प्रजनन गर्भावस्था आरोग्य

गर्भधारणेमध्ये कुठली काळजी घ्यावी, काय करावं त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

गर्भधारणेमध्ये कुठली काळजी घ्यावी, काय करावं त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का?

8
गरोदरपणातील प्रसूतीपूर्व काळजी

गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे. गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व मूल या दोघांचे आरोग्य सांभाळले जाते.

गरोदरपणात काळजी घेण्याची प्रमुख उद्दिष्टे अशी :

- आईला त्रास न होता गरोदरपण व बाळंतपण पार पाडणे. या काळात निरनिराळे आजार येऊ शकतात व आधी असलेले काही आजार बळावतात. हे आजार वेळीच ओळखून योग्य उपचार करणे, तसेच बाळंतपणातले धोके टाळून बाळंतपण शक्य तितके निर्धोक करणे.
- गरोदरपण, बाळंतपण, बाळाचे संगोपन, इत्यादींसंबंधी आवश्यक ती माहिती देऊन त्या दृष्टीने आईची तयारी करणे.
- जन्मणारे बाळ चांगल्या वजनाचे, अव्यंग व निरोगी असावे म्हणून काळजी घेणे.

गरोदरपणातली तपासणी कशासाठी

गरोदरपणात खालील दिशांनी तपासणी करायची असते (कार्डाचा नमुना पहा)

- गरोदर मातेस काही आजार, दोष आहेत काय?
- गर्भाची वाढ नीट होते की नाही?
- बाळंतपण सुखरुप होईल की नाही ?

तपासणी किती वेळा

- पहिल्या तिमाहीत निदान एकदा
- दुस-या तिमाहीत (म्हणजे चवथ्या, पाचव्या, सहाव्या महिन्यात) निदान महिन्याला एकदा, आणि
- (सातव्या महिन्यापासून पुढे) तिस-या तिमाहीत पंधरवडयाला एकदा.
महत्त्वाची माहिती

- आधी तिला आता काही त्रास होत असल्यास तो विचारा

- ही बाळंतपणाची कितवी खेप ते विचारा, शेवटचे बाळंतपण होऊन किती महिने किंवा वर्षे झाली ते विचारा.

- आधीच्या बाळंतपणात काही त्रास? खूप उशीर लागला असेल, दवाखान्यात नेऊन चिमटा लावून किंवा ऑपरेशनने सुटका करावी लागली किंवा झटके आले होते काय? असा त्रास याही गरोदरपणात होऊ शकतो. याबद्दलची माहिती घ्या.

- आधीच्या मुलांमधल्या वयाचे अंतर किती, याची चौकशी करा. लवकर येणा-या बाळंतपणांमध्ये आईला रक्तपांढरी होण्याची किंवा चुना कमी पडून हाडे दुखरी होण्याची शक्यता जास्त असते.

- या आधी अपु-या दिवसांचे बाळंतपण झाले आहे किंवा दुस-या तिमाहीत गर्भपात झाला आहे का, हे विचारा. या दोन्ही गोष्टी पुन्हा होऊ शकतात. पुन्हापुन्हा होणा-या गर्भपाताची अनेक कारणे संभवतात. गुप्तरोग, मातेचा रक्तगट ऋण व पित्याचा धन असणे, गर्भाशयाचे तोंड मोठे असणे, इत्यादी अनेक कारणे संभवतात. यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी होणे आवश्यक आहे. गर्भाशयाचे तोंड सैल असेल तर गर्भाशयाच्या तोंडाला योग्यवेळी टाका घातल्याने गर्भपात टळू शकतो.

- शेवटी आलेल्या पाळीची तारीख विचारून घ्या. त्यावरून बाळंतपणाची अंदाजे तारीख काढता येईल.

- याआधीच्या गर्भारपणी धनुर्वाताची लस टोचून घेतली होती का? मागील खेपेस (पाच वर्षात) धनुर्वाताची दोन इंजेक्शने झाली असली तर या गर्भारपणात एकच फेरडोस द्यावा लागतो. तसे नसल्यास एक ते दोन महिने अंतराने दोन इंजेक्शने द्यावी लागतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात ती मोफत मिळतात.

