2 उत्तरे
2
answers
बुद्धिबळ कसे खेळायचे असते?
19
Answer link
बुद्धिबळ एका ८ स्तंभ आणि ८ ओळींच्या चौरसाकृती पटावर खेळला जातो. स्तंभांना इंग्लिश a पासून h पर्यंत तर पंक्तींना १ ते ८ अशी नावे असतात. ६४ चौरसांचे रंग काळे-पांढरे असतात. सोंगट्या एकसारख्या काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन संचात विभागलेल्या असतात. प्रत्येक संचात १६ मोहरे असतात. १ राजा(king), १ वजीर(Queen), २ उंट(Bishop), २ घोडे(knight), २ हत्ती(Rook) आणि ८ प्यादी(pawns).
खेळाडू काळा किंवा पांढरा संच नाणेफेक करून निवडतात किंवा स्पर्धेच्या नियमानुसार कुणी कुठला संच घेऊन खेळायचे ते ठरते. प्रत्येक खेळाडूच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात पांढरा चौरस येईल अशा पद्धतीने पट मांडला जातो. काळ्या संचातील वजीर काळ्या घरात तर पांढरा वजीर पांढऱ्या घरात असतो.
पांढऱ्या सोंगट्यांनी खेळणारा पहिली चाल करतो. नंतर प्रत्येक खेळाडू स्वतःचे मोहरे वापरून एकानंतर एक चाली करतात. मोहरे रिकाम्या घरात किंवा प्रतिस्पर्ध्याच्या मोहऱ्याला मारून त्याच्या घरात ठेवता येतात. मेलेला मोहरा पटाबाहेर काढला जातो.
जर राजाला विरोधी मोहरा एका खेळीत मारू शकत असेल तर राजाला शह मिळाला असे म्हटले जाते. खेळाडू स्वतःच्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल प्रतिस्पर्धी खेळाडूला शक्यतो करू देत नाही. इतके करून जर एखाद्या खेळाडूच्या राजाला शह मिळालाच तर त्या खेळाडूला एका खेळीत शहातून बाहेर काढणारी चाल करावी लागते. जर अशी चाल खेळता येत नसेल तर त्या खेळाडूची हार झाली असे मानले जाते. प्रत्येक खेळाडू दुसऱ्याच्या राजावर मात करून त्याला हरवण्यासाठी चिकाटीने खेळतो. जो पहिल्यांदा यशस्वी होतो तो जिंकला.

0
Answer link
बुद्धिबळ हा दोन खेळाडूंचा खेळ आहे जो 64 घरांच्या पटावर खेळला जातो. प्रत्येक खेळाडू सोळा मोहरे घेऊन खेळायला सुरुवात करतो. खेळाचा उद्देश प्रतिस्पर्ध्याच्या राजाला 'चेकमेट' करणे असतो, म्हणजे त्याला अशा स्थितीत आणणे जेथे तो पकडला जाण्याचा धोका असतो आणि त्याला कुठेही सुरक्षित जाण्याची संधी नसते.
बुद्धिबळातील मोहरे आणि त्यांची चालण्याची पद्धत:
- raja (राजा): राजा कोणत्याही दिशेने एक घर सरळ किंवा तिरके चालू शकतो.
- rani (राणी): राणी कोणत्याही दिशेने कितीही घरे सरळ किंवा तिरकी चालू शकते.
- hathi (हत्ती): हत्ती फक्त सरळ रेषेत कितीही घरे चालू शकतो.
- ghoda (घोडा): घोडा 'L' आकारात चालतो - दोन घरे एका दिशेने आणि एक घर काटकोनात. तो एकमेव मोहरा आहे जो इतर मोहऱ्यांवरून उडी मारू शकतो.
- unth (उंट): उंट फक्त तिरप्या रेषेत कितीही घरे चालू शकतो.
- pyada (प्यादे): प्यादे फक्त समोरच्या दिशेने एक घर चालते, पण पहिल्या चालीत दोन घरे चालू शकते. ते तिरपे चालून प्रतिस्पर्ध्याचा मोहरा मारू शकते.
खेळण्याची मूलभूत तत्त्वे:
- सुरुवातीला पटाच्या मध्यभागी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा.
- आपल्या मोहऱ्यांचा विकास करा आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा.
- आपल्या राजाला सुरक्षित ठेवा.
- प्रतिस्पर्ध्याच्या चालींचा विचार करा आणि त्यानुसार योजना आखा.
बुद्धिबळ हा एक मजेदार आणि बौद्धिक खेळ आहे. नियमित सरावाने तुम्ही यात प्रावीण्य मिळवू शकता.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता: