
हर्निया
- जीवनशैलीत बदल: काही साध्या जीवनशैलीतील बदलांमुळे हर्नियाची लक्षणे कमी करता येतात.
- वजन कमी करणे: जास्त वजन असल्यास हर्नियावर दबाव येतो आणि त्रास वाढू शकतो.
- धूम्रपान टाळणे: धूम्रपान केल्याने खोकला येतो आणि हर्नियावर ताण येतो.
- बद्धकोष्ठता टाळणे: जास्त जोर लावल्याने हर्निया वाढू शकतो. त्यामुळे आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
- आहार: योग्य आहार घेतल्यास पचनक्रिया सुधारते आणि हर्नियाचा त्रास कमी होतो.
- फायबरयुक्त पदार्थ: फळे, भाज्या आणि धान्य यांचा आहारात समावेश करा.
- प्रथिने: मांस, अंडी, आणि डाळी यांसारख्या पदार्थांचे सेवन करा.
- पुरेसे पाणी प्या: दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या.
- शस्त्रक्रिया: हर्नियावर शस्त्रक्रिया हा एक प्रभावी उपाय आहे.
- ओपन शस्त्रक्रिया: या शस्त्रक्रियेत, सर्जन हर्नियाच्या जागी एक मोठा चीरा (cut) देतात आणि हर्निया ठीक करतात.
- लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया: या शस्त्रक्रियेत, लहान चीरे (cuts) देऊन दुर्बिणीच्या साहाय्याने हर्निया ठीक केला जातो.
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तुम्ही तज्ञ डाॅक्टरला दाखवून योग्य तो सल्ला घ्या.
कोणत्याही आजारात जेव्हा खूप जोर केला जातो तेव्हा पोटाचे स्नायू अशक्त असल्यास हर्निया होऊ शकतो. उदा. लहान मुलांमध्ये डांग्या खोकला, मोठय़ा माणसांमध्ये दमा, सततच्या धूम्रपानामुळे होणारा खोकला , बद्धकोष्ठ आणि त्या अनुषंगाने जोर करणे, लघवीसाठी जोर करणे विशेषत: वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेटसारखा त्रास असल्यास किंवा कधी कधी खूप जड वजन उचलण्यास हर्नियाची सुरुवात होऊ शकते. मात्र, हर्निया झाल्याचे लक्षात आल्यावर उशीर न करता सर्जनचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
आपल्या नातेवाइकांमध्ये किंवा आजूबाजूच्या कुणाला तरी ‘हर्निया’ (किंवा आंत्रगळ) झाला असे आपण बरेचदा ऐकतो. पण हर्निया झाला म्हणजे नक्की काय झाले हे माहीत नसते. हर्निया या मूळच्या लॅटिन शब्दाचा अर्थ काहीतरी फुटून बाहेर येणे, असा होतो. त्याची सरधोपट व्याख्या एखादा अवयव किंवा त्याचा भाग नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांमधून बाहेर येणे अशी आहे. बहुतांश हर्निया पोटाशी संबंधित असतात. आपल्या पोटातील आतडी किंवा त्याचा भाग त्याच्यावरील मेदाच्या आवरणासहित (omentum) पोटाच्या स्नायूंमधून बाहेर येतो. पोटाच्या खालच्या भागात हर्निया जास्त प्रमाणात आढळून येतात. उदा. जांघेत (७५ टक्के), मांडीच्या अगदी वरच्या भागात (१५ टक्के) आणि बेंबीत (८ टक्के) क्वचित फुप्फुस, मेंदू, स्नायू किंवा चरबी यांचा हर्निया होऊ शकतो. काही वेळा ऑपरेशनच्या व्रणातून हर्निया होऊ शकतो. अशा प्रकारच्या हर्नियाचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे. सिझेरियन किंवा कुटुंबनियोजनाच्या टाक्यांच्या ऑपरेशनमध्ये कधी कधी हर्निया होतो. या शस्त्रक्रिया हल्ली आडव्या छेदामधून केल्या जातात. त्यामुळे या प्रकारच्या हर्नियाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
१) स्त्रियांमध्ये काही वेळा गर्भारपणात, गर्भाशयाचा ताण पोटांच्या स्नायूवर पडून ते कमकुवत होतात किंवा पोटावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यास पोटाचे नळ मध्यभागापासून दूर सारले जातात आणि मध्यभागी छोटा खड्डा तयार होतो. या पोकळीतून आतडी बाहेर येतात. परंतु सहसा कधी अडकत नाहीत. वजन कमी करून व्यायामाने पोटाच्या स्नायूंचा टोन परत मिळवल्यास शस्त्रक्रियेची गरज पडत नाही.