- इतर काही आजार आहेत काय? (क्षयरोग, रक्तपांढरी, कावीळ, मधुमेह, इ.) अंगावर जखमा, गुप्तरोग, हृदयविकार, रक्तदाब, दमा, पोटाचे आजार, इत्यादींबद्दल मातेला प्रश्न विचारून माहिती घ्यावी. आवश्यक ती तपासणी करावी.

सर्वसाधारण तपासणी

- कुपोषण : रक्तपांढरी, रातांधळेपणा, तोंड येणे यांपैकी काही त्रास आहे का ते बघा. अपु-या व निकृष्ट अन्नामुळे असे त्रास होऊ शकतात. यासाठी अनुक्रमे लोहद्रव्याच्या गोळया, गरज असल्यास 'अ' जीवनसत्त्वाचे डोस व 'ब' जीवनसत्त्वाच्या गोळया द्याव्यात. डाळी, भाजीपाला, फळे, मासे व मांस या सर्व गोष्टींचा आहारात समावेश असल्याचे फायदे समजावून सांगा.

- वजन: संपूर्ण नऊ महिन्यांत नऊ ते अकरा किलोंनी वजन वाढते. दुस-या व तिस-या तिमाहीत दरमहा सुमारे दीड किलो वजन वाढते. शेवटच्या महिन्यात अचानक जास्त वजन वाढणे धोकादायक आहे.

- उंची फार कमी (145से.मी.पेक्षा कमी) असल्यास बाळंतपणात त्रास होऊ शकतो. अशा स्त्रीचा जन्ममार्ग अरूंद असू शकतो.

- रक्तदाब: प्रत्येक भेटींमध्ये रक्तदाब मोजून त्याची नोंद ठेवावी. रक्तदाब वाढणे हे धोक्याचे लक्षण आहे.

- पायावर सूज आहे का ते तपासावे: घोटयाजवळ बोटाने दाबून 'खड्डा' राहत असल्यास सूज आहे असे समजावे. चेह-यावर सूज येणे जास्त धोकादायक चिन्ह आहे.

- दम लागणे, छातीत धडधड हा त्रास होतो का? नाडीचे ठोके मोजून ठेवा. नेहमीच्या तुलनेत नाडीचे ठोके वेगाने पडत असतील तर तज्ज्ञाकडे पाठवून द्या.

गर्भतपासणी

- पहिल्या तिमाहीत गर्भाची वाढ समजण्यासाठी 'आतून' तपासणी आवश्यक असते.
- दुस-या तिमाहीपासून पोटावरून तपासणी करता येते. कारण चवथ्या महिन्यापासून गर्भाशय ओटीपोटावरून हाताला जाणवते.
- पाचव्या महिन्यापासून गर्भाची हालचाल जाणवते.
- सहाव्या महिन्यापासून गर्भाच्या हृदयाचे ठोके आवाजनळीने समजू शकतात.
- सातव्या महिन्यापासून गर्भाचे अवयव व स्थिती हाताने तपासून समजते.
- आतून तपासणी केल्यास गर्भाशयाचे तोंड आपल्या बोटाला लागते. त्याचा सैलपणा तपासणे आवश्यक आहे. हा सैलपणा (तोंड) वाढत असल्यास विशेषतः दुस-या तिमाहीत गर्भपात होण्याची शक्यता असते. अशा मातांना टाका घालण्याचा उपयोग होतो. तसेच अंतर्गत तपासणीत लिंगसांसर्गिक आजारांच्या काही खाणाखुणा आढळल्यास तज्ज्ञांकडे पाठवावे.
- गर्भाशय किती वाढले यावरून महिन्यांची कल्पना येते. महिन्याच्या अंदाजापेक्षा गर्भपिशवीचा आकार मोठा असेल तर पुढील शक्यता विचारात घ्या. जुळी मुले आहेत का ते पहा. यात दोन डोकी लागतात, जास्त हातपाय असल्याच्या खुणा दिसतात किंवा बाळाभोवती पाण्याच्या पिशवीत जास्त पाणी आहे का, याचा अंदाज घ्या. सोनोग्राफीमुळे हे निदान अगदी सोपे झाले आहे.
- आठ महिन्यांनंतर बाळाच्या हृदयाचे ठोके आवाजनळीने मोजा, बाळाचे डोके खाली असेल तर सर्वसाधारणपणे बेंबीच्या खाली एका बाजूला (म्हणजे बाळाची पाठ ज्या बाजूला आहे त्या बाजूला) ठोके ऐकू येतात. दर मिनिटास 120 पेक्षा कमी किंवा 160 पेक्षा जास्त ठोके असतील तर बाळाच्या प्रकृतीत काही तरी दोष आहे असे समजावे व तज्ज्ञाकडे पाठवावे.
- 9 व्या महिन्यानंतर बाळाचे डोके खालच्या बाजूस असणे ही योग्य स्थिती. पण डोके वर किंवा कुशीत आडवे असेल तर बाळंतपण धोक्याचे होऊ शकते.

