ऐतिहासिक व्यक्ती इतिहास

वेडात मराठे वीर दौडले सात ते कोण कोण होते, त्यामागचा इतिहास कळेल का?

2 उत्तरे
2 answers

वेडात मराठे वीर दौडले सात ते कोण कोण होते, त्यामागचा इतिहास कळेल का?

18
मित्रानो जय जिजाऊ, जय शिवराय
वेडात मराठे वीर दौडले सात यामागचा इतिहास

बहलोलखान याने रयतेवर अन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश प्रतापरावांना दिला.मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली,व तो गनीम जिव वाचवून गेला.पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली. त्या पत्रात एक वाक्य होत जे प्रतापरावांच्या जिवास लागल.शिवरायांनी म्हटल होत की “बहलोलखानास पकडल्या शिवाय मला तोंड दाखवु नये”.हे वाक्य वाचुन त्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली.

वेडात मराठे वीर दौडले सात…..त्या सात योद्धांची नावे….
१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७)सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
उत्तर लिहिले · 30/6/2017
कर्म · 210095
0

'वेडात मराठे वीर दौडले सात' हे दिगपाल लांजेकर दिग्दर्शित २०२३ मधील मराठी ऐतिहासिकAction drama film आहे. चित्रपटाची कथा 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सेट केलेली आहे.

या चित्रपटातील 'सात' वीरांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • शिवाजी महाराज: हे पात्र स्वतः दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी साकारले आहे.
  • सरसेनापती प्रतापराव गुजर: अभिनेते प्रवीण तरडे यांनी ही भूमिका साकारली आहे.
  • जिवाजी(Jivaji) : ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशी याने साकारली आहे.
  • दिंडोजी(Dindoji) : ही भूमिका अभिनेता विशाल निकम याने साकारली आहे.
  • सर्जा(Sarja) : ही भूमिका अभिनेता विराजस कुलकर्णी याने साकारली आहे.
  • Hanumantrao : ही भूमिका अभिनेता अक्षय टंकसाळे याने साकारली आहे.
  • भैरजी(Bhairji) : ही भूमिका अभिनेता जय दुधाने याने साकारली आहे.

कथेचा इतिहास:

चित्रपटाची कथा १६७४ च्या दरम्यानची आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सात शूर मराठा योद्ध्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून एका मोठ्या संकटाचा सामना केला.

या चित्रपटात ते सात वीर कोण होते, त्यांनी कोणत्या परिस्थितीत आपल्या प्राणांची आहुती दिली, हे दाखवण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5280

Related Questions

छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते?
दक्षिण मोहीम झाल्यानंतर तब्येत सुधारण्यासाठी शिवाजी महाराज कोणत्या गडावर राहिले होते?
शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या?
अष्टप्रधान मंडळ आणि शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला?
शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण होते?
रोहिला सरदारांची ऐतिहासिक घटना, ठिकाण, व्यक्ती आणि समाधीची नावे लिहा.