Topic icon

सामाजिक_शास्त्र

0

दलित या शब्दाचा शब्दशः अर्थ 'दलित', 'पीडित' किंवा 'ज्याला चिरडले आहे असा' होतो.

हा शब्द त्या समुदायांसाठी वापरला जातो ज्यांना भारतीय समाजात सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या दाबले गेले आहे.

१९७० च्या दशकात दलित पँथर या संघटनेने हा शब्द लोकप्रिय केला.

अधिक माहितीसाठी, आपण खालील स्रोत पाहू शकता:

उत्तर लिहिले · 3/5/2025
कर्म · 980
0
समाज: एक विस्तृत अर्थ

समाज म्हणजे लोकांचा एक गट जो एका विशिष्ट क्षेत्रात एकत्र राहतो, समान संस्कृती, मूल्ये आणि संस्था सामायिक करतो. समाज हा एक अमूर्त (abstract) आणि गतिमान (dynamic) असतो.

समाजाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • सदस्यत्व: समाजात सदस्य असणे आवश्यक आहे.
  • सामुदायिक भावना: सदस्यांमध्ये एकतेची आणि सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे.
  • संस्कृती: समाजाची स्वतःची अशी संस्कृती असते, ज्यात रूढी, परंपरा, मूल्ये आणि आदर्श यांचा समावेश होतो.
  • संघटन: समाजात एक विशिष्ट प्रकारची रचना आणि संघटन असते.
  • परस्पर अवलंबित्व: समाजातील सदस्य एकमेकांवर अवलंबून असतात.

समाजाचे प्रकार:

समाजाचे वर्गीकरण अनेक आधारांवर केले जाते, जसे की:

  • आकारानुसार: लहान समाज, मोठा समाज
  • तंत्रज्ञानानुसार: आदिम समाज, कृषी समाज, औद्योगिक समाज, माहिती समाज
  • संस्कृतीनुसार: पाश्चात्त्य समाज, भारतीय समाज

समाजाचे कार्य:

समाज अनेक कार्ये करतो, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  • सदस्यांचे संरक्षण करणे.
  • गरजा पूर्ण करणे.
  • संस्कृतीचे जतन आणि प्रसार करणे.
  • सामाजिक व्यवस्था राखणे.

अधिक माहितीसाठी:

  1. Wikipedia - Society
  2. Britannica - Society
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980
0

ठाकर समाज हा अनुसूचित जमाती (Scheduled Tribes - ST) या प्रवर्गामध्ये येतो.


महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (website) तसेच इतर सरकारी कागदपत्रांमध्येही याचा उल्लेख आढळतो.


अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:


उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

सामाजिक मूल्य आत्मकथन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक मूल्यांचे आणि नैतिकतेचे विश्लेषण. यात व्यक्ती आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या, कर्तव्ये आणि समाजाप्रती असलेल्या दृष्टिकोन याबद्दल विचार व्यक्त करते.

सामाजिक मूल्य आत्मकथनाचे घटक:

  • मूल्यांची ओळख: आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण सामाजिक मूल्यांची जाणीव असणे. उदा. प्रामाणिकपणा, समानता, न्याय, प्रेम,tolerance.
  • सामाजिक जाणीव: समाजातील समस्या आणि आव्हाने समजून घेणे.
  • जबाबदारीची भावना: समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणे.
  • कृती: मूल्यांना अनुसरून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणे.

उदाहरण:

समजा, 'शिक्षण' हे आपले एक सामाजिक मूल्य आहे. तर आपण आत्मकथनात शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणापासून वंचित असलेल्या लोकांसाठी काय करता येईल आणि स्वतः शिक्षण कसे घेतले याबद्दल विचार व्यक्त करू शकतो.

हे आत्मकथन आपल्याला एक चांगले नागरिक बनण्यास मदत करते आणि समाजासाठी योगदान देण्यास प्रवृत्त करते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1
आडनाव म्हणजे आद्यनाम.