गर्भावस्थेत अनावश्यक औषधे नको

अनेक औषधांचा वाईट परिणाम गर्भाच्या वाढीवर होतो. अनेक जणांना-कित्येक डॉक्टरांनाही याची पुरेशी माहिती नसते. सामान्य वापरातली अनेक औषधे गर्भावस्थेत धोकादायक ठरतात. सर्वसाधारण नियम म्हणजे पॅमाल व कोझाल सोडता पोटातून द्यायचे कोठलेही औषध गरोदरपणात अजिबात देऊ नये. विशेषतः पहिल्या तिमाहीत गर्भाचे अवयव तयार होत असल्याने जास्तच काळजी घेणे आवश्यक आहे. ऍस्पिरिनमुळेही अपाय होतो असे निश्चित झाले आहे. क्ष-किरणही गर्भासाठी वाईट असल्याचे सिध्द झाले आहे. हे सर्व लक्षात घेऊन गरोदरपणात कोठल्याही आजारासाठी औषध देताना डॉक्टरांना दहा वेळा विचार करून ठरवावे लागते.
उत्तर लिहिले · 25/8/2017
कर्म · 1210
0
गर्भधारणेमध्ये घ्यावयाची काळजी आणि काय करावे याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

गर्भधारणेदरम्यान घ्यावयाची काळजी:

  • आहार:
    • पौष्टिक आहार: फळे, भाज्या, प्रथिने (proteins), आणि ധാన్య यांचा समावेश करा.
    • फॉलिक ऍसिड (folic acid): गर्भाशयाच्या विकासासाठी फॉलिक ऍसिड महत्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आहारात घ्या.
    • लोह (iron): लोहामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्यामुळे रक्ताची कमतरता टाळता येते.
    • पुरेसे पाणी प्या: दिवसातून कमीतकमी ८-१० ग्लास पाणी प्यावे.
  • जीवनशैली:
    • पुरेशी झोप: दररोज रात्री ७-८ तास झोप घ्या.
    • तणाव टाळा: तणाव कमी करण्यासाठी योगा, ध्यान करा.
    • धूम्रपान आणि मद्यपान टाळा: ह्या गोष्टी गर्भासाठी हानिकारक असू शकतात.
    • डॉक्टरांचा सल्ला: नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
  • शारीरिक क्रिया:
    • हलका व्यायाम: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित हलका व्यायाम करा. जसे की चालणे, योगा.
    • वजन उचलणे टाळा: जास्त वजन उचलणे टाळा.

काय करावे:

  • नियमित तपासणी: डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जा.
  • लसीकरण: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक लसीकरण वेळेवर करा.
  • आराम: दिवसभर काम करून झाल्यावर पुरेसा आराम करा.
  • सकारात्मक विचार: नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि आनंदी राहा.

काय टाळावे:

  • जंक फूड: जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा.
  • प्रवाsa: जास्त प्रवास करणे टाळा, विशेषतः पहिल्या तीन महिन्यांत.
  • औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी आणि तुमच्या विशेष गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5240

Related Questions

5 आठवड्यांचा गर्भ आहे, नको असेल तर काय करावे? गोळीचे नाव असल्यास सांगावे. दुष्परिणाम नसावा?
गर्भाला गळ्याभोवती नाळेचा तिडा कशामुळे तयार होतो?
असे एखादे ॲप सांगा जे pregnancy मधील सोनोग्राफीची माहिती देईल?
गरोदरपणात कोणत्या महिन्यापासून भूक वाढते?
महिला गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात प्रवास करू शकतात का?
गरोदरपणात आंबा खावा का?
कोरोना काळात पत्नी प्रेग्नेंट असेल तर होणाऱ्या बाळाला कोरोना होऊ शकतो काय?