ब्रम्हांड संशोधन भूगोल अंतराळवीर खगोलशास्त्र खगोलीय पिंड

प्लूटो या ग्रहाला ग्रहांच्या यादीतून काढले आहे त्याचे कारण काय आहे?

2 उत्तरे
2 answers

प्लूटो या ग्रहाला ग्रहांच्या यादीतून काढले आहे त्याचे कारण काय आहे?

5
प्लूटो

शोधक : क्लाईड टॉमबॉघ
शोधाचा दिनांक : फेब्रुवारी १८,१९३०

२१व्या शतकाच्या सुरुवातीला प्लूटोसारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागला. यातील नोंद घेण्याप्रत वस्तू म्हणजे विखुरलेल्या चकती मधील एरिस, ज्याचे वस्तुमान प्लूटोपेक्षा २७% जास्त आहे.ऑगस्ट २४,२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना(आय.ए.यू.)ने सर्वप्रथम ग्रहाची व्याख्या केली. या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्याचे वर्गीकरण एरिस व सेरेस सोबत बटु ग्रह या नवीन वर्गात करण्यात आले.या वर्गीकरणानंतर प्लूटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला १३४३४० हा क्रमांक देण्यात आला.मात्र अनेक शास्त्रज्ञांच्या मते प्लूटोला परत ग्रहांच्या वर्गात टाकण्यात यावे.

अपसूर्य बिंदू : ७,३७,५९,२७,९३१ कि.मी.
४९.३०५०३२८७ खगोलीय एकक

उपसूर्य बिंदु : ४,४३,६८,२४,६१३ कि.मी.२९.६५८३४०६७ खगोलीय एकक

अर्धदीर्घ अक्ष:५,९०,६३,७६,२७२ कि.मी.३९.४८१६८६७७खगोलीय एकक

वक्रता निर्देशांक:०.२४८८०७६६

परिभ्रमण काळ:९०,६१३.३०५ दिवस २४८.०९ वर्ष

सिनॉडिक परिभ्रमण काळ:३६६.७३ दिवस

सरासरीकक्षीय वेग : ४.६६६ कि.मी./से.

कक्षेचा कल : १७.१४१७५° ११.८८° सूर्याच्या विषुववृत्ताशी

उपग्रह : ३

सरासरी त्रिज्या : १,१९५ कि.मी.पृथ्वीच्या ०.१९ पट

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ : १.७९५ × १०७कि.मी.²पृथ्वीच्या ०.०३३ पट

घनफळ:७.१५ × १०९कि.मी.³पॄथ्वीच्या ०.००६६ पट

मुक्तिवेग : १.२ कि.मी./से.

संरचना : नायट्रोजन मिथेन

कायपरच्या पट्ट्यातील इतर सदस्यांप्रमाणे प्लूटो हा मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला आहे तसेच तुलनेने छोटा आहे (वस्तुमानात पृथ्वीच्या चंद्राच्या अंदाजे एक पंचमांश व आकारमानात त्याच्या अंदाजे एक तृतीयांश). याची भ्रमणकक्षा अती-लंब वर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्या पासून नेपच्यून पेक्षा जवळ येतो.प्लूटो व त्याचा सर्वांत मोठा उपग्रह चेरॉन यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते २०१५ सालच्या जुलै महिन्यात प्लूटोजवळून गेलेल्या NASA च्या न्यू होरायझन्स् (New Horizons) संशोधन यानाच्या निरीक्षणांवरून प्लूटो ला पुन्हा एकदा ग्रहाच्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