नामसाधर्म्य असता होणारा गोंधळ टाळायला आणि वांशिकतेचे अस्तित्व अबाधित राखायला म्हणून ही संकल्पना भारतीय समाजात अगदी पूर्वापार दिसते, केवळ कालपरत्वे हिचे स्वरूप सकृद्दर्दशनी जाणवावे इतके बदलत गेले आहे.

प्राचीन भारतीय इतिहासात आपल्याला गोत्र[1][2], वंश इत्यादि गोष्टी दिसतात तेच आजच्या आडनाव पद्धतीचे तत्कालीन रूप आहे म्हणता येईल[3]. भारतीय इतिहास आणि पुराणं बऱ्यापैकी पुरोहित आणि राजकीय वर्गाच्या इतिहासाचे ज्ञान देतात परंतु जनसामान्यांचा इतिहास दाखवणारी संसाधने आपल्याकडे दुर्मिळच असल्याने गोत्र, वंशादि व्यतिरिक्त भिन्न पद्धतीची आडनावं होती का ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

कालानुरूप आडनावांचे निकष बऱ्याच ठिकाणी बदलल्याने काही जातींमध्ये गोत्रांचे महत्व धार्मिक विधींपुरते सीमित झाले. अद्याप उत्तर भारतात ज्यांना आडनावं नसतात असे ब्राह्मण, राजपूत, अग्रवाल इत्यादि लोक आपली गोत्रच आडनावं म्हणून अवलंबतात. क्षत्रियांमध्ये वंश संकल्पनेला आडनावासारखे वापरताना बघता येते. उत्तरेत राजपूत लोकांमध्ये सम्राट हर्षवर्धनाच्या नंतर जी राजवंशांची नावं दिसतात ती अजूनही बघायला मिळतात ज्याचा अर्थ आजच्यासारखी आडनावं या समाजात किमान सहस्र वर्षांपासून तरी आहेत. पंजाबात खत्री आणि तत्सम जातींमध्येही आज बघायला मिळणारी आडनावं शिखांच्या उदयापूर्वी रूढ झालेली जाणवतात. दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्याच्या पूर्वीच्या सामाजिक जीवनाचे उल्लेख नगण्य आढळतात परंतु विजयनगर काळी मात्र आपल्याला आद्याक्षर म्हणून गावाचे नाव आणि नावाच्या शेवटी जातिसूचक आडनावं बघायला मिळतात जी अजूनही बव्हंशी तेलुगू समाजात आणि काही अंशी कन्नड, तमिळ लोकांमध्येही आढळतात[4].

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास आजमितीला आपल्याकडे यादव राजवटीच्या कारकिर्दीपूर्वीच्या सामाजिक जीवनाविषयी समाधानकारक माहिती देणारी साधने उपलब्ध नाहीत म्हणणे असंयुक्तिक नसावे. त्यामुळे तत्पूर्वी मराठी समाजात आडनावाचे स्वरूप कसे होते हे सांगता येत नाही पण यादव काळात मात्र पडनावं (पदांवरून पडलेली नावं), ज्ञातीनाम (जातीचे नावच आडनाव म्हणून वापरणे), गावांवरून आलेली नावं आपल्याला बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात. बहमनी आणि नंतरच्या मराठेशाहीतील राज्यात काही समाजांमध्ये आडनावं असूनही त्यांस विशेष महत्व होते असे दिसत नाही आणि त्यामुळेच त्याकाळच्या आडनावांची खात्रीपूर्वक माहिती देण्यास मर्यादा येतात. आडनावांची अनिवार्यता व्यावहारिक जीवनात वाढली ती आंग्लाईत ज्याची परिणती आजचे आपले नावांचे स्वरूप आहे.


विविध आडनावं[5]

तस्मात असे म्हणणे तर्कसुसंगत आहे की आडनाव प्रकार भारतीय समाजात जुनाच असून त्याची रूपरेखा काळाप्रमाणे परिवर्तित होत गेली आहे.

