हर्निया आरोग्य

हर्निया म्हणजे काय, तो कसा उद्भवतो, आणि त्याची नवीन उपचार पद्धती काय आहे?

3 उत्तरे
3 answers

हर्निया म्हणजे काय, तो कसा उद्भवतो, आणि त्याची नवीन उपचार पद्धती काय आहे?

12
*हर्निया*

कोणत्याही आजारात जेव्हा खूप जोर केला जातो तेव्हा पोटाचे स्नायू अशक्त असल्यास हर्निया होऊ शकतो. उदा. लहान मुलांमध्ये डांग्या खोकला, मोठय़ा माणसांमध्ये दमा, सततच्या धूम्रपानामुळे होणारा खोकला , बद्धकोष्ठ आणि त्या अनुषंगाने जोर करणे, लघवीसाठी जोर करणे विशेषत: वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेटसारखा त्रास असल्यास किंवा कधी कधी खूप जड वजन उचलण्यास हर्नियाची सुरुवात होऊ शकते. मात्र, हर्निया झाल्याचे लक्षात आल्यावर उशीर न करता सर्जनचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आपल्या नातेवाइकांमध्ये किंवा आजूबाजूच्या कुणाला तरी ‘हर्निया’ (किंवा आंत्रगळ) झाला असे आपण बरेचदा ऐकतो. पण हर्निया झाला म्हणजे नक्की काय झाले हे माहीत नसते. हर्निया या मूळच्या लॅटिन शब्दाचा अर्थ काहीतरी फुटून बाहेर येणे, असा होतो. त्याची सरधोपट व्याख्या एखादा अवयव किंवा त्याचा भाग नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांमधून बाहेर येणे अशी आहे. बहुतांश हर्निया पोटाशी संबंधित असतात. आपल्या पोटातील आतडी किंवा त्याचा भाग त्याच्यावरील मेदाच्या आवरणासहित (omentum) पोटाच्या स्नायूंमधून बाहेर येतो. पोटाच्या खालच्या भागात हर्निया जास्त प्रमाणात आढळून येतात. उदा. जांघेत (७५ टक्के), मांडीच्या अगदी वरच्या भागात (१५ टक्के) आणि बेंबीत (८ टक्के) क्वचित फुप्फुस, मेंदू, स्नायू किंवा चरबी यांचा हर्निया होऊ शकतो. काही वेळा ऑपरेशनच्या व्रणातून हर्निया होऊ शकतो. अशा प्रकारच्या हर्नियाचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे. सिझेरियन किंवा कुटुंबनियोजनाच्या टाक्यांच्या ऑपरेशनमध्ये कधी कधी हर्निया होतो. या शस्त्रक्रिया हल्ली आडव्या छेदामधून केल्या जातात. त्यामुळे या प्रकारच्या हर्नियाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. 
१) स्त्रियांमध्ये काही वेळा गर्भारपणात, गर्भाशयाचा ताण पोटांच्या स्नायूवर पडून ते कमकुवत होतात किंवा पोटावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यास पोटाचे नळ मध्यभागापासून दूर सारले जातात आणि मध्यभागी छोटा खड्डा तयार होतो. या पोकळीतून आतडी बाहेर येतात. परंतु सहसा कधी अडकत नाहीत. वजन कमी करून व्यायामाने पोटाच्या स्नायूंचा टोन परत मिळवल्यास शस्त्रक्रियेची गरज पडत नाही.
२) लहान मुलांमध्ये काही वेळा बेंबी फुगलेली दिसते. मूल रडत असल्यास ते जास्तच प्रकर्षांने जाणवते. बेंबीत जिथे नाळ चिकटलेली असते तिथले स्नायू कमकुवत असतात. या प्रकारच्या हर्नियात घाबरून न जाता, डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यावा. बहुतेक वेळा वयाच्या चौथ्या वर्षांपर्यंत हा हर्निया आपोआप बरा होतो. मात्र, बेंबीवर तांब्याचे नाणे चिकटविणे, बँडेड लावणे असले प्रकार करू नयेत.
हर्नियाची कारणे व उपाय
