औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
सर्दी आणि फ्लू
आरोग्य
सर्दी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि सर्दी झाल्यास उपाय काय?
4 उत्तरे
4
answers
सर्दी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि सर्दी झाल्यास उपाय काय?
8
Answer link
# सर्दी खोकल्यावर #
रामबाण घरगुती उपाय --
१) लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडून ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते.
२) चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकुन दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यासही खोकला कमी होतो.
३) नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
४) काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्यापासुन आराम मिळतो.
५) हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते.
६) आवळा पावडर व मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
७) पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, १ चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.
८) पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा चमचा खसखस पेस्ट, ३-४ चमचे नारळाचे दुध आणि चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोपताना घेतल्यास त्यानेही कोरडा खोकला कमी होतो.
९) १०० ग्रॅम पाण्यात भिजवलेली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवावा. झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही.
तुळस आणि बडिशेपेचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे.
१०) कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी.
११) खोकल्याबरोबरच श्वसनसंस्थेतील इतर बिघाड थोपवण्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळावीत.
१२) कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो.
१३) कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम (कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवावे व नंतर त्याचे सेवन करावे.
१४) सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे.
१५) उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा. हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी.
🌹आरोग्यम् धनसंपदा🌹

सर्दी होणे खरेतर चांगलेच असते. शिंका मार्फत आपल्या शरीरातील काही जंतू देखील बाहेर पडतात. पण अती प्रमाणात होणे हे शारीरिक दृष्ट्या नुकसानीचेही असते. सर्दी होणे ही एक नैसर्गिक बाब आहे. त्याला येण्यापासून कोणीही थांबवु शकत नाही. परंतु ते आल्यानंतर ते कमी करता येते आणि तेव्हा थांबवु शकतो. शक्यतो रोज आल्याचा(अद्रक) चहा घ्या. तेही बिन दुधाचा. अधून मधून एक दोन आल्याचे छोटे तुकडे चघळवे. गुळासोबत खाल्ले तरीही चालेल. पाणी रोज उकळुन प्यावे;त्यात ओवा टाकावा. ओवा, अद्रक हे एक नैसर्गिक एन्टीसेप्टिकच म्हणावे लागेल. लसुण हां तर अमृताचा थेंब आहे. याने देखील सर्दी थांबते. एक एन्टी बॅक्टेरियल म्हणून लसुण उत्तम काम करते. अश्याने सर्दी येण्यापासून आपला बचाव होतो. आणि सर्दी झाल्यावर आले,ज्येष्टमध,वेलची,तुळशीची तीन चार पाने,दालचीनी आणि गुळ किंवा खड़ीसाखर(साखर नव्हे) यांचा पाण्यात चांगला उकळवुन काढ़ा बनवा आणि सर्दी झालेल्या व्यक्तीला दया. हे झाले घरगुती प्रथमोपचार. तरीही आपण आपल्या जवळच्या दवाखान्यात जाउन योग्य तो उपचार करुन घ्यावा. कारण स्वाईन फ्लू, इन्फेक्शन यांचा शरीरावर विपरीत परिणाम झाले की सर्दी खोकला मार्फत देखील ही लक्षणे आढळु शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेवुनच नियमित रूटीन आणि योग्य सेवन करावे. काळजी घ्या.
0
Answer link
सर्दी होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि सर्दी झाल्यास काही उपाय खालीलप्रमाणे:
सर्दी होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी:
- हातांची स्वच्छता: नियमितपणे आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवा. विशेषतः जेवणापूर्वी आणि सार्वजनिक ठिकाणी स्पर्श केल्यानंतर. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC)
- गर्दी टाळा: जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, कारण तिथे संक्रमणाचा धोका अधिक असतो.
- समतोल आहार: आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या, ज्यामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
- तणाव कमी करा: तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
सर्दी झाल्यास उपाय:
- गरम पाणी प्या: गरम पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो आणि श्लेष्मा पातळ होतो.
- आराम करा: जास्तीत जास्त आराम करा, जेणेकरून शरीर लवकर बरे होईल.
- गुळण्या करा: गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा, ज्यामुळे घसा खवखवणे कमी होते.
- वाफ घ्या: गरम पाण्याची वाफ घ्या, ज्यामुळे नाक मोकळे होते आणि श्वास घेणे सोपे होते.
- औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्दीची औषधे घ्या.
- आहार:
- व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्या, जसे की लिंबू, संत्री, आणि आवळा.
- गरम सूप प्या, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
इतर उपाय:
- सर्दीमध्ये आराम मिळवण्यासाठी तुम्ही मध आणि आले यांचे मिश्रण घेऊ शकता.
- तुळशीची पाने आणि आले यांचा चहा प्यायल्याने आराम मिळतो.