लोक खालच्या समाजाच्या लोकांशी मतभेद का करतात?
लोक खालच्या समाजाच्या लोकांशी मतभेद का करतात?
भारतात प्राचीन काळी प्रचलित असलेल्या मनुस्मृती ग्रंथाचा प्रभाव हे यामागील कारण आहे. प्राचीन काळी लोकांचे जातीचे वर्गीकरण त्यांच्या कामावरून केले जायचे. जसे लाकडापासून वस्तू करणारा सुतार. भांडी बनविणारा कुंभार. मात्र उत्तर वैदिक काळात काही विशिष्ट उच्च वर्णी असणाऱ्या एका जमातीने स्वतःची धर्मावरची पकड मजबूत करण्यासाठी जात ही कर्मानुसार न करता जन्माधारित केली गेली त्यामुळे कुंभराचा मुलगा कुंभारच ठरला . या मागे हा धार्मिक सत्तेचा इतिहास बराच कारण आहे.
दुसरे आणि महत्वाचे कारण (कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही) स्वातंत्र्यापासून आरक्षण मिळून 70 वर्षे होऊनही आपण जात व्यवस्था संपवू शकलो नाही कारण आपले राज्यकर्ते सामान्य दलित लोकांपेक्षा जास्त फायदा घेतायत. (प्रत्येक जातीने त्यांच्या नेत्यांकडे तटस्थ पणे पहा). आरक्षण हे जरुरी असले तरी ते आज आरक्षण मिळणारे आणि न मिळणारे अशी दोन कास्ट पाडताहेत. *ज्यामुळे आरक्षण न मिळणारे गरीब,मध्यम वर्गातील लोकांचा आरक्षण घेणाऱ्या श्रीमंत लोकांबद्दल आक्रोश आहे व तो तसा खराही आहे*. त्यामुळे सर्व जाती-जमातींनी शिकून समर्थ होऊन आरक्षणाची गरजच संपविणे व पुढच्या पिढीला मजबूत बनविणे ही उच्च -खालची जात हा भेद संपवयला उपयोगी ठरेल.
एक उदाहरण : तुम्ही कधी हे पाहिलंय का जातीने कोणी लहान मोठ, हुशार कमी हुशार,श्रीमंत गरीब आहे?मग तरीही लोक आम्ही या जातीचे म्हणून गरीब किव्हा त्या जातीचे म्हणजे श्रीमंत असे वागतात. आंदोलन करतात.
खालच्या समाजाच्या लोकांशी मतभेद होण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे आहेत:
-
सामाजिक असमानता:
समाजात उच्च आणि निम्न वर्ग निर्माण झाल्यामुळे काही लोकांमध्ये श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते, तर काहींना कमी लेखले जाते.
-
जातिभेद:
जातिव्यवस्थेमुळे काही जातींना उच्च स्थान दिले जाते, तर काही जातींना खालच्या स्तरावर ठेवले जाते. यामुळे लोकांमध्ये मतभेद निर्माण होतात.
-
आर्थिक विषमता:
गरीब आणि श्रीमंत यांच्यातील मोठी दरी सामाजिक असंतोष निर्माण करते.
-
शैक्षणिक मागासलेपण:
शिक्षणाच्या अभावामुळे काही लोक अंधश्रद्धाळू आणि मागासलेले राहतात, त्यामुळे इतरांशी त्यांचे विचार जुळत नाहीत.
-
राजकीय कारणे:
राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी समाजाला विभाजित करतात, ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होते.
-
रूढीवादी विचार:
जुन्या चालीरीती आणि परंपरांमुळे काही लोक नवीन विचार स्वीकारायला तयार नसतात, त्यामुळे मतभेद होतात.