कोणत्याही आजारात जेव्हा खूप जोर केला जातो तेव्हा पोटाचे स्नायू अशक्त असल्यास हर्निया होऊ शकतो. उदा. लहान मुलांमध्ये डांग्या खोकला, मोठय़ा माणसांमध्ये दमा, सततच्या धूम्रपानामुळे होणारा खोकला , बद्धकोष्ठ आणि त्या अनुषंगाने जोर करणे, लघवीसाठी जोर करणे विशेषत: वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेटसारखा त्रास असल्यास किंवा कधी कधी खूप जड वजन उचलण्यास हर्नियाची सुरुवात होऊ शकते. काही वेळेला जन्मत: पोटाचे स्नायू अशक्त असतात. अशा व्यक्तींमध्ये उतारवयात जांघेत हर्नियाचा फुगा येतो (Direct Hernia). तरुणांमध्ये किंवा मुलांमध्ये Indirect Inguinal Hernia प्रामुख्याने आढळतो.
हर्निया झाल्याचे लक्षात आल्यावर उशीर न करता सर्जनचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हर्निया अडकून पोटात दुखू लागल्यास किंवा पोट फुगून गॅसेस आणि संडास बंद झाल्यास त्वरित ऑपरेशन करावे. हर्नियाचा फुगा आडवे पडल्यास, विश्रांती घेतल्यास आत जात असेल तर काही अवधीसाठी थांबणे शक्य असते. अशा वेळी धूम्रपान, बद्धकोष्ठ, दमा, लघवीचा अडथळा यांवरील उपाय करणे हितावह ठरते. स्थूल व्यक्तींनी आहार आणि चालण्यासारखे हलके व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पोटातल्या स्नायूंना बळकटी येऊन ऑपरेशनसाठी तसेच ऑपरेशननंतर आतील स्नायू भरून येण्यासाठी उपयोग होतो.
शस्त्रक्रिया- हर्नियावरती शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे. शस्त्रक्रियेपूर्वी खोकला, मलावरोध किंवा लघवीच्या तक्रारींसाठी उपचार घेणे गरजेचे आहे. पन्नाशीनंतरच्या पुरुषांमध्ये सोनोग्राफी करून प्रोस्टेट वाढले नाही ना, याची शहानिशा करून घेतली जाते. खोकल्याचा त्रास असल्यास छातीचा एक्स-रे केला जातो. हिमोग्लोबीन, शुगरसारख्या रक्तचाचण्या केल्या जातात.
शस्त्रक्रिया मुख्यत: दोन प्रकाराने केल्या जातात.
१) पारंपरिक पद्धतीने- ओटीपोटावर छेद घेऊन.
२) लॅप्रोस्कोपिक पद्धतीने.
* पारंपरिक पद्धत –
ओटीपोटावर खालच्या बाजूने २-३ इंचांचा आडवा छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. यात प्रथम हर्नियाची पिशवी आजूबाजूच्या आवरणापासून सोडवली जाते. पिशवीतील आतडी आणि ओमेंटम सोडवून पोटात पूर्वस्थितीत ठेवली जातात आणि पिशवीचे तोंड शिवून बंद केले जाते.
कमकुवत स्नायूंना मजबूती आणण्यासाठी हर्नियाच्या पिशवीमुळे दूर गेलेले स्नायू मूळपदावर आणले जातात. (Anatomical Repair) किंवा डबल प्रेस्टिंग केले जाते आणि हल्ली प्रोलीन मेश बसविली जाते.
* लॅप्रोस्कोपिक पद्धत- 
दुर्बिणीच्या साहाय्याने बेंबीजवळ आणि ओटीपोटात छेद घेऊन अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. पोटाच्या आतून हर्नियाचे छिद्र बुजवून ‘प्रोलिन मेश’ घातली जाते. हर्निया फार मोठा असल्यास किंवा डबलसॅक असल्यास अथवा हर्नियात आतडी अडकून काळीनिळी पडली असल्यास शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते. अडकलेल्या हर्नियात आतडय़ांचा रक्तप्रवाह अडकून ती काळीनिळी पडल्यास, गँगरीनचा भाग कापून काढून आतडी पुन्हा जोडावी लागतात. हर्निया काही कारणाने पुन्हा झाला, तर शस्त्रक्रिया अवघड होऊ शकते. काही वेळा हर्नियाच्या पिशवीत लघवीची पिशवी, मोठे आतडे, अपेंडिक्स, स्त्रियांमध्ये अंडकोष टय़ूब्स हे अवयव येऊ शकतात. याला स्लायडिंग हर्निया असे म्हणतात. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या हर्नियामध्ये आतील टाके तुटले असण्याची शक्यता असते, तसेच आतील अवयव व्रणाला चिकटले असण्याची शक्यता असते. यामुळे ही ऑपरेशन्स अतिशय सावधपणे करावी लागतात. पूर्वीच्या ऑपरेशनमुळे स्नायू अशक्त झाल्यामुळे ‘प्रोलीन मेश’ वापरणे अनिवार्य ठरते.