प्लूटोचा शोध :
१८४० च्या दशकामध्ये उर्बैन ली व्हेरिये नेन्यूटोनियन गतिशास्त्राच्या (Newtonian mechanics) सहाय्याने युरेनसच्या कक्षेतील उतारचढावांचा अभ्यास करून नेपच्यूनच्या जागेचे भाकित केले होते.नेपच्यूनच्या नंतरच्या निरिक्षणानंतर शास्त्रज्ञांनी असा तर्क केला की युरेनसची कक्षा नेपच्यून शिवाय अजून एका ग्रहामुळे बदलत आहे.
१९०६ मध्ये पर्सिव्हाल लॉवेलने फ्लॅगस्टाफ, अॅरिझोना येथे लॉवेल वेधशाळा स्थापन केली व संभाव्य नववा ग्रह हुडकण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू केला. या ग्रहाला त्याने प्लॅनेट एक्स असे नाव दिले होते.१९०९ पर्यंत लॉवेल व विल्यम हेन्री पिकरींग यांनी या ग्रहासाठी अनेक संभाव्य जागा सूचित केल्या.लॉवेलच्या १९१६मधील मृत्यूपर्यंत हा शोध चालू होता पण हाती काही यश आले नव्हते. पण लॉवेलला माहित नव्हते की त्याच्या नकळत 15 मार्च 1919 ला वेधशाळेने प्लूटोचे दोन अंधुक छायाचित्र घेतले होते.यानंतर १० वर्ष हा शोध थांबला होता. याला कारण होते पर्सिव्हाल लॉवेलची बायको, कॉन्स्टंस लॉवेलने, लॉवेलचा वेधशाळेतील हिस्सा हस्तगत करण्यासाठी दाखल केलेला खटला.१९२९ मध्ये वेधशाळेचे संचालकव्हेस्टो मेलव्हिन स्लिफर यांनी प्लॅनेट एक्सला हुडकण्याची जबाबदारी २३ वर्षाच्या कॅन्सास येथून आलेल्या क्लाईड टॉमबॉघकडे सुपूर्द केली.
टॉमबॉघचे काम होते, दोन आठवड्यांच्या अंतराने काढल्या गेलेल्या दोन छायाचित्रांचे निरीक्षण करणे व त्यामध्ये कोणत्या वस्तूने जागा बदलली आहे का तेपाहणे.ब्लिंक सेपरेटर नावाचे यंत्र वापरून तो दोन चित्रांमध्ये जलदगत्या मागे-पुढे जाऊ शकत असे. यामुळे जर एखादी वस्तू जागा बदलत असेल तर त्याच्या हालचालीचा आभास (illusion) निर्माण होत असे. जवळपास एका वर्षाच्या अथक शोधानंतर फेब्रुवारी १८,१९३० रोजी टॉम बॉघला जानेवारी २३ व जानेवारी २९ च्या चित्रांमध्ये संभाव्य हाललेली वस्तू सापडली.जानेवारी २१ ला काढलेल्या कमी दर्जाच्या अजून एका छायाचित्राने ही हालचाल सिद्ध केली.हे पडताळण्यासाठी वेधशाळेने अजून काही छायाचित्र काढली व त्यानंतर शोधाची बातमी हार्वर्ड कॉलेज वेधशाळेला मार्च १३,१९३० तारखेला पाठविली.
उत्तर लिहिले · 18/9/2017
कर्म · 6670
0

प्लूटोला 2006 मध्ये ग्रहांच्या यादीतून काढण्यात आले, कारण आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने (International Astronomical Union - IAU) ग्रहाची व्याख्या निश्चित केली. त्या व्याख्येनुसार प्लूटो पुरेसा ठरत नाही.

IAU च्या व्याख्येनुसार, ग्रह म्हणजे:

  • एखादी खगोलीय वस्तू जी सूर्याभोवती फिरते.
  • तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिचा आकार जवळजवळ गोलाकार असतो.
  • आणि तिच्या कक्षेत इतर वस्तू नसतात.

प्लूटो पहिल्या दोन अटी पूर्ण करतो, पण तिसरी अट तो पूर्ण करत नाही. प्लूटो ज्या कक्षेतून सूर्याभोवती फिरतो, त्या कक्षेत त्याच्या आकाराच्या अनेक वस्तू आहेत. म्हणूनच प्लूटोला 'बटू ग्रह' (dwarf planet) मानले जाते.

प्लूटो ग्रह नाही, याबद्दल अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

नैसर्गिक क्रिस्टल म्हणजे काय?
धूमकेतू ला इंग्रजीत काय म्हणतात?
नेपच्यून ग्रह आहे का?
प्लुटो ग्रह आहे का?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते थोडक्यात लिहा?
सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
सूर्यग्रहण व चंद्रग्रहण लागणे म्हणजे काय?