पशुपालन घरगुती उपाय कृषी

गावरान कोंबडी खाद्य (खुराक) घरी कसे तयार करावे?

2 उत्तरे
2 answers

गावरान कोंबडी खाद्य (खुराक) घरी कसे तयार करावे?

6
कोंबडी खाद्यामधील घटक

1) संतुलित कोंबडी खाद्यातील पौष्टिक तत्त्वांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्‌स, चरबी, खनिज पदार्थांचा समावेश असतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे, याचा निश्‍चित आराखडा तयार केला पाहिजे. कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते. कोंबडीच्या खाद्यात वापरावयाचा कच्चा माल कमी खर्चात चांगल्या दर्जाचा मिळेल, याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

2) पोल्ट्री खाद्य तयार करताना किंवा खरेदी करताना काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्‍यक आहे, त्यामुळे कुक्कुटखाद्य ताजे व ओलावा कमी असणे आवश्‍यक आहे. खाद्याची गुणवत्ता व रासायनिक चाचणी प्रयोग शाळेत तपासता येते.

3) खाद्य सूत्र तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत; परंतु हिट अँड ट्रायल पद्धत कुक्कुटखाद्य सूत्र तयार करण्याची सर्वांत सोपी पद्धत आहे. खाद्य सूत्र तयार करताना आपण कोणकोणती धान्ये मिसळून खाद्य तयार करणार आहोत, हे निश्‍चित करावे लागते. त्यानंतर खाद्यामध्ये आवश्‍यक ती पौष्टिक तत्त्वे, प्रमाणानुसार, तसेच प्रोटिन व ऊर्जा निश्‍चित करतात. त्यानंतर कॅल्शिअम, फॉस्फरस, मीठ, सूक्ष्म खनिज मिश्रण, जीवनसत्त्वांचे मिश्रण व औषधांचे मिश्रण निश्‍चित करतात. हे प्रमाण प्रति 100 किंवा 1000 किलोच्या संख्येत निश्‍चित करतात.

4) सर्वप्रथम खाद्यसूत्रात निश्‍चित केलेल्या पदार्थांचे वजन ग्राइंडरमध्ये दळतात. हे खाद्य कोंबड्यांच्या श्रेणीनुसार जाड-बारीक असे तयार करतात. चिक स्टार्टर स्मॅश तयार करावयाचे असेल तर हे खाद्य बारीक असणे आवश्‍यक आहे. मोठ्या कोंबड्यांना थोडे जाडे भरडे खाद्य असावे. सूक्ष्म तत्त्व म्हणजे खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, अमिनो आम्ल व औषधांचे मिश्रण एक किलो मका या प्रमाणात घेतात. हे मिश्रण पाच-सहा किलोपासून तर 100 किलो खाद्याच्या प्रमाणात असावे.

5) वजन केलेले सर्व साहित्य सुमारे सहा मिनिटे मिसळतात, त्यामुळे जीवनसत्त्वे खाद्यात चांगल्या प्रकारे मिसळतात. ज्या कुक्कुटपालकांकडे ग्राइंडर व मिक्‍सर नाही, ते साफ केलेल्या फरशीयुक्त जमिनीवर खाद्यपदार्थ टाकून ते फावड्याने चांगल्या प्रकारे एकजीव होतील असे मिसळतात. हे मिश्रण हातानेही तयार करता येते. याशिवाय व्हिटॅमिन ए, बी-2, डी-3, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्‍स यांचेही योग्य प्रमाण खाद्यात असावे लागते. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने खाद्यनिर्मिती करावी.

 

संपर्क - 02169- 244214 
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महा

उत्तर लिहिले · 5/2/2018
कर्म · 7265
0

गावरान कोंबडी खाद्य (खुराक) घरी तयार करण्याची पद्धत:

गावरान कोंबड्यांसाठी खाद्य तयार करण्यासाठी खालील घटक वापरले जाऊ शकतात. हे घटक वापरून आपण पौष्टिक आणि संतुलित खाद्य तयार करू शकता:

  • मका: 30% (ऊर्जा आणि कार्बोहायड्रेट्सचा स्रोत)
  • गहू/ज्वारी/बाजरी: 20% (ऊर्जा आणि फायबरचा स्रोत)
  • सोयाबीन/शेंगदाणा भरडा: 15% (प्रथिने/प्रोटिनचा स्रोत)
  • डाळी भरडा (तूर, मूग, उडीद): 10% (प्रथिने आणि अमिनो ऍसिडचा स्रोत)
  • तीळ/सूर्यफूल तेल भरडा: 5% (तेल आणि आवश्यक फॅटी ऍसिडचा स्रोत)
  • खनिज मिश्रण (मिनरल मिक्सचर): 2% (कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजांचा स्रोत)
  • मीठ: 1% (सोडियम आणि क्लोराईडचा स्रोत)
  • कळ्ये/कोंबडी खाद्य मिश्रण: 17% (प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे)

खाद्य तयार करण्याची प्रक्रिया:

  1. सर्व घटक व्यवस्थित मिक्स करा.
  2. मिक्स केलेले खाद्य हवाबंद डब्यात साठवा, जेणेकरून ते ताजे राहील.

इतर आवश्यक गोष्टी:

  • कोंबड्यांना स्वच्छ पाणी नियमितपणे द्या.
  • हिरवा चारा द्या, जसे की पालेभाज्या किंवा गवत.
  • कोंबड्यांना नियमितपणे जंतनाशक द्या.

टीप: खाद्यातील घटकांचे प्रमाणadjustआपल्या गरजेनुसार ऍडजस्ट करा आणि आपल्या पशुवैद्यकाचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2360

Related Questions

ट्रॅक्टरमध्ये कमी डिझेल खपत करणारा ट्रॅक्टर कोणता आहे?
फिल्टर तेल कसे तयार केले जाते?
खेड्या गावात कमी खर्चात उत्पन्न जास्त असा कोणता धंदा आहे?
फळा म्हणजे काय असल्यामुळे रोड लागतात?
भारतामध्ये कृषी क्रांती कधी सुरु होईल?
मी वारसाला 1 लाख भरू शकतो, दोन एकर ऊस आहे. 5 वर्षांसाठी किती लोन भेटेल?
एका एकरमध्ये किती कपाशीचे झाडं बसतात?