माहिती अधिकार सरकारी योजना ग्रामपंचायत अर्थ शासकीय योजना

शासनातर्फे ग्रामपंचायतसाठी मिळणारा निधी व योजना यांची माहिती कशा प्रकारे मिळू शकते?

4 उत्तरे
4 answers

शासनातर्फे ग्रामपंचायतसाठी मिळणारा निधी व योजना यांची माहिती कशा प्रकारे मिळू शकते?

15
ग्रांमसभामध्ये ग्रांमसेवकाकडून निधी बाबत खालील माहिती मिळवा
1} मुद्रांक शुल्क वार्षि किती जमा झाला आहे
2} रॉयल्टी किती जमा झाली
3} तेरावा वित्त आयोगांचा निधि किती खर्च झाला
4) 14 वित्त आयोगांचा निधि किती खर्च झाला
5) पेसा चा निधि किती व जमा खर्च वार्षीक
6) दंलित वस्ती चा निधि वार्षीक जमा खर्च
6} जनसुविधा आंतरगत निधि
7} ठक्कर बाप्पाअंतरगत निधि
8} तेरा ताळेबंध चा हिशोब व वहया
9} कोण कोणत्या बँक मध्ये खाते आहे ते विचारा नाहीत ते म्हाणता 1 किवा 2 परंतू 4ते 5 सरकरी बॅक खाते आसतत
10}आरोग्य विभाग,रेशनिगं विभाग हयाचा आढावा मागवा
10) गांवची घरपट्टी व वसुली किती व थकबाकी किती तो हिशोब घ्या
11} कृषी विभागांकडून सर्व हिशोब व कामाचा तपशिल मागवा
11} ग्रांमपंचायती मार्फत किती कामे केली ते विचारा
12}उदाः झेडपीच्या निधी
13} पंचायतसमितीचा निधी
14}आमदार निधी
15}खासदार निधी
16}विधानपरिषेधेचा निधी
17}पालकमंत्री निधी
18}मुख्यमंत्री निधी
19}सार्वजनिक बांधकांम निधी
20}पंतप्रधान विकास निधी
हि सर्व माहिती ग्रामसभेत विचारा बघा कोणकोणत्या मार्गाने ग्रामपंचायतीला निधी येतो व शिवाय भ्रष्टाचार ही समोर आल्याशिवाय राहणार नाही
येईल व गांवच्या ग्रांमपंचायत मध्ये काय चालंय ते कळेल.


चौदाव्या वित्त आयोगाद्वारे महाराष्ट्राला १३ हजार ५३२
कोटी रुपये मिळणार आहेत. ही बेसिक ग्रांट असेल. याशिवाय १५०३ कोटी रुपये परफ़ोर्मन्स ग्रांट असणार आहे. अंदाजे प्रत्येक *ग्रामपंचायतीला वर्षाला सुमारे 40 ते 50 लाख मिळणे अपेक्षित* आहे हे पैसे याच वर्षात जमा होतील आणि पुढील पाच वर्षे मिळतील. महत्वाचे म्हणजे हे *पैसे डायरेक्ट ग्रामपंचायतींना मिळणार* आहेत. म्हणजे अधेमध्ये कोणीच असणार नाही. निधीचा विनियोग योग्य पद्धतीने केला तर पुढच्या वर्षापासून परफ़ोर्मन्स ग्रांट मधून अजून अधिक पैसे मिळतील. म्हणजे पुढील ५ वर्षे दरवर्षी 40 ते 50 लाख रुपये मिळतील. याचाच अर्थ *पाच वर्षात ग्रामपंचायतीत सुमारे २ ते ३ कोटी* रुपये मिळतील. हा सर्व निधी खर्च करण्यासाठी कुठल्याही प्रस्तावाची, कुणाच्याही संमतीची गरज नाही.
कुठे कलेक्टर, CEO कडे जायची गरज नाही. जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याही संमतीची गरज नाही.( थोडेफार प्रशासकीय अपवाद वगळून)
संग्रामसाॅफ्ट प्रणालीवर आपल्याला ONLINE ग्रामपंचायतीचे जमा खर्च पाहता येतात.
आशा करतो वरील माहितीतून सर्व योजना व येणार निधी याची सर्व माहिती आपणास मिळाली असेल.
उत्तर लिहिले · 30/7/2017
कर्म · 210095
9
_*आपल्या गावच्या सरपंचांनी गावातील कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला?*_


​वरील फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गावच्या निधीचा खर्च तुम्ही पाहू शकता.

तुम्ही दर पाच वर्षांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देता. मात्र गावासाठी ते किती निधी आणतात आणि काय कामं करतात, याची कल्पनाही ग्रामस्थांना नसते.