तळटीपा

[1] गोत्र म्हणजे काय? गोत्राची वैशिष्ट्ये कोणती? चे शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik)ने दिलेले उत्तर
[2] एकूण किती गोत्र आहेत? त्यांची नावे काय? गोत्र कसे ओळखतात? चे शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik)ने दिलेले उत्तर
[3] उपनामव्युत्पत्तिकोश
[4] नाव-वडिलांचे नाव-आडनाव ह्या नेहमीच्या पद्धती व्यतिरिक्त नावे तुम्ही बघितली आहेत का? आपले त्याबद्दल मत काय? 
[5] आडनावांची सुरस कहाणी
उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121765
1
शूद्र गावकुसाबाहेर राहत नसत. गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाला 'अस्पृश्य' किंवा 'अंत्यज' असे म्हणत.

सामान्यतः आपल्याला वर्णव्यवस्थेतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार सैद्धांतिक वर्ण माहिती आहेत, आणि म्हणून आपण व्यवहारातील जातीव्यवस्थेला त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ती तशी त्यात बसत नाही.

वेदांच्या सुरुवातील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, हे तीनच वर्ण दिसतात. 'वैश्य' चा शब्दशः अर्थ गावकरी असा होतो. सर्वसामान्यपणे मुलगा वडिलांचा व्यवसाय करत असला तरी वर्णांमध्ये लवचिकता होती असे दिसते. नंतर नागरी जीवन आणि समाजरचना अधिक क्लिष्ट झाली आणि शूद्र हा नवीन वर्ण जन्माला आला. हे शूद्र पूर्वीचे क्षत्रिय किंवा वैश्यच असावेत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांवर वैदिक संस्कार होत. शूद्रांवर नंतरच्या म्हणजे धर्मशास्त्रांच्या काळात तरी वैदिक संस्कार होत असल्याचे फारसे दिसत नाही. कालांतराने समाज आणखीन क्लिष्ट झाला आणि अंत्यज हा एक नवा वर्ग निर्माण झाला. गावे, नगरे वाढू लागली आणि त्यामुळे ढोरांची प्रेते उचलणे, चामडे सोलणे, कातडे कमावणे, उंदीर पकडणे, रस्ते साफ करणे, प्राण्यांची आणि मनुष्यांची विष्ठा साफ करणे अशा कामांपुरता अंत्यज हा नवा वर्ग बनला.

तत्वतः ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, रक्षण करतो तो क्षत्रिय वगैरे हे खरे असले तरी इथे या शब्दांचा वापर मी सांप्रत सामाजिक वास्तवाच्या अनुशंगाने करत आहे. धार्मिक संस्कारांचा विचार केला असता बहुतेक हिंदू जाती या परंपरेने शूद्र या प्रकारात मोडतात. उदाहरणार्थ, आताच्या काळात आपल्याकडे कुणबी आणि उत्तरेत जाट या जाती स्वतःला क्षत्रिय मानत असल्या तरी परंपरेने त्या शूद्र या वर्णात मोडतात. वेदोक्त-पुराणोक्त वाद झाला तो वास्तविक त्यावरूनच. आपण आज ज्यांना OBC म्हणतो त्यांतील काही वैश्य अपवाद वगळता बहुतेक जाती या शूद्र वर्णात येतात. SC मधील काही जाती सुद्धा शूद्र आहेत. पण सर्व भूतपूर्व अस्पृश्य जाती या SC/ST इ. मध्येच येतात. त्यामुळे अनेकदा चातुर्वण्यात बसवण्यासाठी अंत्यजांना शूद्रांत गणले जात असले तरी शूद्र आणि अंत्यज/अस्पृश्य हे एक नव्हेत. अगदीच स्पष्ट सांगायचे तर "वरच्या" शूद्रांच्या हातचे पाणी चालत असे. आदिवासी या शब्दाप्रमाणेच हल्ली बऱ्याच असंबद्ध जातींसाठी दलित हा शब्द प्रचलित असला तरी तो सुद्धा तद्दन आधुनिक शब्द आहे.