शस्त्रक्रियेनंतरच्या काळात कुठलीही गुंतागुंत होऊ नये आणि कमजोर स्नायूंना भरून येण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास हर्नियाचा उद्भव परत होण्याचे प्रमाण नगण्य होते.
१) ऑपरेशननंतर जोरात शिंकणे, खोकणे टाळावे.
२) मल-मूत्र विसर्जनासाठी जोर करू नये. 
३) शक्यतो कमोडचा वापर करावा.
४) ८-१० दिवस अंथरुणात आडवे पडून विश्रांती घ्यावी.
५) खाली बसणे टाळावे. खाली वाकू नये.
६) जिन्याचा वापर टाळावा.
७) ऑपरेशननंतर किमान दोन महिने जड वस्तू उचलणे, स्कूटरला किक मारणे, उंचावरून उडी मारणे, जिमला जाणे टाळावे. 
वरील सर्व काळजी घेतल्यास हर्नियाची समस्या यशस्वीपणे हाताळता येते.
उत्तर लिहिले · 14/9/2018
कर्म · 569245
1
या प्रश्नाचे उत्तर अगोदरच दिले आहे.
हर्निया म्हणजे काय, कशामुळे होतो व त्यावर उपाय काय?
उत्तर लिहिले · 15/7/2017
कर्म · 210095
0
हर्निया (Hernia) म्हणजे काय, तो कसा उद्भवतो आणि त्याच्या नवीन उपचार पद्धती: हर्निया म्हणजे शरीराच्या एखाद्या भागातून एखादा अवयव किंवा ऊती बाहेर येणे. विशेषत: पोटात हर्निया होण्याची शक्यता जास्त असते. हर्निया होण्याची कारणे:
  • जन्मजात दोष: काहीवेळा जन्मजात दोषांमुळे हर्निया होऊ शकतो.
  • वृद्धत्व: वय वाढल्यामुळे स्नायू आणि ऊती कमजोर होतात, ज्यामुळे हर्नियाचा धोका वाढतो.
  • जास्त वजन: जास्त वजनामुळे पोटावर दबाव येतो आणि हर्निया होऊ शकतो.
  • जोर लावणे: जास्त वजन उचलणे किंवा शौचाला जोर लावणे.
  • तीव्र खोकला: सतत खोकला येत असल्यास पोटाच्या स्नायूंवर दबाव येतो.
  • धूम्रपान: धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या कमजोर होतात आणि हर्नियाचा धोका वाढतो.
हर्नियाचे प्रकार:
  1. inguinal हर्निया: हा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो groin मध्ये होतो.
  2. incisional हर्निया: शस्त्रक्रियेनंतर scars मध्ये होतो.
  3. umbilical हर्निया: नाभीजवळ होतो, विशेषतः नवजात बालकांमध्ये.
  4. hiatal हर्निया: पोटात diaphragmatic opening मधून अन्ननलिका सरकते.
उपचार पद्धती:
  1. Open surgery: या पद्धतीत, सर्जन हर्नियाच्या जागी चीरा मारून बाहेर आलेला भाग परत आत टाकतात आणि स्नायू मजबूत करतात.
  2. Laparoscopic surgery: या शस्त्रक्रियेत लहान चीरे मारून दुर्बिणीच्या साहाय्याने हर्निया दुरुस्त केला जातो.
  3. Robotic surgery: ही Laparoscopic surgery सारखीच आहे, पण यात रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे अधिक अचूकता येते.
नवीन उपचार पद्धती:
  1. Mesh repair: हर्निया दुरुस्त करण्यासाठी mesh चा वापर केला जातो, ज्यामुळे तो भाग मजबूत होतो आणि पुन्हा होण्याची शक्यता कमी होते. Mayoclinic
  2. TAPP (Transabdominal preperitoneal): Laparoscopic पद्धतीने mesh repair करणे.
  3. TEP (Totally extraperitoneal): पोटाच्या आत न जाता mesh repair करणे.
हर्नियाच्या उपचारांसाठी योग्य पर्याय निवडण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1420

Related Questions

एड्सची लक्षणे कोणती?
गुप्तरोग कशामुळे होतात?
कुटुंब नियोजनाचे फायदे कोणते?
लैंगिक आरोग्य म्हणजे काय?
मूड स्विंग होत आहे?
मला सारखा थकवा जाणवतोय, सारखं झोपून राहावंसं वाटतंय. नेमकं मला काय झालं आहे?
आहार आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा?