समाजशास्त्र कायदा सामाजिक_शास्त्र इतिहास

मनुस्मृती काय आहे ?

मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. ब्रिटीश काळात इ.स.१७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला.

मनुस्मृतीच्या आज ५० हून अधिक प्रती उपलब्ध असून त्यातील कोलकाता येथील इ.स.१८ व्या शतकातील प्रत अधिकृत मानली जाते. मनुस्मृतीतील छंदबद्ध रचनेवरून ती इ.स.पू.२ रे शतक ते इ.स.३ रे शतक या काळातील असावी. मनुस्मृती हे मनु आणि भृगु यांतील धर्मावरील संवाद आहे. यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम v अधिकार इ. बाबतीत चर्चा आहे. मनुस्मृतीचा प्रसार भारताबाहेर म्यानमार, थाईलंड, कंबोडिया आणि इंडोनेशिया मध्ये देखील झाला होता. मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र असेही ओळखले जाते.

मनुस्मृती मध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक कायदे/श्लोक सुद्धा आहेत.

अध्याय

मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय असून त्यात २६८३ श्लोक आहेत.

रचना

ब्रह्मदेवाने उत्पन्न केले असलेले धर्मशास्त्र मनूला मिळते. तो ते ऋषींना सांगतो. असे यात लिहिले आहे.

श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे-

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं| विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत्||

अर्थात, श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला.

सुवचने

मनुस्मृतीतील काही सुवचने

१.
विषादप्यामृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम्।
अमित्रादपि सद्‌वृत्तममेध्यादपि काञ्चनम्।। (२.२३९)
विषातील अमृत घ्यावे, चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा, शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी.
२.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्‌ तु न पूज्यन्ते सर्वास्‌ तत्राफलाः क्रियाः ॥ (३.५६)
जेथे नारीची पूजा होते तेथे देवता रममाण होतात. परंतु जेथे अशी पूजा होत नाही तेथे सर्व धर्मक्रिया विफल होतात.
३.
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थविरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति॥ (९.३)
स्त्रीचे ती कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवर्‍याने आणि वृद्धापकाली तिला पुत्रांनी सांभाळावे. स्त्रीला कधी संरक्षणाशिवाय (एकटे) सोडू नये.
४.
चक्रिनो दशमिष्ठस्य रोगिनो भारिनः स्त्रिय:।
स्नातकस्य च राज्ञश्च पन्था देयो वरस्य च ॥
(पायी चालताना अरुंद) रस्यावर (मागून किंवा पुढून) वाहनावर आरूढ असलेलेला माणूस (चक्रिनः),९० ते १०० वर्षांचा वृद्ध (दशमिन्‌), रोगी, स्त्री, ओझे वाहणारा (भारिन्‌), विद्वान (स्नातक) व राजा (राज्ञः) (यांपैकी कोणी आले तर ) त्यांना याच क्रमाने अग्रक्रम द्यावा. (२.१३८).

पुस्तके

मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके

डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? (डॉ. यशवंत मनोहर)निवडक मनुस्मृती, संकलन आणि भाष्य (डॉ. रंगनाथ मुडसूरकर)मनु आणि स्त्री (डॉ. म.बा. कुलकर्णी)मनुशासनम्‌ : निवडक मनुस्मृती (विनोबा भावे)मनुस्मृती (अशोक कोठारे)मनुस्मृती-काही विचार (डॉ. नरहर कुरुंदकर)मनुस्मृती - भूमिका (वरदानंद भारती)श्री मनुस्मृती-सार्थ-संभाष्य (वरदानंद भारती)

मनुस्मृतीवरील हिंदी पुस्तके

महर्षि मनुरचित मनुस्मृती : उपयोगी रूपांतर (गोविन्दसिंह)मनुस्मृतीचे हिंदी भाषांतरhttp://www.hindibookspdf.com/ या संकेतस्थळावरून मोफत उतर्रवून घेता येते.

मनुस्मृतीवरील इंग्रजी पुस्तके
Manusmriti (Patrick Olivelle) in The Oxford International Encyclopedia of Legal History

1 उत्तर
1 answers

मनुस्मृती काय आहे ?

8
मानवी समाजाला लागलेली कीड होती, जी कधीच जाळून टाकली आहे.
उत्तर लिहिले · 29/3/2017
कर्म · 480

Related Questions

आदिवासी न साठी द लँड रेव्हेन्यू रूल्स 1972 आणि द बॉम्बे ट्रेझरी रूल्स 1960 हे काय आहे याबद्दल पूर्ण माहिती पाहिजे?
तक्रार अर्जावर नगरपालिका कारवाई करत नाही याच्या RTI साठी अर्ज कसा व कुणाकडे करावा?
नगरपालिका कारवाई करत नाही म्हणून उपोषण करायचे असल्यास काय करावे लागेल याची पूर्ण माहिती द्यावी?
आरटीआय अर्ज कोणकोणत्या प्रकारे करू शकतो?
ग्रामपंचायतला आरटीआय अर्ज कसा करावा?
गावठाण जागा विषयी माहिती अधिकार अर्ज ग्रामपंचायत मध्ये कसा करावा?
गावठाण जागे विषयी माहिती ग्रामपंचायत कडून कशी मागावी?