मग या अंत्यज लोकांवर इतके अत्याचार का झाले? मी इथे अस्पृश्यतेचे समर्थन करत नाही आहे. अस्पृश्यता हा अर्थातच भारतीय समाजावर लागलेला कलंक आहे. इथे मी केवळ अस्पृश्यता कशी निर्माण झाली याची थोडक्यात कारणमीमांसा करणार आहे. भारतीय समाजात वैयक्तिक आणि धार्मिक शुचितेला फार महत्त्व आहे. याचे एक व्यावहारिक कारण म्हणजे रोगसंसर्ग आणि प्रसार कमी करणे. या कारणामुळे शौच आणि अशौच वस्तु एकमेकांच्या संपर्कात येऊ नयेत याची आपले पूर्वज काळजी घेत. जसे मनुष्यांच्या सान्निध्यात पवित्र रहावे तसेच देवांच्या उपस्थितीत तर त्याहून अधिक पवित्र असावे. याचे एक अगदी साधे उदाहरण म्हणजे आचमन करताना तीन वेळा पाणी प्राशन करून चौथ्यांदा 'गोविंदाय नमः' म्हणून जे पाणी सोडतो, ते वास्तविक पाणी पीताना हाताला लागलेली लाळ धुण्यासाठी असते. हल्ली बरेच लोक करत नाहीत, पण त्याच्या पुढे सुद्धा शरीराच्या विविध अवयवांची अंतर्बाह्य शुद्धी करण्याच्या क्रिया असतात. आंघोळ करून संध्यापूजादि कार्य करण्याआधी स्वतःच्या कुटुंबीयांना सुद्धा शिवता येत नाही. या काळात केवळ धर्मातच नाही, तर एकूणच समाजात मृतदेह, लाळ, रक्त, मांस, मल-मूत्रादिंचा संपर्क अशौच मानला जात असे. गावात दुर्गंधी पसरू नये म्हणून चामडे सोलणे, कातडे कमावणे वगैरे सर्व कामे गावाबाहेर केली जाऊ लागली. परंतु जिवाणु आणि विषाणुंविषयीचे विज्ञान विकसित न झाल्यामुळे त्यात बऱ्याचशा अर्थशून्य प्रथा रूढ झाल्या. हळू-हळू रूढी जणू काही समाजाच्या अवचेतन मनातच उतरत जातात. कालांतराने या कामांशी संबंधित लोक सुद्धा सतत त्याच कामात रत असल्यामुळे कायमचे अपवित्र मानले जाऊ लागले. त्यांचे गावात राहणे सुद्धा दूषणावह मानले जाऊ लागले, आणि म्हणून त्यांना गावकुसाबाहेर रहावे लागत असे. मग बळी तो कान पिळी या न्यायाने त्यांचे दमन-शोषण हे ही पर्यायाने आलेच. याचाच अजून एक कंगोरा म्हणजे वैद्य आणि किरवंत हे लोक जन्माने उच्चवर्णीय असले तरी रोग आणि मृतदेहांशी संबंधित पेशा असल्यामुळे त्यांना काही अंशी, विशेषतः रोटी व्यवहारात आणि किरवंतांसाठी बेटी व्यवहारात सुद्धा अस्पृश्यांसारखी वागणूक मिळत असे. मग हे केवळ भारतात झाले का? तर नाही. चीन, कोरिया, जपान या आणि इतरही काही देशांमध्ये अस्पृश्य वर्ग अस्तित्वात होता. जपानमध्ये यांना 'बुराकुमिन' असे म्हणतात. हे लोक सुद्धा तथाकथित 'अपवित्र' कामे करत. आताच्या काळात उघडपणे अस्पृश्यता नसली तरी आजही त्यांच्यासोबत काही प्रमाणात भेदभाव होतो. थोडक्यात सांगायचे तर अस्पृश्यता हे स्वच्छातेच्या आग्रहाचे एक अतिविकृत रूप आहे.
उत्तर लिहिले · 28/12/2021
कर्म · 121765
2