रस्ते, पाणी अशी कामं केलेली तर दिसतात, मात्र याव्यतिरिक्त काय कामं केली जातात, त्यासाठी किती निधी मिळतो, याची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.

_*माहिती कशी मिळवाल?*_

या लिंकवर क्लिक करा
http://www.planningonline.gov.in/ReportData.do?ReportMethod=getAnnualPlanReport
क्लिक केल्यानंतर तुम्ही पंचायत राज मंत्रालयाच्या प्लॅन प्लस या वेबसाईटशी जोडले जाल.

*वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा तपशील पाहिजे, ते वर्ष टाका*
(उदा; *2017-2018*)

*त्यानंतर राज्य निवडा* (उदा; *महाराष्ट्र*)

  • राज्य निवडल्यानंतर तुम्हाला नेमकी कशाची माहिती निवडायची आहे, तो पर्याय निवडा, जसं की ग्रामपंचायतीची माहिती हवी असेल तर ग्रामपंचायत निवडा आणि जिल्हा परिषदेची माहिती पाहिजे असेल तर जिल्हा परिषद हा पर्याय आहे.
यानंतर जिल्हा निवडण्याचा पर्याय येईल(उदा; *सोलापूर*)

जिल्हा निवडल्यानंतर पुढे तालुका निवडावा लागेल
(उदा; *अक्कलकोट*)
तालुक्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीची यादी येईल.(उदा; *अक्कलकोट-बोरगांव (दे)*)

ग्रामपंचायत निवडून गेट रिपोर्टवर क्लिक करा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल(उदा; *बोरगांव(देशमुख)*

उदा.,मला *महाराष्ट्रातील सोलापूर* जिल्ह्यातील  अक्कलकोट तालुक्यातील *बोरगांव (देशमुख)* या गावचे तपशील पहायचे असल्यास खालील लिंकवरील पेज उघडेल ज्यामध्ये *बोरगांव* गावासाठी मंजूर झालेला निधी आपल्याला दिसून येईल
तुमच्या गावचा निधी पाहण्यासाठी खालील लिंक उघडून पहा.
http://www.planningonline.gov.in/ReportData.do?ReportMethod=getAnnualPlanReport
उत्तर लिहिले · 13/1/2019
कर्म · 569265
0

ग्रामपंचायतीसाठी शासनाकडून मिळणारा निधी आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील मार्गांचा वापर करू शकता:

  • ग्रामपंचायत कार्यालय:
    • ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन थेट माहिती विचारू शकता.
    • तेथील सूचना फलकावर (Notice board) योजना व निधीसंबंधी माहिती दिलेली असते.

  • पंचायत समिती कार्यालय:
    • पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायती संबंधित योजनांची माहिती उपलब्ध असते.

  • जिल्हा परिषद कार्यालय:
    • जिल्हा परिषदेमध्ये ग्रामविकास विभागाकडे योजना आणि निधीची माहिती मिळू शकते.

  • शासकीय संकेतस्थळे:
    • ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन:
      या विभागाच्या वेबसाइटवर (rdd.maharashtra.gov.in)rdd.maharashtra.gov.in विविध योजनांची माहिती उपलब्ध असते.
    • महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळ:
      महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (maharashtra.gov.in)maharashtra.gov.in योजनांविषयी माहिती मिळू शकते.

  • माहितीचा अधिकार (Right to Information - RTI):
    • माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करून ग्रामपंचायतीच्या निधी आणि योजनांविषयी माहिती मागवता येते.

  • ऑनलाईन पोर्टल आणि ॲप्स:
    • काही शासकीय ॲप्स (Apps) आणि वेबसाईटवर ग्रामपंचायतींना मिळणारा निधी आणि योजनांची माहिती उपलब्ध असते.

यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून तुम्ही ग्रामपंचायतसाठी शासनाकडून मिळणारा निधी आणि योजनांची माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5060

Related Questions

सलमाला म्हणजे काय?
SWP साठी सर्वात चांगले फंड कोणते?
मी एचडीएफसीचा कर्जदार होतो, शेतीवर कर्ज घेतले होते पण मी ते सेटलमेंट केले. तर मला दुसरी बँक कर्ज देत नाही, काही पर्याय?
बजाज फायनान्स तीन लाख रुपये लोन देत आहे आणि त्याचे हप्ते हजार रुपये आणि ईएमआय मध्ये कपात अशी जाहिरात आहे, हे खरे आहे का?
सिप कोणत्या कोणत्या बँकेत सुविधा असते?
प्रॉपर्टीवर वार्षिक हप्ता लोन कोणती बँक देते?
एसआयपी मध्ये दरवर्षी पैसे ॲड करता येतात का?