२) लहान मुलांमध्ये काही वेळा बेंबी फुगलेली दिसते. मूल रडत असल्यास ते जास्तच प्रकर्षांने जाणवते. बेंबीत जिथे नाळ चिकटलेली असते तिथले स्नायू कमकुवत असतात. या प्रकारच्या हर्नियात घाबरून न जाता, डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यावा. बहुतेक वेळा वयाच्या चौथ्या वर्षांपर्यंत हा हर्निया आपोआप बरा होतो. मात्र, बेंबीवर तांब्याचे नाणे चिकटविणे, बँडेड लावणे असले प्रकार करू नयेत.
√हर्नियाची कारणे व उपाय
कोणत्याही आजारात जेव्हा खूप जोर केला जातो तेव्हा पोटाचे स्नायू अशक्त असल्यास हर्निया होऊ शकतो. उदा. लहान मुलांमध्ये डांग्या खोकला, मोठय़ा माणसांमध्ये दमा, सततच्या धूम्रपानामुळे होणारा खोकला , बद्धकोष्ठ आणि त्या अनुषंगाने जोर करणे, लघवीसाठी जोर करणे विशेषत: वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेटसारखा त्रास असल्यास किंवा कधी कधी खूप जड वजन उचलण्यास हर्नियाची सुरुवात होऊ शकते. काही वेळेला जन्मत: पोटाचे स्नायू अशक्त असतात. अशा व्यक्तींमध्ये उतारवयात जांघेत हर्नियाचा फुगा येतो (Direct Hernia). तरुणांमध्ये किंवा मुलांमध्ये Indirect Inguinal Hernia प्रामुख्याने आढळतो.
हर्निया झाल्याचे लक्षात आल्यावर उशीर न करता सर्जनचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हर्निया अडकून पोटात दुखू लागल्यास किंवा पोट फुगून गॅसेस आणि संडास बंद झाल्यास त्वरित ऑपरेशन करावे. हर्नियाचा फुगा आडवे पडल्यास, विश्रांती घेतल्यास आत जात असेल तर काही अवधीसाठी थांबणे शक्य असते. अशा वेळी धूम्रपान, बद्धकोष्ठ, दमा, लघवीचा अडथळा यांवरील उपाय करणे हितावह ठरते. स्थूल व्यक्तींनी आहार आणि चालण्यासारखे हलके व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पोटातल्या स्नायूंना बळकटी येऊन ऑपरेशनसाठी तसेच ऑपरेशननंतर आतील स्नायू भरून येण्यासाठी उपयोग होतो.
http://aaosairam.blogspot.com
शस्त्रक्रिया
हर्नियावरती शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे. शस्त्रक्रियेपूर्वी खोकला, मलावरोध किंवा लघवीच्या तक्रारींसाठी उपचार घेणे गरजेचे आहे. पन्नाशीनंतरच्या पुरुषांमध्ये सोनोग्राफी करून प्रोस्टेट वाढले नाही ना, याची शहानिशा करून घेतली जाते. खोकल्याचा त्रास असल्यास छातीचा एक्स-रे केला जातो. हिमोग्लोबीन, शुगरसारख्या रक्तचाचण्या केल्या जातात.
√शस्त्रक्रिया मुख्यत: दोन प्रकाराने केल्या जातात.
१) पारंपरिक पद्धतीने ओटीपोटावर छेद घेऊन.
२) लॅप्रोस्कोपिक पद्धतीने.
√पारंपरिक पद्धत
ओटीपोटावर खालच्या बाजूने २-३ इंचांचा आडवा छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. यात प्रथम हर्नियाची पिशवी आजूबाजूच्या आवरणापासून सोडवली जाते. पिशवीतील आतडी आणि ओमेंटम सोडवून पोटात पूर्वस्थितीत ठेवली जातात आणि पिशवीचे तोंड शिवून बंद केले जाते.
कमकुवत स्नायूंना मजबूती आणण्यासाठी हर्नियाच्या पिशवीमुळे दूर गेलेले स्नायू मूळपदावर आणले जातात. (Anatomical Repair) किंवा डबल प्रेस्टिंग केले जाते आणि हल्ली प्रोलीन मेश बसविली जाते.
√लॅप्रोस्कोपिक पद्धत
दुर्बिणीच्या साहाय्याने बेंबीजवळ आणि ओटीपोटात छेद घेऊन अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. पोटाच्या आतून हर्नियाचे छिद्र बुजवून ‘प्रोलिन मेश’ घातली जाते. हर्निया फार मोठा असल्यास किंवा डबलसॅक असल्यास अथवा हर्नियात आतडी अडकून काळीनिळी पडली असल्यास शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते. अडकलेल्या हर्नियात आतडय़ांचा रक्तप्रवाह अडकून ती काळीनिळी पडल्यास, गँगरीनचा भाग कापून काढून आतडी पुन्हा जोडावी लागतात. हर्निया काही कारणाने पुन्हा झाला, तर शस्त्रक्रिया अवघड होऊ शकते. काही वेळा हर्नियाच्या पिशवीत लघवीची पिशवी, मोठे आतडे, अपेंडिक्स, स्त्रियांमध्ये अंडकोष टय़ूब्स हे अवयव येऊ शकतात. याला स्लायडिंग हर्निया असे म्हणतात. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या हर्नियामध्ये आतील टाके तुटले असण्याची शक्यता असते, तसेच आतील अवयव व्रणाला चिकटले असण्याची शक्यता असते. यामुळे ही ऑपरेशन्स अतिशय सावधपणे करावी लागतात. पूर्वीच्या ऑपरेशनमुळे स्नायू अशक्त झाल्यामुळे ‘प्रोलीन मेश’ वापरणे अनिवार्य ठरते.
शस्त्रक्रियेनंतरच्या काळात कुठलीही गुंतागुंत होऊ नये आणि कमजोर स्नायूंना भरून येण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास हर्नियाचा उद्भव परत होण्याचे प्रमाण नगण्य होते.
१) ऑपरेशननंतर जोरात शिंकणे, खोकणे टाळावे.
२) मल-मूत्र विसर्जनासाठी जोर करू नये.
३) शक्यतो कमोडचा वापर करावा.
४) ८-१० दिवस अंथरुणात आडवे पडून विश्रांती घ्यावी.
५) खाली बसणे टाळावे. खाली वाकू नये.
६) जिन्याचा वापर टाळावा.
७) ऑपरेशननंतर किमान दोन महिने जड वस्तू उचलणे, स्कूटरला किक मारणे, उंचावरून उडी मारणे, जिमला जाणे टाळावे.
वरील सर्व काळजी घेतल्यास हर्नियाची समस्या यशस्वीपणे हाताळता येते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- आरोग्य मित्र
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
*http://aaosairam.blogspot.com*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*
हर्निया (Hernia): हर्निया म्हणजे शरीराच्या एखाद्या भागातून एखादे इंद्रिय किंवा ऊती बाहेर येणे.
आतड्याचा गॅंगरिन (Intestinal Gangrene): जेव्हा हर्नियामध्ये अडकलेल्या आतड्याला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा ते सडू लागते. या स्थितीला आतड्याचा गॅंगरिन म्हणतात.
गॅंगरिन होण्याची कारणे:
- रक्तपुरवठा कमी होणे
- संसर्ग (Infection)
- आतड्याला झालेली दुखापत
लक्षणे:
- तीव्र पोटदुखी
- ज्वर (Fever)
- हृदय गती वाढणे
- उलट्या होणे
उपचार: गॅंगरिन झाल्यास तातडीने शस्त्रक्रिया (surgery) करणे आवश्यक आहे.
धोका: जर उपचार वेळेवर नाही झाले, तर ते जीवघेणे ठरू शकते.
