4 उत्तरे
4 answers

क्षितिज म्हणजे काय?

2
!!!!!!!!!!!!!!!!! क्षितिज म्हणजे आकाश !!!!!!!!!!!!!!!!
उत्तर लिहिले · 4/6/2017
कर्म · 2435
0


क्षितिज म्हणजे नक्की काय


जिथे आकाश जमिनीला टेकले आहे असा आभास निर्माण होतो, किंवा 'जिथे सागरा धरणी मिळते' असं वाटतं ते टोक म्हणजे क्षितिज. डोंगराप्रमाणेच आपण एखाद्या दूरवर पसरलेल्या विस्तीर्ण किंवा सपाट माळावर किंवा समुद्रावर उभे राहून आजूबाजूला पाहिल्यास, आकाश पृथ्वीला वर्तुळाकार रेषेत चिकटलेले दिसते, या वर्तुळालाच क्षितिज म्हणतात. असं हे आपल्या डोळ्यांना दृश्य स्वरुपात दिसणारं क्षितिज मुळात काय असतं? त्याचा वापर कुठे आणि कसा करतात हे आपण जाणून घेऊया.




आपण भूगोलाचा अभ्यास करताना शिकलो, की पृथ्वीवर दक्षिण आणि उत्तर असे दोन ध्रुव आहेत. या दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पनेच्या आधारे आखलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला ‘विषुववृत्त' म्हणतात. जमिनीवरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. या वृत्तामुळे पृथ्वीच्या गोल भूपृष्ठाचे दोन समान भाग पडतात. या दोन्ही पृष्ठभागाला जिथे आकाश चिटकलेला असतो तो भास क्षितिज आहे.. या अक्षवृत्त आणि रेखावृत्तांमुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते. खरंतर अक्षवृत्त रेखावृत्त, विषुववृत्त या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत परंतु यांच्यामुळेच घटनाक्रम, पृथ्वीवरील एखादे ठिकाण निश्चित करणे अत्यंत सोपे जाते. क्षितिजाचा उल्लेख आपल्याला साहित्यात ही बर्‍याच कवींनी, लेखकांनी केल्याचे लक्षात येते. ‘‘काढ सखे गळय़ांतील तुझे चांदण्याचे हात। क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’’ हे लोकप्रिय भावगीत ऐकतांना क्षितिज हा शब्द सहज मनांत रेंगाळला. हे क्षितिज काय आहे? कसे आहे? कोठे आहे? केव्हापासून आहे? त्याच्या पलीकडे काय आहे?असे कितीतरी प्रश्न आपल्या मनात सहज येतात. तसे पाहिले तर क्षितिज म्हणजे कधीच जवळ न येणारी पण सतत दिसणारी भूमी व आकाश यांच्या मीलनाची सीमारेषा. ती दिसते पण जवळ जावे तसतशी दूर जाते. ही रेषा काल्पनिक आहे म्हणूनच ती आपल्या हाती कधीच येऊ शकत नाही. म्हणजेच क्षितिज हा भास आहे, वास्तव नव्हे. पूर्व क्षितिज व पश्चिम क्षितिज ही दोन क्षितिजे आपण नेहमी अनुभवतो. कारण सकाळी सूर्य उगवतो आणि तो संध्याकाळी मावळतो तेव्हा क्षितिजातच गेल्याचा भास होतो.
उगवतीचे रंग व मावळतीचे रंग, सूर्योदय व सूर्यास्त, चंद्रोदय व चंद्रास्त, पूर्व व पश्चिम दिशांनी होतात, म्हणूनच ही दोन्ही क्षितिजेच रंगछटांनी नटतात. सूर्योदयावेळी पूर्व क्षितिजाकडे जाणारे पक्षी आणि सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा परतणारे पक्षीगण मनाला आनंद देऊन जातात. सागराच्या रम्य किनारी ही क्षितिज शोभा अप्रतिम दिसते हे अनुभवल्याशिवाय कळणार नाहीच. एका गोलार्धात उगवतीचे क्षितिज हे दुसऱ्या गोलार्धातील मावळतीचे क्षितिज असते हेही आपण सहज समजू शकतो. पूर्व व पश्चिम क्षितिजे सूर्याच्या उदयास्तानुसार रंगछटांची विविधता, उधळण दाखवितातच. पण पावसाळय़ात ऊन-प्रकाशाच्या खेळात इंद्रधनुष्याचे मनोहारी रूपदर्शन सुद्धा घडवितात. या क्षितिजाप्रमाणे अनेक शब्द किंवा संकल्पना ह्या काल्पनिक असल्या तरी आपण त्यांना मानतो त्यांच्या मागे मागे धावतो. असाच एक शब्द म्हणजे मृगजळ. जंगलात फिरणार्‍या हरिणीला बाहेर रस्त्यावर सूर्याची किरणे पडल्यावर पाणी असल्याचा भास होतो. आपण ही वाहनांमधून प्रवास करताना हे मृगजळ दिसते पण प्रत्यक्षात तिथे पोहोचल्यावर काहीच नसते. म्हणून मला वाटतं की क्षितिज हा केवळ भास असला तरी तो आपल्या आशा कायम ठेवतो.त्यामुळे क्षितिज ही संकल्पनाच मनाला भावणारी आहे. ज्याला क्षितिज नाही ते जीवनच नाही. त्यामुळे आपण ज्या ज्या गोष्टींची आशा धरतो, त्यांच्या मागे मागे जातो त्या त्या गोष्टी गायब होत असल्या तरी जगण्याची उमेद देतात.
उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 53720
0

क्षितिज म्हणजे पृथ्वी आणि आकाश यांना जोडणारी एक काल्पनिक रेषा.

व्याख्या: क्षितिज म्हणजे निरीक्षकाच्या दृष्टीने पृथ्वीचा पृष्ठभाग आणि आकाश एका विशिष्ट ठिकाणी मिळत असल्याचा भास होतो, ती रेषा.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपण उभे राहून जेव्हा दूरवर पाहतो, तेव्हा जमीन आणि आकाश एका ठिकाणी भेटल्यासारखे दिसते, त्या रेषेला क्षितिज म्हणतात.

क्षितिजाचे स्थान निरीक्षकाच्या उंचीनुसार बदलते. उदाहरणार्थ, उंच ठिकाणी उभे राहिल्यास क्षितिज अधिक दूर दिसते, तर खाली जमिनीवर उभे राहिल्यास ते जवळ दिसते.

क्षितिजाचे प्रकार:

  • खरे क्षितिज (True Horizon): हे निरीक्षकाच्या सापेक्ष पृथ्वीच्या स्पर्शरेषेने (tangent) तयार होते.
  • दृष्य क्षितिज (Apparent Horizon): वातावरणातील प्रकाशामुळे आणि इतर घटकांमुळे दिसणारे क्षितिज.

महत्व: क्षितिज हे दिशा आणि स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. नेव्हिगेशन (Navigation) आणि खगोलशास्त्रात (Astronomy) याचा उपयोग होतो.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 980

Related Questions

I love you म्हणजे काय?
आम्ल, आम्लारी, क्षार, धातू, अधातू यांची व्याख्या आणि उदाहरण लिहा?
अनुरूप म्हणजे काय?
कलाकार म्हणजे काय ते सांगा?
अस्ताई चा अर्थ काय?
वाड्मयीन म्हणजे काय?
गृहव्यवस्थापन व्याख्या लिहा?