राजकारण नरेंद्र मोदी अधिकारी व्यवस्थापन अधिकार

पंतप्रधानाची कार्य व अधिकार कोणती आहेत?

2 उत्तरे
2 answers

पंतप्रधानाची कार्य व अधिकार कोणती आहेत?

4
१)मंञिमंडळाच्या संदर्भात-

केंद्रीय मंञीमंडळात ज्या व्यक्तींची शिफारस पंतप्रधानांकडून होते केवळ त्याच मंञ्याची नियुक्ती राष्ट्रपती करू शकतात. मंञ्यांमध्ये खातेवाटप करण्याचे तसेच त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे महत्वपूर्ण कार्य पंतप्रधान करतात. पंतप्रधान एखाद्या मंञ्याला मंञ्याला राजीनामा देण्याचा आदेश देवू शकतात व तो आदेश न पाळला गेल्यास राष्ट्रपतीला त्यासंदर्भात सल्ला देवू शकतात. ते मंञिमंडळांच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. सर्व मंञ्यांच्या कार्यांचे मार्गदर्शन, दिशादर्शन, नियंञण करुन शासनाच्या धोरणामध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी पंतप्रधानाची असते. पंतप्रधानांचा राजीनामा हा सर्व मंञिमंडळाचा राजीनामा समजला जातो.

२)राष्ट्रपतींच्या संदर्भात-

पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंञिमंडळ यांमधील संपर्काचे माध्यम(channel of communication) असतात.  त्यानुसार घटनेच्या कलम ७८ मध्ये पंतप्रधानाची कर्तव्ये सांगण्यात आली आहेत ती म्हणजे १.संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनाशी संबंधित मंञिमंडळाचे सर्व निर्णय व विधिविधानाचे सर्व प्रस्ताव राष्ट्रपतींना कळविणे. २. संघराज्याच्या कारभाराचे प्रशासन व विधिविधानासंबंधित राष्ट्रपती मागतील ती माहिती पुरविणे. ३.ज्या बाबींवर एखाद्या मंञ्याने निर्णय घेतला आहे पण मंञिमंडळाने जिचा विचार केला नाही, अशी कोणतीही बाब, राष्ट्रपतीने आवश्यक केल्यास, मंञिमंडळाच्या विचारार्थ सादर करणे. पंतप्रधान राष्ट्रपतींना भारताचे महान्यायवादी, भारताचे महालेखापाल, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, मुख्य व अन्य निवडणूक आयुक्त, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य.

३)संसदेच्या संदर्भात-

लोकसभेचा नेता या नात्याने पंतप्रधानाचे अधिकार खालीलप्रमाणे

राष्ट्रपतींना संसदेची अधिवेशने बोलावण्यासाठी व स्थगित करण्यासाठी सल्ला देणे.

राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्यासाठी सल्ला देणे.

संसदेत सरकारी धोरणांच्या चर्चेत हस्तक्षेप करून शासनाची बाजू मांडणे.

उत्तर लिहिले · 4/10/2017
कर्म · 22090
0

पंतप्रधानाची कार्ये आणि अधिकार:

भारताच्या संविधानानुसार, पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. खाली त्यांची काही प्रमुख कार्ये आणि अधिकार दिले आहेत:

  1. मंत्रिपरिषदेचे नेतृत्व:

    • पंतप्रधान मंत्रिपरिषदेचे प्रमुख असतात.
    • ते विविध मंत्रालयांचे वाटप करतात.
    • मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवतात आणि त्यांच्यात समन्वय साधतात.
  2. राष्ट्रपतींना सल्ला:

    • पंतप्रधान राष्ट्रपतींना विविध विषयांवर सल्ला देतात.
    • राष्ट्रपती बहुतेक निर्णय पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार घेतात.
  3. धोरण ठरवणे:

    • देशासाठी आवश्यक धोरणे ठरवण्यात पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची असते.
    • ते आपल्या पक्षाच्या विचारानुसार आणि देशाच्या गरजेनुसार धोरणे ठरवतात.
  4. नियुक्ती:

    • उच्च पदांवरील व्यक्तींची नियुक्ती राष्ट्रपती करतात, पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार.
    • उदाहरणार्थ, केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission), केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission) आणि इतर महत्वाच्या संस्थांमधील सदस्यांची निवड.
  5. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व:

    • पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतात.
    • विविध परिषदांमध्ये आणि करारांमध्ये ते भारताची बाजू मांडतात.

अधिक माहितीसाठी, आपण भारताच्या संविधानाचे अध्ययन करू शकता.

स्रोत:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2760

Related Questions

रेशन दुकानांविषयी माहिती अधिकारात देणारी माहिती कोणती आहे?
निस्तार हक्कांचे महत्व स्पष्ट करा?
निस्तार हक्कांचे महत्त्व स्पष्ट करा?
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाचे अधिकार काय आहेत?
ग्राहकांची हक्क व कर्तव्ये सांगा आणि त्यांची उदाहरणे थोडक्यात स्पष्ट करा?
हक्क म्हणजे काय? नैसर्गिक हक्क, नैतिक हक्क आणि कायदेशीर हक्क या संकल्पना स्पष्ट करा.
कमिशनरचा मराठी अर्थ काय आहे?