मनोहर आहिरे यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास ‘काझीचं वाडगं’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील काही भाग…

काझीचं वाडगं ः नागसेनवाडी – नागसेननगर असा नामांतराचा प्रवास झालेल्या झोपडपट्टीत आम्ही पैदा झालो, वाढलो. नाशिक-पुणे महामार्गावर असल्याने तसंच भारताचा सर्वात मोठा महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा रोडवर वसलेली ही वस्ती. पाहिलं नाही; परंतु बुजुर्गांकडून ऐकलेल्या माहितीवरून बुधाभाऊ मोरे नावाच्या एका मातंग (तेव्हाचा मांग) कार्यकर्त्याने या वस्तीसाठी तेव्हाच्या नगरपालिकेशी झगडा केला आणि ही वस्ती स्थिरावली.

मांगा- महारांची वस्ती म्हणून वाडगं, वाडा नाही आणि इंग्रजांच्या दिमतीला असलेल्या काझींना बिदागी म्हणून दिलेली ही जागा म्हणून काझीचं वाडगं. लहानपणी एक काझीबाबा पांढरा शुभ्र पायजमा, झब्बा आणि काळी टोपी, काळा चश्मा, उंची साधारणपणे साडेसहा फूट, दरमहा चार आणे वसुलीसाठी यायचा. आठवतंय त्याप्रमाणे सत्तर-ऐंशी घरांपैकी वीस-पंचवीसच त्याला भीक घालायचे. एकादा एका बाईशी काझी काहीतरी आडवंतिडवं बोलला. पुढच्या फेरीच्यावेळी त्या बाईने पैसे देण्याऐवजी घरातला कुत्रा अंगावर सोडला. म्हातारा काझीबाबा पळूही शकत नव्हता. आसपासच्या लोकांनी सोडवलं; पण तोपर्यंत पायजमाच्या बटा निघाल्या होत्या. त्यानंतर काझीबाबा कधीही दिसला नाही. असं हे काझीचं वाडगं. पलीकडे येसकरवाडा, महारवाडा, मोठा राजवाडा असा प्रवास करणारी; परंतु आर्थिकदृष्ट्या जरा सक्षम आणि पक्की घरे असलेली वस्ती. परंतु, ‘जयभीम’पेक्षा तिरस्काराच्या आणि बेगडी शहाणपणाच्या गप्पाच येथे अधिक ऐकायला मिळायच्या. अनेकदा तर ‘काझीचं वाडगं अन् मुतायचं गाडगं…’ अशीच शिवी अधिक ऐकायला मिळायची. मन लहानपणी खजील व्हायचं. पण तेव्हाच्या वस्तीत शिकणार्या पँथर्सनी नागसेन या महान बौद्ध भिक्खूचं नाव दिलं अन् शहाण्यांचे दात त्यांच्या घशात घातले. आई सांगते त्याचप्रमाणे या वस्तीत वसलेलं आमचं पाचवं घर,१९३५ चं. याचा अर्थ आमच्या सर्व भावंडांचा जन्म याच वस्तीतला, वाडग्यातला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या साक्षीने आणि साथीने अनेक वस्त्यांना कवचकुंडल्यांप्रमाणे जपलं. आमची वस्तीही त्यास अपवाद राहिली नाही. वेगळेपणा मात्र एक होता, विटंबनेचा निषेध करण्यासाठी पहिला दगड फेकला जायचा तो वडाळा नाक्यावर, अर्थातच नागसेनवाडीच्या वाडग्यातून. याच वस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घराघरापर्यंत पोहोचविणारा आवाज होता. ज्याने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात एक प्रकारचा आंबेडकरी यल्गार पुकारला होता. उभ्या महाराष्ट्राला माहीत असलेलं नाव… लोककवी, कविवर्य वामन तबाजी तथा वामनदादा कर्डक…!

