औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय कोलेस्टेरॉल आरोग्य

मला कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, घरच्या घरी करण्यासारखे उपाय कोणते?

2 उत्तरे
2 answers

मला कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, घरच्या घरी करण्यासारखे उपाय कोणते?

3
रक्तातल्या कॉलेस्टेरॉलची पातळी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. थोडा अनुवांशिकतेचा पण भाग असतो.

आपल्या नियत्रणांत असलेले उपाय खालील प्रमाणे :
रक्तातले कॉलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहारातले कॉलेस्टेरॉल कमी करणे हा एक भाग. अंड्यातले पिवळे, होल दूध, कलेजी, कोळंबी, चीझ इत्यादी. कुठल्याही कॉलेस्टेरॉलचे बिल्डिंग ब्लॉक्स असलेले स्निग्ध पदार्थ कमी करणे हा अजून एक भाग - खोबरे, खोबरेल तेल, रुम टेम्परेचरला घनरुप होणारे डालडा इत्यादी.



सोल्यूबल फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने त्याला लागून रक्तातले अतिरिक्त कॉलेस्टेरॉल अन त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स शरीराबाहेर फेकले जातात. अशा पदार्थाचे आहारात प्रमाण वाढवणे हा तिसरा भाग पालेभाज्या , सालासकट खाल्ली जातील अशी कडधान्ये

एरोबिक + थोडे तरी वेट लिफ्टिंग / स्ट्रेन्थ ट्रेनिंग व्यायाम करुन एच डी एल कॉलेस्टेरॉल वाढवणे हा चौथा भाग.

या शिवाय सिगरेट , अतिरिक्त मद्यसेवन, सोडावे , स्ट्रेस मॅनेज करावा, मेडिटेशन करावे .
आहार, झोप नियमित असावे.

आहार:
आपल्या आहारात ओटचे जाडे भरडे एक वाटी पीठ असावे. तसेच अक्रोड, बदाम, काजू यांचे तुकडे खावेत. ऑलिव्ह तेलचा वापर करावा. कोशिंबीरमध्ये चीज, मांस, मासे यांचा वापर करावा. जेणेकरून कोलोस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकता.

१. ओटचे पीठ - ओटमध्ये उच्च फायबर असते. त्यामुळे आहारात ओटचा वापर करावा. ओटमुळे वाईट कोलोस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ओट पीठाचे मिश्रण करुन घ्यावे. सोबत सफरचंद, केळं खाल्लेतरी चालेल.

२. माशांच्या आहात वापर - आहारात मासे घेतल्याने निरोगी हृदय राहते. ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् चे प्रमाण असते. त्यामुळे याचा फायदा हृदयाला मिळतो. माशाच्या तेलामुळे अकस्मात मृत्यूवर मात करता येते. कोलोस्ट्रॉल कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा तरी मासे खाणे आवश्यक आहे. खाऱ्या, गोड्या पाण्यातील मासे खावेत. यातून ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् अधिक मिळते.

३. अक्रोड, बदाम आणि काजू - अक्रोडचे तुकडे, बदाम आणि काजू रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करु शकते. अक्रोडाचे तुकडे देखील निरोगी रक्तवाहिन्या ठेवण्यास मदत करते. शेंगदाणे, पिस्ता यांचा आहारात वापर करावा.

४. ऑलिव्ह तेल - ऑलिव्ह तेलाचा वापर केला तर आपले "वाईट" (LDL) कोलेस्ट्रॉल कमी होते. तर आपले "चांगले" (HDL) कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. या तेलात फॅक्ट कमी असल्याने २ चमचे याचा (२३ ग्रॅम) आहारात वापर करावा. त्यामुळे हृदयही निरोगी राहते. ऑलिव्ह तेल भाजीत टाकावे. किंवा लोण्याचाही वापर करु शकता.
उत्तर लिहिले · 26/6/2017
कर्म · 80330
0
कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. जीवनशैलीत बदल करून तुम्ही कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवू शकता. काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे:
  1. आहार:
    • ओट्स (Oats): ओट्समध्ये विरघळणारे फायबर (Soluble fiber) असते, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
    • शेंगदाणे आणि बिया (Nuts and seeds): बदाम, अक्रोड, चिया सीड्स (Chia seeds) आणि फ्लेक्स सीड्स (Flax seeds) हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.
    • फळे आणि भाज्या (Fruits and Vegetables): सफरचंद, केळी, संत्री आणि पालेभाज्यांमध्ये फायबर भरपूर असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.
    • लसूण (Garlic): लसूण खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते.
  2. नियमित व्यायाम:
    • रोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. चालणे, धावणे, सायकल चालवणे किंवा योगा केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते.
  3. वजन नियंत्रित ठेवा:
    • जास्त वजन असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
  4. धूम्रपान टाळा:
    • धूम्रपान केल्याने 'एचडीएल' (HDL) कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, त्यामुळे ते टाळा.
  5. पुरेशी झोप घ्या:
    • दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

हे उपाय सामान्य माहितीवर आधारित आहेत. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2200

Related Questions

कोलेस्टॉल म्हणजे काय?