नेता व्यक्तिमत्व इतिहास

महात्मा ज्योतिबा फुले बद्दल सविस्तर माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

महात्मा ज्योतिबा फुले बद्दल सविस्तर माहिती मिळेल का?

2

जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११इ.स. १८२७ -नोव्हेंबर २८इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजनावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजनसमाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. येथील जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती; जनता त्यांना महात्मा फुले म्हणे.

जोतीराव फुले
Mahatma Phule.jpg
जोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव:ज्योतीबा, ज्योतीराव, क्रांतिसूर्य, महात्मा, राष्ट्रपिता
जन्म:एप्रिल ११इ.स. १८२७
कटगुणसातारा,महाराष्ट्र
मृत्यू:नोव्हेंबर २८इ.स. १८९०
पुणेमहाराष्ट्र
संघटना:सत्यशोधक समाज
प्रभाव:थॉमस पेन
प्रभावित:डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील:गोविंदराव फुले
आई:चिमणाबाई फुले
पत्नी:सावित्रीबाई फुले
अपत्ये:यशवंत

बालपण आणि शिक्षणसंपादन करा

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदरतालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

शैक्षणिक कार्यसंपादन करा

महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. महात्मा फुले हे थोर नेते होऊन गेले आहे. त्यांनी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली

उत्तर लिहिले · 9/8/2017
कर्म · 80330
0
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी मराठीत भाषण बघणार आहोत .

महात्मा फुले भाषण : 

 आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू-भगिनींना आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ती आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

अज्ञानाचा अंधकार खितपत पडलेल्या...   
अठरा विश्व दारिद्र उराशी असणाऱ्या 
अशा हरिजन गिरीजन अडलेल्या नडलेल्या 
आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या 
दिन दलिताचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला 
असे क्रांतिवीर महात्मा ज्योतिराव फुले 

यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंती चे नाव जनक महात्मा ज्योतिबा फुले !

 स्वतःच्या घरा दाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यथित करणारे वंचितांचे उद्धारकर्ते...

अधिक व पूर्ण भाषणासाठी व माहिती साठी marathibhashan.com ला भेट द्या 
https://www.marathibhashan.com/2021/04/mahatma-phule-marathi-mahiti-bhashan-nibandh.html
उत्तर लिहिले · 6/4/2021
कर्म · 345
0
नक्कीच, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
महात्मा ज्योतिबा फुले

जन्म: ११ एप्रिल १८२७, कटगुण, सातारा जिल्हा, महाराष्ट्र

मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०, पुणे, महाराष्ट्र

पूर्ण नाव: ज्योतिराव गोविंदराव फुले

लोकप्रिय नाव: महात्मा फुले, जोतीबा

जीवन परिचय

ज्योतिबा फुले हे एक भारतीय समाजसुधारक, विचारवंत, आणि लेखक होते. त्यांनी समाजातील अन्याय आणि विषमता दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी विशेषतः दलित आणि महिलांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला.

शैक्षणिक कार्य
  • पहिली मुलींची शाळा: त्यांनी १८४८ मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.
  • शिक्षणाचे महत्त्व: त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक कार्य
  • सत्यशोधक समाज: त्यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याने सामाजिक समानतेसाठी कार्य केले. अधिक माहितीसाठी (पान क्र. 24)
  • विधवा विवाह: त्यांनी विधवा विवाहांना प्रोत्साहन दिले आणि बालविवाह विरुद्ध आवाज उठवला.
  • दलित उद्धार: त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आणि त्यांना सामाजिक समानता मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
साहित्यिक कार्य
  • गुलामगिरी: हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे, ज्यात त्यांनी समाजातील विषमतेवर प्रकाश टाकला आहे. गुलामगिरी (ऍमेझॉन)
  • शेतकऱ्यांचा आसूड: या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य केले आहे. शेतकऱ्यांचा आसूड (बुकगंगा)
  • ब्राह्मणांचे कसब: या पुस्तकात त्यांनी ब्राह्मणांच्या धार्मिक धोरणांवर टीका केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?