नागसेनवाडीचे प्रवेशद्वार म्हणजे वामनदादांचं घर. वामनदादा… ‘पिकतं तिथं विकत नाही’ अशी अवस्था असलेला हा काव्यमय शब्दसम्राट आमच्या नाशिकला संपूर्ण कधीच कळाला नाही. यावर पुढे वाचू! नागसेननगराची रचनाच न्यारी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यानं अधिक घट्ट झालेली वस्ती काळानुरूप बदलत गेली. जुना आग्रा रोड ते पूना रोड अशा चौकोनात ही वस्ती. कोळीवाडा, कातारआळी मागे मुस्लीम पट्टा, शेजारी गारुडाळी (गारुडी समाजाची वस्ती) आणि फ्रंटला महार, नवबौद्ध आणि मिश्र जाती-जमातींचे. परंतु, सर्वांच्या ‘जयभीम’चा आवाज मात्र सारखाच होता. तो बेंबीच्या देठापासून घातलेला असायचा.

मला आठवतंय तोपर्यंत वस्तीत लाईट नव्हती, रस्ते नव्हते, पक्की एखाद्-दोन घरं असतील. रात्र झाली की रॉकेलच्या बत्त्यांच्या उजेडात पाटा रुचण्याचा आवाज एकमेकाला साद आणि साथ देत असायचा. मग जिच्याकडे धने कमी असतील तिने धने मागायचे आणि चार-पाच मिरच्या द्यायच्या. वहिनीने (माझ्या मोठ्या भावजयीने) सांगितलं, की पळत जायचं (खेळणं मध्येच थांबवून) आणि ही बार्टर इकॉनॉमी मेनटेन करायची. ऐनवेळी तिच्या ध्यानात यायचं, की तेलच नाही. मग विनवण्या करून चार आण्याचं (पंचवीस पैसे) गोड्याचं तेल माणिकशेठच्या दुकानातून पळत जाऊन आणायचं. अनेकदा (अंबाबाई-माणिकशेठची बायकोच असायची दुकानावर अन् बॅक ग्राऊंडला माणिकशेठचा तर्रर्र झालेला आवाज) इथेही इकॉनॉमिकल सायकल मेनटेन झालेली असायची. वहिनीनं पाच पैसे अधिक दिलेले असायचे. अर्थात, शिव्या बोनसमध्ये. ही माझ्याच नाही तर वस्तीतल्या प्रत्येक घर घर की कहाणी होती. आमचं उदाहरण सँपल म्हणून लिहिलं.

चंद्राचा उजेड आणि त्याची भ्रमंती हेच वस्तीचं घड्याळ. अंधार इतका की डोळ्यांत बोट घातलं तरी समजायचं नाही. पण, कम्युनिकेशन नेटवर्क मात्र स्ट्राँग, कधी रेंज जायची नाही. आमचा पापडवाला म्हणजे ग्रेटच. एवढ्या अंधारात तो आपली मुगाच्या तळलेल्या पापडांची कटोरी (काड्याची पाटी) पाठीवर घेऊन न चुकता घुसायचा आणि पुन्हा एकच आवाज द्यायचा… है… पापड्डवाला… बस्स! प्रतिउत्तरात दोन-तीन आरोळ्या यायच्या, गिर्हाईकांच्या! आमचा हा पापडवाला मामू क्रमशः त्या दारात, ओट्यावर, ओसरीवर जायचा अन् त्याच घराच्या उजेडात पैसे मोजून पापड द्यायचा. कधीही त्याचा हिशेब चुकला नाही. वस्तीची प्रगती झाली. म्युनिसिपाल्टीचे दिवे लागले अन् आमचा अंधारातला पापडवाला मामू नाहीसा झाला. कितीही आठवलं तरी चेहरा आठवत नाही. कारण तो अंधारातच उभा असायचा. आता त्याच पापडाची चव घेण्यासाठी वाटतं वस्तीत जावं, मनपाला सांगून सर्व लाईटस् घालवावेत, किर्रर्र अंधार करावा आणि आवाज द्यावा… ‘है… पापडवाला…’ पण भीती वाटते… पापडवाला मामू आला नाही तर…?


उत्तर लिहिले · 14/12/2021
कर्म · 121765