जागतिकीकरण अर्थशास्त्र

अर्थशास्त्रामधील जागतिकीकरण, उदारीकरण, व खाजगीकरण म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

अर्थशास्त्रामधील जागतिकीकरण, उदारीकरण, व खाजगीकरण म्हणजे काय?

4
जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुध आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते.

भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) ह्या खाजगी संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या. ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना "आर्थिक सुधारणा" म्हटले गेले व त्यात जागतिकीकरणासोबतच उदारीकरण व खाजगीकरण ह्यांचा पण समावेश होतो. ह्यांनाच एकत्रितपणे खा.ऊ.जा. धोरण असे संबोधले जाते.

आर्थिक उदारीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेतील शासकीयहस्तक्षेप व नियंत्रण कमी करण्याकडे कल असणाऱ्या आर्थिक धोरणांचा अवलंब करणारी प्रक्रिया होय. या प्रक्रियेत अर्थव्यवस्थेमध्ये खासगी क्षेत्राला अधिक सहभागी करून घेण्यात येते. सामान्यपणे, या धोरणांमध्ये उद्योगधंद्यांच्या खासगीकरणावर भर देण्यात येतो.


भारताशी संबंधित आर्थिक उदारीकरण

१९९१ साली आपल्याकडील परदेशी गंगाजळी न च्या बरोबर होती तेव्हा भारत सरकार ने थेट परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा करायचा ठरवला त्यात आर्थीक उदारीकरण, जागतिकीकरणआणि खाजगीकरणाचा समावेश होता तत्कालीन पंतप्रधान पी .व्ही. नर्सिव्हाराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग ह्यांची ह्यासार्वांमध्ये महत्वाची भूमिका होती.


उत्तर लिहिले · 20/8/2017
कर्म · 6740
0
अर्थशास्त्रामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण (Globalization, Liberalization and Privatization) या तीन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, ज्या एकमेकांशी संबंधित आहेत. ह्या तीनही संकल्पनांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. जागतिकीकरण (Globalization):

जागतिकीकरण म्हणजे जगातील अर्थव्यवस्थांना एकत्र आणणे. ज्यामुळे वस्तू, सेवा, तंत्रज्ञान आणि माहितीचा प्रवाह जगभर मुक्तपणे होऊ शकेल.

  • उद्देश: जगाला एक बाजारपेठ बनवणे, ज्यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.
  • परिणाम:
    • विविध देशांतील लोकांमध्ये देवाणघेवाण वाढते.
    • आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारतात.
    • स्पर्धा वाढल्यामुळे वस्तू आणि सेवांची गुणवत्ता सुधारते.

२. उदारीकरण (Liberalization):

उदारीकरण म्हणजे सरकारद्वारे अर्थव्यवस्थेवरील निर्बंध कमी करणे.

  • उद्देश: खाजगी क्षेत्राला (private sector) अधिक स्वातंत्र्य देणे, ज्यामुळे ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील.
  • परिणाम:
    • नवीन उद्योग सुरू करणे सोपे होते.
    • गुंतवणूक वाढते.
    • बाजारपेठ अधिक स्पर्धात्मक होते.

३. खाजगीकरण (Privatization):

खाजगीकरण म्हणजे सरकारी मालकीच्या उद्योगांचे खाजगी मालकीत रूपांतर करणे.

  • उद्देश: सरकारी उद्योगांची कार्यक्षमता वाढवणे आणि तोटा कमी करणे.
  • परिणाम:
    • उद्योगांमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरण होते.
    • गुंतवणूक वाढते.
    • सरकारवरील आर्थिक भार कमी होतो.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5240

Related Questions

जागतिकीकरणामुळे बाजारपेठ अर्थव्यवस्था ही संकल्पना आली?
आर्थिक व्यवहारातील जागतिकीकरणामुळे पर्यावरणावर परिणाम होतो याची तीन उदाहरणे?
जगतिकीकरन म्हणजे काय?
जागतिकीकरणाचा सकारात्मक व नकारात्मक बाजू?
जागतिकीरणाची संकल्पना कशी स्पष्ट कराल?
जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाचा फरक कसा स्पष्ट कराल?
जागतिकीकरणामुळे बिगर राजकीय घटकांवर झालेला परिणाम कोणता आहे?