करण्याचा प्रयत्न दिसत नाही.सांगाच तात्पर्य म्हणजे आपल्याला जो पर्यंत हि गोस्ट अशी का घडते किंवा का आहे हे प्रश्न निर्माण झाल्यावर त्याचे उत्तर मिळविनाचा प्रयत्न करत नाही तो पर्यंत तरी लोकांची मानसिकता बदलणार नाही.त्यासाठी प्रश्नाचे उत्तर शोधा तरच  तर्क बुद्धी वाढेल.न्यूटनला प्रश्न नसता पडला सफरचंद खाली का पडले तर आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्ती नसती समजली.थोडक्यात सांगाच म्हणजे सतत आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी काळजी पूर्वक निरीक्षण करून वैज्ञानिक दृष्टी निर्माण केली तर नक्कीच तर्क बुद्धी वाढेल यात काही शंका नाही.👍
उत्तर लिहिले · 8/8/2017
कर्म · 9895