औषधे आणि आरोग्य
वैद्यकीयशास्त्र
घरगुती उपाय
रक्तदाब
आरोग्य
मला लो बी. पी. (Low Blood Pressure) आहे. ते कशामुळे होते? आपल्या शरीरात काय बदल होतात? त्यावर काही उपाय आहे काय?
3 उत्तरे
3
answers
मला लो बी. पी. (Low Blood Pressure) आहे. ते कशामुळे होते? आपल्या शरीरात काय बदल होतात? त्यावर काही उपाय आहे काय?
2
Answer link
मेथीची भाजी अजिबात खाऊ नका, कॉफी प्या. हे सर्व तुम्ही टेन्शन घेतल्यामुळे होते. मक्याची कणसे अजिबात खाऊ नका.
2
Answer link
बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.
रक्तदाब कमी झाल्यानंतर या गोष्टी करा :
१. पाठीवर झोपा :
बीपी लो झाला की अचानक डोळ्यांसमोर अंधारी येणे, गरगरल्या सारखे वाटतं. त्यानंतर ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.
२. ओरल रिहायड्रेशन सॉल्ट :
ओआरएस शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा आणि त्याचे मिश्रण बनवून प्या. मधूमेह म्हणजेच डायबिटीस असल्यासं ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरे देखील असते.
३. पाणी प्या :
ओआरएस नसल्यास पाणी प्या. पाण्यामध्ये थोडं मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मिठातील सोडीयम रक्तदाब नियंत्रित करतो तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करते.
४. मीठ चाखा :
रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा देखील उपाय करु शकतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अती प्रमाणात घेऊ नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
५. डॉक्टरांचा सल्ला :
रक्तदाब स्थिरावल्यानंतर सामान्य झालात की डॉक्टांचा सल्ला घ्या. रक्तदाब कमी का झाला याचे निदान होणे गरजेचे आहे. रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नका याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित तपासून घ्या.

0
Answer link
लो बी.पी. (Low Blood Pressure) म्हणजे रक्तदाब कमी असणे. सामान्य रक्तदाब १२०/८० mmHg असतो, तर लो बी.पी. मध्ये रक्तदाब ९०/६० mmHg पेक्षा कमी असतो.
लो बी.पी. होण्याची कारणे:
- डिहायड्रेशन (Dehydration): शरीरात पाण्याची कमतरता असणे.
- हृदयविकार: हृदय व्यवस्थित रक्त पंप करू शकत नसल्याने रक्तदाब कमी होतो.
- एंडोक्राईन समस्या: थायरॉईड (Thyroid) किंवा ॲड्रिनल ग्रंथी (Adrenal gland) समस्या.
- मधुमेह: Diabetes मुळे देखील रक्तदाब कमी होऊ शकतो.
- गरोदरपण: Pregnancy मध्ये रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते.
- व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता: B12 च्या कमतरतेमुळे अॅनिमिया (Anemia) होतो आणि रक्तदाब घटतो.
- औषधे: काही औषधांमुळे रक्तदाब कमी होतो.
शरीरात होणारे बदल:
- चक्कर येणे
- मळमळ
- थकवा जाणवणे
- धुंधळे दिसणे
- एकाग्रता कमी होणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
उपाय:
- पुरेसे पाणी पिणे: दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे.
- मीठ: आहारात मीठाचे प्रमाण वाढवावे. (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)
- आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
- व्हिटॅमिन बी १२: व्हिटॅमिन बी १२ युक्त पदार्थांचे सेवन करा.
- औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.
- झोप: दररोज रात्री ७-८ तास झोप घ्या.
- व्यायाम: नियमित व्यायाम करा.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: