समाजशास्त्र नियोजन सामाजिक नोंदणी

सामाजिक संस्था किंवा संघटना नोंदणी कशी करायची?

4 उत्तरे
4 answers

सामाजिक संस्था किंवा संघटना नोंदणी कशी करायची?

4
You are here: Home » संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे

संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे

 byejanseva-adminonJuly 7, 2015संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे2016-02-11T12:15:20+00:00

सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.

संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे

१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन

२.नियम व नियमावलीची सत्य प्रत

३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र

४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र

५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र

रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.

६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.

७.समंतीपत्र व हमीपत्र

८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत

९.प्रथम कार्यकारिणीची यादी

१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.

११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.

महत्वाच्या बाबी :-

जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.७,९,११.संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.

पतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.

सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.

नवीन व शहरी / नागरी व ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भागभांडवल पात्रता:-

प्रकारकार्यक्षेत्रकिमान सदस्यभागभांडवलमहानगरपालिकाएक वार्ड / प्रभाग२५००२० लाखनगरपालिका१ ते २ वार्ड / प्रभाग२५०००१० लाखग्रामीणएक गाव१०००४ लाखदुर्बल घटकांसाठीएक वार्ड / प्रभाग / गाव१०००२ लाख

महिला पतसंस्थासाठी

प्रकारकार्यक्षेत्रकिमान सदस्यभागभांडवलमहानगरपालिकाएक वार्ड / प्रभाग५००५ लाखनगरपालिका१ ते २ वार्ड / प्रभाग४००२.५० लाखग्रामीणएक गाव३५०१ लाखदुर्बल घटकांसाठीएक वार्ड / प्रभाग / गाव२००१ लाख

अंध व अपंग व्यक्तीच्या पतसंस्थेसाठी

प्रकारकार्यक्षेत्रकिमान सदस्यभागभांडवलमहानगरपालिकाएक वार्ड / प्रभाग४००५ लाखनगरपालिका१ ते २ वार्ड / प्रभाग३००२ लाखग्रामीणएक गाव२००१ लाख

—————————————————————————————————————————

   कंपनी रजिस्ट्रेशन / नवीन कंपनी सुरु करणे.

स्वरूप आकारमान इ. बाबतचा विचार करून शॉप,लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरु करता येतो.१.अत्यल्प भाडे तत्वावर जागा २.उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतीच्या दरात उपलब्धता ३.शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान.४.मोठ्या स्वरूपातील कर्ज व त्यावरील सबसिडी.५.एम.आय.डी.सी/ उद्योग समुहासाठी आरक्षित जागा पाणी,विद्युत पुरवठा इ.सेवा सवलतीचा लाभ घेता येतो.कंपनीच्या बाबत १.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २. पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.बहुतांशी कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड असतात.प्रत्येक राज्यात कंपनी रजि.साठी कार्याक्षेत्रानुसार कार्यालय आहेत.सदर कार्यालय कंपनीची नोंदणी / रजि.करणे कंपन्या नियमाने कार्य करतात कि नाही हे पहाणे.त्याचे आर्थिक लेखापरीक्षण,नाव बदल,कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.

————————————————————————————

     प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनसाठी

प्रा.लि.कंपनी करिता कमीत कमी २ व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडीत असाव्यात त्यांचे पॅन कार्ड , आयकर भरला असल्यास,संचालक बॉडीचे नाव,पत्ता,पुराव्यासह सादर करावे.पसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव.नोंदणी करिता दिलीली नावे हि इतर कंपनीशी जुळती मिळती नसावी.उचित स्टॅम्प वर सामान्य नियमावली व बाह्य नियमावली जी वकील व सी.ए.यांच्याकडून कायद्याच्या चाकोरीत बसणारी असावी.कंपनीचे उत्पादन ठिकाण प्रमाणित करणारे कागदपत्रे व मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे दस्तऐवज द्यावेत.डीजीटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅन कार्ड ,कर भरला असल्यास,प्रमाणित नियमावली इ.बाबींची पूर्तता करून,कंपनी मान्यता दिली जात. यात नजीकचे कर सल्लागार सी.ए.यांचे सहकार्य घेता येईल.कंपनी स्थापनेनंतर प्रत्येकवर्षी सी.ए.यांचे कडून ओडीत करून घेणे व त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाला सादर करणे.प्रती वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रामाणित करून घेणे.आय कर भरल्या संबंधित कामे प्रती वर्षी करावे लागतात.प्रती तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात
उत्तर लिहिले · 1/1/2018
कर्म · 4640
1
संघटना रजिस्ट्रेशन
उत्तर लिहिले · 24/1/2021
कर्म · 20
0
सामाजिक संस्था किंवा संघटना नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
1. संस्थेचे नाव निश्चित करणे:

प्रथम आपल्या संस्थेसाठी एक योग्य नाव निवडा. ते नाव आधीपासूनच नोंदणीकृत नसावे.


2. संस्थेचा उद्देश (Purpose) निश्चित करणे:

संस्थेचा उद्देश काय आहे ते स्पष्ट करा. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, किंवा इतर कोणताही उद्देश असू शकतो.


3. घटना (Constitution) तयार करणे:

संस्थेची घटना तयार करणे आवश्यक आहे. घटनेमध्ये संस्थेचे नाव, उद्देश, सदस्यत्व, कार्यकारिणी समिती, अधिकार, कर्तव्ये, बैठका, निधी व्यवस्थापन आणि नियम यांचा समावेश असावा.


4. कार्यकारिणी समिती (Executive Committee) निवडणे:

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि इतर सदस्यांची निवड करणे. कार्यकारिणी समिती संस्थेचे व्यवस्थापन पाहते.


5. आवश्यक कागदपत्रे तयार करणे:

खालील कागदपत्रे तयार ठेवा:

  • अर्जाचा नमुना (Registration Form)
  • संस्थेची घटना (Constitution)
  • कार्यकारिणी समितीच्या सदस्यांची नावे व पत्ते
  • संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता
  • उद्देश्य व कार्य योजना
  • इतर आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, ओळखपत्र)

6. निबंधक कार्यालयात (Registrar Office) नोंदणी करणे:

संस्थेची नोंदणी निबंधक कार्यालयात केली जाते. आपल्या क्षेत्रातील निबंधक कार्यालयाची माहिती मिळवा.


7. अर्ज सादर करणे:

सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज निबंधक कार्यालयात सादर करा.


8. शुल्क (Fees) भरणे:

नोंदणीसाठी आवश्यक शुल्क भरा.


9. पडताळणी (Verification):

निबंधक कार्यालयाद्वारे कागदपत्रांची पडताळणी केली जाते.


10. नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) मिळवणे:

पडताळणी पूर्ण झाल्यावर, निबंधक तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र देतात.


नोंदणीसाठी आवश्यक वेबसाईट:

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वेबसाइटवर तुम्हाला याबाबतची माहिती मिळू शकेल. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन


उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1620

Related Questions

दस्तऐवजांची नोंदणी - कलम १७, १८ भारतीय नोंदणी कायदा?
सरकारी योजना नोंदणी कशी करायची?
कलम 10 (23C) नोंदणी स्वयंसेवी संस्थेसाठी का गरजेची आहे?
12A नोंदणी स्वयंसेवी संस्थेसाठी का गरजेची आहे?
धर्मादाय आयुक्तांकडे संस्था रजिस्ट्रेशन साठी करावयाचा अर्ज?
संस्था ओपन/रजिस्ट्रेशन प्रोसेस?
प्रवर्त अवस्था आणि नोंदणी अवस्था?