3 उत्तरे
3 answers

सांख्यिकी म्हणजे काय?

9
ऑक्सफर्ड ॲडव्हान्स्ड लर्नर्स शब्दकोशात (Oxford Advanced Learners Dictionary) एक अगदी सोपी व्याख्या दिली आहे. ‘‘सांख्यिकी म्हणजे संख्यात्मक स्वरूपात दर्शविलेल्या माहितीचे संग्रहण होय.’’ अशा प्रकारे सांख्यिकीचा संबंध संग्रहण, वर्गीकरण, वर्णन, गणिती विश्लेषण आणि संख्यात्मक घटनांचे परीक्षण या क्रियांशी असतो.
1
एखाद्या क्षेत्राच्या संबंधित काही वेळेच्या अंतरावर नवीन नवीन डेटा तयार होत असतो. हा डेटा बहुतांशी आकड्यांच्या स्वरूपात असतो. जसे की एखाद्या क्रिकेटरने बनवलेल्या धावा, ज्या दरवर्षी बदलत असतात. तसेच एखाद्या धंद्यात होणारा नफा हा दरवर्षी बदलत असतो.
अशा वेळेस हे बदलणारे नंबर्स घेऊन त्यावर एक पॅटर्न लावून काही तक्ते (Graphs) बनवले जातात, जेणेकरून क्रिकेटरच्या करिअरचे तसेच धंद्यातील चढउतार सहज लक्षात येतात.
अशा प्रकारच्या नंबर्सवर प्रक्रिया करून एक पॅटर्न बनवण्याच्या कलेला सांख्यिकी म्हणतात.
इंग्लिश मध्ये सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स (Statistics).
उत्तर लिहिले · 2/4/2017
कर्म · 283280
0

सांख्यिकी (Statistics) हे माहितीचे विश्लेषण, सादरीकरण, आणि व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाणारे एक गणितीय विज्ञान आहे.

व्याख्या:

  • सांख्यिकी म्हणजे आकडेवारी गोळा करणे, तिचे वर्गीकरण करणे, विश्लेषण करणे, आणि त्यावरून निष्कर्ष काढणे.
  • हे आकडेवारीवर आधारित निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहे.

सांख्यिकीचे उपयोग:

  • अर्थशास्त्र: मागणी आणि पुरवठा यांचा अभ्यास, आर्थिक विकास दर मोजणे.
  • विज्ञान: वैज्ञानिक प्रयोगांचे निष्कर्ष काढणे.
  • सामाजिक शास्त्रे: जनमत सर्वेक्षण करणे, सामाजिक समस्यांचा अभ्यास करणे.
  • उद्योग: उत्पादनाची गुणवत्ता तपासणे, विक्रीचा अंदाज लावणे.

सांख्यिकीचे प्रकार:

  • वर्णनात्मक सांख्यिकी (Descriptive Statistics): माहितीचे सार (mean, median, mode) आणि प्रसार (standard deviation) मोजणे.
  • अनुमानित सांख्यिकी (Inferential Statistics): मोठ्या समुदायाबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी लहान गटातील माहितीचा वापर करणे.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1040

Related Questions

घटक पृथक्करण म्हणजे काय?
घटक पृथ्थकरण म्हणजे काय?
सांख्यिकी शास्रचे महत्व सांगा?
केंडल यांचा श्रेणी सहसंबंध गुणांक पद्धत स्पष्ट करा?
सांख्यिकीशास्त्राचे महत्त्व कोणते आहे?
वेगवेगळ्या नमुना पद्धती स्पष्ट करा?
सांख्यिकी शास्त्राचे महत्त्व सांगा?