व्यक्तिमत्व चित्रपट चरित्र

मनोहर सुर्वेची जीवन कहाणी कशी होती?

3 उत्तरे
3 answers

मनोहर सुर्वेची जीवन कहाणी कशी होती?

9
मनोहर अर्जुन सुर्वे,ऊर्फ मन्या सुर्वे हा एक 70 व 80 च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा.या मन्याला 11 जानेवारी,1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते.मन्या सुर्वेला दुपारी 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले.मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता.भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला लाईव्ह एनकाऊंटर होता.

मन्या सुर्वे हा सुशिक्षित व हुशार मराठी विद्यार्थी होता.पदवीच्या परीक्षेत त्याला 78 टक्के मार्क मिळाले होते.मराठी कुटुंबात वाढलेला मन्या शालेय व महाविद्यालयीन काळात एक'सोबर'मुलगा होता.मात्र तो गुन्हेगारी क्षेत्रातील आपल्या थोरल्या भावामुळे अडचणीत येत गेला व गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला व पुढे अंडरवर्ल्डचा डॉन बनला.त्याकाळी त्याची मोठी दहशत होती.त्याचा गेम तत्कालीन एसीपी इसाक बागवान यांनी केला होता.ते मूळचे बारामतीचे आहे

मन्या मुंबई पोलिसासाठी डोकेदुखी बनला होता.मन्याला पकडण्यासाठी पोलिस जंग-जंग करीत होती मात्र,मन्या हाताला लागत नव्हता.अखेर मुंबई सीआयडीने मन्याच्या प्रेयसीमार्फत त्याचा माग काढला व त्याचा काटा काढण्याचे ठरविले.अखेर मन्या सुर्वेला मारण्यात पोलिसांना यश मिळाले.
उत्तर लिहिले · 11/7/2017
कर्म · 9050
1
Shootout at wadala
बघा.................................


.
..........
उत्तर लिहिले · 11/7/2017
कर्म · 235
0

मनोहर अर्जुन सुर्वे, ज्यांना मन्या सुर्वे म्हणून ओळखले जाते, हे 1970 आणि 1980 च्या दशकातील मुंबई शहरातील एक कुख्यात गुंड होते. त्यांची जीवनकहाणी गुन्हेगारी जगतात वेगाने वाढलेली आणि हिंसक घटनांनी भरलेली आहे.

सुरुवात आणि शिक्षण: मन्या सुर्वे यांचा जन्म 1944 मध्ये झाला. त्यांचे बालपण मुंबईत गरिबीत गेले. त्यांनी शिक्षण चांगले घेतले होते आणि ते पदवीधर होते.

गुन्हेगारी जगतात प्रवेश: परिस्थितीमुळे ते गुन्हेगारी जगताकडे आकर्षित झाले. त्यांनी खंडणी, मारामारी आणि अवैध धंद्यांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. लवकरच ते आपल्या हिंसक आणि क्रूर स्वभावामुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रसिद्ध झाले.

गुन्हेगारी कारकीर्द: मन्या सुर्वेने आपल्या टोळीच्या माध्यमातून अनेक गुन्हे केले. त्यांनी अनेक हत्या, लूट आणि धमक्या देऊन लोकांकडून पैसे उकळले. मुंबई शहरात त्याचे नाव वचक निर्माण करणारे बनले होते.

पोलिसांशी चकमक आणि मृत्यू: 11 जानेवारी 1982 रोजी, वडाळा येथे मुंबई पोलिसांनी मन्या सुर्वेला एका चकमकीत ठार केले. ही चकमक भारतीय गुन्हेगारी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते.

मन्या सुर्वेच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ज्यामुळे त्यांची कथा आजही लोकांमध्ये जिवंत आहे.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2200

Related Questions

म. फुले यांचे चरित्र मिळवून वाचा?
नारबाची आत्मकथा थोडक्यात लिहा?
शिवाजी महाराज यांच्यावर पहिला ग्रंथ कोणत्या युरोपियन व्यक्तीने लिहिला?
छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले ग्रंथ कोणी लिहिले?
महिला कीर्तनकार जैतुनबी यांच्याबद्दल माहिती द्या?
भाऊसाहेब खिलारे पुणे कोण आहेत?
भाऊसाहेब खाणारे, पुणे कोण आहेत?