- तीव्र वेदना: हर्नियाच्या ठिकाणी अचानक आणि असह्य वेदना सुरू होणे.
- सूज आणि लालसरपणा: प्रभावित भागात सूज येणे आणि त्वचा लाल होणे.
- ताप: शरीराचे तापमान वाढणे (100.4°F किंवा 38°C पेक्षा जास्त).
- हृदय गती वाढणे: नाडीची गती वाढणे.
- उलट्या आणि मळमळ: पोटात गडबड होणे आणि उलट्या होणे.
- त्वचेचा रंग बदलणे: हर्नियाच्या आजूबाजूची त्वचा काळी किंवा निळसर दिसणे, जो गॅंग्रीनचा संकेत आहे.
- दुर्गंध: प्रभावित भागातून दुर्गंध येणे.
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील, तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. गॅंग्रीन एक गंभीर स्थिती आहे आणि त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ला म्हणून वापरली जाऊ नये.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
अगदी सोप्या शब्दात सांगायचं, तर आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया होतो. हर्निया होतो, म्हणजे आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो.
हर्निया म्हणजे आंत्रगळ किंवा आंत्रवृद्धी किंवा अंत्रनिःसरण. पोटातील कमजोर स्नायूंमुळे निर्माण झालेल्या पोकळीत आतडी ओढली जाते. त्यामुळे पोट फुगतं किंवा छोटा-मोठ्या आकाराचा फुगवटा दिसायला लागतो आणि पोट दुखायला लागतं. हर्निया पुरुष, स्त्रिया तसंच कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला होऊ शकतो. हर्नियाची लक्षणं किरकोळ वाटली, तरी ती कधीही आढळू शकतात. बालकांमध्ये आढळणारा डांग्या खोकला, सज्ञान व्यक्तींमध्ये असलेला दमा, धूम्रपानामुळे येणारा खोकला तसंच अतिजड वस्तू, वजन उचलल्यामुळे हर्निया होतो.
हर्नियाकडे दुर्लक्ष केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. अचानक आतडं अडकल्यामुळे जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. अचानक मोठ्या झालेल्या हर्नियामुळे त्यात अडकलेल्या आतड्याचं गँगरीनही होऊ शकतं.
स्त्रियांमधील हर्निया
गरोदर स्त्रियांची सिझेरियन पद्धतीनं झालेली शस्त्रक्रिया किंवा कुटुंबनियोजनाच्या टाक्यांच्या शस्त्रक्रियेतील व्रणातून हर्निया होतो. आडव्या छेदातून शस्त्रक्रिया होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे आता अशा प्रकारे होणाऱ्या हर्नियाचं प्रमाण कमी झालं आहे. गरोदर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा ताण पोटांच्या स्नायूवर पडतो. त्यामुळे ते कमजोर बनतात. पोटावर जास्तीची चरबी निर्माण झाल्यास पोटात पोकळी निर्माण होते आणि आतडी बाहेर येते.
बालकांमधील हर्निया
लहान मुलांच्या बेंबीमध्ये नाळ चिकटलेल्या ठिकाणचे स्नायू कमजोर असतात. लहान मूल रडताना बऱ्याचवेळा बेंबी फुगलेली दिसते. हे लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अनेकदा वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बालकांमधील हर्निया बरा होतो.
पुरुषांमधील हर्निया
पोटातील आतडी त्या भागाच्या वर असलेल्या मेदाच्या आवरणासहित स्नायूंमधून बाहेर येण्याचं प्रकार पुरुषांमध्ये अधिक आढळून येतात. पोटाचे स्नायू जन्मतः कमजोर असल्यास उतारवयात जांघेत हर्नियाचा फुगा तयार होतो. या प्रकाराला प्रत्यक्ष हर्निया असं संबोधलं जातं. तरुण मुलांमध्ये अप्रत्यक्ष जांघेचा (इन्ग्विनल) हर्निया मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जांघेच्या वरच्या बाजूला हा हर्निया निर्माण झालेला असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास वीर्योत्पादक ग्रंथीतील रक्तस्रावावर परिणाम होऊ शकतो.