5 उत्तरे
5 answers

कर्म म्हणजे काय?

18


एकदा एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता.
फिरतफिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला.
प्रधानाला बोलाऊन म्हणाला, कां कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला ओळखतपण नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे वाटते आहे.

प्रधान बुचकळ्यात पडला तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला.
प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले व तो राजामागे निघाला.

दुस-या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदारा शिवाय कोणीच नव्हते.
आजुबाजुला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले.

तो दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता.
चौकशी करता कळले की लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात.

रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला ब-याचवेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. माल विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील.

प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-याला फाशी कां द्यावे वाटले याचा उलगडा झाला.

व्यापा-याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंगलहरीनी दुषीत वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते.

त्याने त्या दुकानदाराकडे थोडी चंदन खरेदी केली. दुकानदाराला ब-याच दिवसांनी गि-हाईक मिळाल्याने आनंद झाला.

प्रधान निघाला आणि राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला.
त्याने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन ? प्रधानाने त्या व्यापा-याचे नांव सांगितले.
राजा म्हणाला, अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले ! त्या व्यापा-याला कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला.

राजा अध्ये मध्ये इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करु लागला. राजाच्या खरेदीने आनंदित व्यापा-याच्यामनात आता राजा मरावा हे येईनासे झाले.
चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो मित्र झाला.

*आपल्या मनात इतरां विषयी चांगले विचार, दयाळुपणा आणला तर इतरांच्या मनातुनही चांगले विचार चांगल्या भावना आपल्यापर्यन्त येतील.*
*व आपला उत्कर्ष होईल.*

मग कर्म म्हणजे काय ?
अनेकजण म्हणाले, आपले शब्द, आपली कृती, आपली भावना...

पण खरे हेच आहे की,
आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय !!!

ऐक सुंदर लेख वाचनात आलेला..
उत्तर लिहिले · 27/10/2018
कर्म · 115390
6
कर्म काय आहे ?

कर्म हे तुमच्या चांगल्या कामाचा आलेख आहे. तुम्ही लिहिलेले उत्तर जर कुणाला आवडले तर तुमचे कर्म वाढतात. तसेच जर कुणाला तुमचे उत्तर नावडले तर तुमचे कर्म कमी होते.

आपण एक कम्युनिटी आहोत. म्हणून सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते बरे किंवा वाईट ठरवण्याचा देखील अधिकार आहे. जर काही लोक वाईट उत्तरे देत असतील तर त्यांचे उत्तर बाकीचे लोक नावडले मार्क करतील आणि अशा लोकांचे कर्म कमी होईल. अशा लोकांवर काही निर्बंध लादण्यास उत्तर ला सोपे जाईल.

तसेच ज्या लोकांचे कर्म अधिक असेल अशा लोकांचे उत्तरे वाचताना वाचकांना एक प्रकारचा विश्वास देखील राहील.


कर्माचे फळ:

उत्तर च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या व्यवसाय केला जात नाही. म्हणजे हा एक ज्ञान सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दिलेल्या उत्तराने जर एखाद्याला योग्य दिशा सापडणार असेल तर त्याहून अधिक चांगले फळ माझ्यामते तरी दुसरे कुठले असणार नाही

टीप : हे उत्तर उत्तरच्या अधिक्रुत अकाउंट वरून दिलेले आहे.
उत्तर लिहिले · 15/9/2017
कर्म · 80330
0
कर्म म्हणजे काय?

कर्म हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ "कृती", "कार्य" किंवा "कृत्य" असा होतो. कर्म सिद्धांतानुसार, प्रत्येक कृतीचा परिणाम असतो, मग तो चांगला असो वा वाईट. या परिणामांना कर्म म्हणतात.

कर्म सिद्धांताचे काही महत्त्वाचे पैलू:

  • प्रत्येक कृतीचा परिणाम होतो.
  • चांगल्या कृतींचे चांगले परिणाम होतात, तर वाईट कृतींचे वाईट परिणाम होतात.
  • कर्म आपले भविष्य घडवते.
  • कर्म आपल्याला शिकवते आणि विकसित होण्यास मदत करते.

कर्म सिद्धांत हा एक गुंतागुंतीचा विषय आहे, परंतु तो आपल्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करतो.

अधिक माहितीसाठी: विकिपीडिया - कर्म

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1020

Related Questions

माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
गोसावी लागणे म्हणजे काय?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
ब्रह्मचर्य पालन केल्यावर नेमके काय फायदे होतात?
ब्रह्मचर्य पालन म्हणजे नेमके काय करावे?
जो व्यक्ती मनोभावे पूजा करतो, दानधर्म करतो, सरळमार्गी राहतो, भविष्याबद्दल विचार न करता दुसर्‍यांसाठी खिसा रिकामा करतो, तर त्याच्याच वाटेला दुःख आणि अडचणी का येतात?