कायदा भारतीय दंड संहिता पोटगी

पोटगी संदर्भात माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

पोटगी संदर्भात माहिती मिळेल का?

5
स्वातंत्र्यानंतर जेव्हा हिंदू कोड बिलाद्वारे हिंदूंसाठी 1955-56 मध्ये विविध कायदे केले गेले, त्यातच हिंदू दत्तक व पोटगीचा कायदा संसदेने मंजूर केला.

पोटगी ही अवलंबून असलेल्या बायकांसाठी असतेच, अशा वेळी तिच्या नवऱ्याची ही कायदेशीर जबाबदारी असते, याशिवाय ज्या स्त्रीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे अशा विधवा सुनेसाठी तिच्या सक्षम सासऱ्याच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह होणे आवश्‍यक ठरते. याशिवाय लहान, अज्ञान मुलांचे पालनपोषण, वयोवृद्ध व्यक्तींचे पालनपोषण याशिवाय त्याचे वा तिचे आई, वडील, विधवा, अविवाहित मुलगी वा पूर्वमृत मुलाची अविवाहित कन्या व मुलगा वा पत्नी (विधवा) यांचा यात समावेश होतो. याशिवाय मृत हिंदू व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्याचे पालनपोषण मृताच्या संपत्तीतून होणे आवश्‍यक ठरते किंवा ज्यांच्याकडे मृताची संपत्ती जाते त्यांच्यावर मृत व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी ठरते. अशा वेळी जबाबदारीचा हिस्सा त्याला मिळालेल्या मिळकतीच्या हिश्‍श्‍यावर ठरतो. याचाच अर्थ पोटगी ही अवलंबून असणाऱ्या व स्वतः सक्षम नसणाऱ्या इसमासाठी मिळकत/ संपत्ती व उत्पन्नानुसार ठरत असते.

प्रत्येक हिंदू पत्नी पोटगीस पात्र ठरते, अशी पत्नी तिच्या पतीपासून विभक्त राहूनही पोटगी मिळण्यास पात्र ठरते; मात्र त्यासाठी-
1) तिच्या संमतीशिवाय विशेष कारण नसतानाही वा मुद्दाम दुर्लक्षित करून वेगळे राहावयास भाग पाडत असेल तर...
2) तिचा छळ करत असेल व त्यामुळे वेगळे राहणे भाग असेल तर..
3) तिच्या पतीला बरा न होणारा कुष्ठरोग झाला असेल तर..
4) त्याची दुसरी जिवंत पत्नी असेल तर..
5) जर त्याने हिंदू धर्म सोडला असेल तर..
6) त्याने दुसऱ्या स्त्रीशी रखेल म्हणून घरोबा केला असेल तर..
7) इतर पटणारी कारणे, की ज्याद्वारे एकत्र राहणे शक्‍य नाही..
अशी स्त्री हिंदू न राहिल्यास वा व्यभिचारी असल्यास वेगळे राहण्यास पर्यायाने पोटगीसाठी पात्र नसते.

पोटगी किती असावी? ः 
किती पोटगी असावी याचा निर्णय संबंधित कोर्टावर अवलंबून असतो. यामध्ये 
श्रपक्षकाराची सामाजिक प्रतिष्ठा. श्रपक्षकाराची योग्य मागणी. श्रजो पक्षकार स्वतंत्र राहात आहे त्याची निकड. श्रज्याच्याकडून पोटगी मिळवायची त्याची मालमत्ता व नियमित अथवा अनियमित उत्पन्न. श्रकिती पक्षकारांना पोटगीची गरज आहे. श्रमृत्युपत्र असल्यास त्यातील तरतुदी. श्रदोघांच्या नात्यातील तीव्रता. श्रपक्षकाराच्या गरजा. श्रपूर्वीचे नातेसंबंध.
अशा प्रकारे अदा केलेली परिस्थिती बदलल्यास पोटगीची रक्कम बदलू शकते, मात्र पोटगीपेक्षा सदर मिळकतीवर असलेल्या कर्जाच्या देयाची प्रथम प्राथमिकता असते हेही लक्षात घेणे आवश्‍यक ठरते.
पोटगीचा कायदा करूनही बऱ्याचशा समस्या न सुटल्याने व दिवाणी दावे वर्षानुवर्षे चालल्याने पक्षकाराचे होणारे हाल बघून फौजदारी प्रक्रिया कायदा कलम 125 ते 128 मध्ये सुधारणा करून पोटगीची मागणी फौजदारी कायद्याअंतर्गत त्वरित निवाडा व्हावा म्हणून करण्यात आली. यात पगार, मिळकती, ठेवी जप्त करणे, अंतरिम पोटगीचा आदेश देणे वगैरे अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत; तसेच हिंदूंशिवाय इतरांना मिळणाऱ्या पोटगीचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

साभार: agrowon.com

उत्तर लिहिले · 27/5/2017
कर्म · 283280
0
पोटगी म्हणजे काय, त्याचे प्रकार, कायद्यातील तरतूद आणि अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे:
पोटगी म्हणजे काय?

पोटगी म्हणजे विवाहानंतर पत्नीला तिच्या गरजा भागवण्यासाठी तसेच जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे. বিবাহानंतर काही कारणास्तव जर पती-पत्नी विभक्त झाले, तर पत्नीला आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून तिला पोटगी दिली जाते.

पोटगीचे प्रकार:
  • अंतरिम पोटगी: जेव्हा घटस्फोटाचा खटला कोर्टात चालू असतो, तेव्हा पत्नीला तात्पुरती आर्थिक मदत दिली जाते, तिला अंतरिम पोटगी म्हणतात.
  • कायमस्वरूपी पोटगी: घटस्फोट झाल्यानंतर कोर्टाकडून पत्नीला कायमस्वरूपी पोटगी देण्याचा आदेश दिला जातो. ही पोटगी एकरकमी किंवा मासिक स्वरूपात असू शकते.
पोटगीसाठी कायद्यातील तरतूद:

हिंदू विवाह कायदा, कलम 24 आणि 25 अन्वये पोटगीची तरतूद आहे. या कायद्यानुसार, पत्नी तसेच काही विशिष्ट परिस्थितीत पतीदेखील पोटगी मागू शकतात.

पोटगी अर्ज कसा करावा?
  • पोटगी मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करावा लागतो.
  • अर्ज दाखल करताना विवाह प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
  • कोर्ट दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देते.
पोटगी किती मिळू शकते?

पोटगीची रक्कम ठरवताना कोर्ट पती-पत्नी दोघांची आर्थिक परिस्थिती, त्यांची गरज आणि इतर बाबी विचारात घेते. साधारणपणे, पतीच्या उत्पन्नाच्या 1/5 (एक पंचमांश) भाग पोटगी म्हणून दिला जातो, परंतु हे प्रमाण बदलू शकते.

टीप:

पोटगी हा विषय कायदेशीर असल्याने, अधिक माहितीसाठी वकिलाचा सल्ला घेणे उचित राहील.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स:
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1100

Related Questions

पोटगीची रक्कम भरायची कशी टाळावी?
मुलगा कमावत नसेल तर पोटगी?
पोटगीचा वसुली वॉरंट कसा रद्द करायचा?
नवऱ्याला पोटगी मिळते का?
पोटगी नाही देऊ शकत मी, पण पुढे काय नियम असतील?
पोटगी नाही दिली तर काय काय होईल?
मुलीला पोटगी सरसरी किती मिलते?