सामाजिक_शास्त्र इतिहास

शूद्र गावाबाहेर का राहत होते?

2 उत्तरे
2 answers

शूद्र गावाबाहेर का राहत होते?

1
शूद्र गावकुसाबाहेर राहत नसत. गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाला 'अस्पृश्य' किंवा 'अंत्यज' असे म्हणत.

सामान्यतः आपल्याला वर्णव्यवस्थेतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार सैद्धांतिक वर्ण माहिती आहेत, आणि म्हणून आपण व्यवहारातील जातीव्यवस्थेला त्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ती तशी त्यात बसत नाही.

वेदांच्या सुरुवातील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, हे तीनच वर्ण दिसतात. 'वैश्य' चा शब्दशः अर्थ गावकरी असा होतो. सर्वसामान्यपणे मुलगा वडिलांचा व्यवसाय करत असला तरी वर्णांमध्ये लवचिकता होती असे दिसते. नंतर नागरी जीवन आणि समाजरचना अधिक क्लिष्ट झाली आणि शूद्र हा नवीन वर्ण जन्माला आला. हे शूद्र पूर्वीचे क्षत्रिय किंवा वैश्यच असावेत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांवर वैदिक संस्कार होत. शूद्रांवर नंतरच्या म्हणजे धर्मशास्त्रांच्या काळात तरी वैदिक संस्कार होत असल्याचे फारसे दिसत नाही. कालांतराने समाज आणखीन क्लिष्ट झाला आणि अंत्यज हा एक नवा वर्ग निर्माण झाला. गावे, नगरे वाढू लागली आणि त्यामुळे ढोरांची प्रेते उचलणे, चामडे सोलणे, कातडे कमावणे, उंदीर पकडणे, रस्ते साफ करणे, प्राण्यांची आणि मनुष्यांची विष्ठा साफ करणे अशा कामांपुरता अंत्यज हा नवा वर्ग बनला.

तत्वतः ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, रक्षण करतो तो क्षत्रिय वगैरे हे खरे असले तरी इथे या शब्दांचा वापर मी सांप्रत सामाजिक वास्तवाच्या अनुशंगाने करत आहे. धार्मिक संस्कारांचा विचार केला असता बहुतेक हिंदू जाती या परंपरेने शूद्र या प्रकारात मोडतात. उदाहरणार्थ, आताच्या काळात आपल्याकडे कुणबी आणि उत्तरेत जाट या जाती स्वतःला क्षत्रिय मानत असल्या तरी परंपरेने त्या शूद्र या वर्णात मोडतात. वेदोक्त-पुराणोक्त वाद झाला तो वास्तविक त्यावरूनच. आपण आज ज्यांना OBC म्हणतो त्यांतील काही वैश्य अपवाद वगळता बहुतेक जाती या शूद्र वर्णात येतात. SC मधील काही जाती सुद्धा शूद्र आहेत. पण सर्व भूतपूर्व अस्पृश्य जाती या SC/ST इ. मध्येच येतात. त्यामुळे अनेकदा चातुर्वण्यात बसवण्यासाठी अंत्यजांना शूद्रांत गणले जात असले तरी शूद्र आणि अंत्यज/अस्पृश्य हे एक नव्हेत. अगदीच स्पष्ट सांगायचे तर "वरच्या" शूद्रांच्या हातचे पाणी चालत असे. आदिवासी या शब्दाप्रमाणेच हल्ली बऱ्याच असंबद्ध जातींसाठी दलित हा शब्द प्रचलित असला तरी तो सुद्धा तद्दन आधुनिक शब्द आहे.

मग या अंत्यज लोकांवर इतके अत्याचार का झाले? मी इथे अस्पृश्यतेचे समर्थन करत नाही आहे. अस्पृश्यता हा अर्थातच भारतीय समाजावर लागलेला कलंक आहे. इथे मी केवळ अस्पृश्यता कशी निर्माण झाली याची थोडक्यात कारणमीमांसा करणार आहे. भारतीय समाजात वैयक्तिक आणि धार्मिक शुचितेला फार महत्त्व आहे. याचे एक व्यावहारिक कारण म्हणजे रोगसंसर्ग आणि प्रसार कमी करणे. या कारणामुळे शौच आणि अशौच वस्तु एकमेकांच्या संपर्कात येऊ नयेत याची आपले पूर्वज काळजी घेत. जसे मनुष्यांच्या सान्निध्यात पवित्र रहावे तसेच देवांच्या उपस्थितीत तर त्याहून अधिक पवित्र असावे. याचे एक अगदी साधे उदाहरण म्हणजे आचमन करताना तीन वेळा पाणी प्राशन करून चौथ्यांदा 'गोविंदाय नमः' म्हणून जे पाणी सोडतो, ते वास्तविक पाणी पीताना हाताला लागलेली लाळ धुण्यासाठी असते. हल्ली बरेच लोक करत नाहीत, पण त्याच्या पुढे सुद्धा शरीराच्या विविध अवयवांची अंतर्बाह्य शुद्धी करण्याच्या क्रिया असतात. आंघोळ करून संध्यापूजादि कार्य करण्याआधी स्वतःच्या कुटुंबीयांना सुद्धा शिवता येत नाही. या काळात केवळ धर्मातच नाही, तर एकूणच समाजात मृतदेह, लाळ, रक्त, मांस, मल-मूत्रादिंचा संपर्क अशौच मानला जात असे. गावात दुर्गंधी पसरू नये म्हणून चामडे सोलणे, कातडे कमावणे वगैरे सर्व कामे गावाबाहेर केली जाऊ लागली. परंतु जिवाणु आणि विषाणुंविषयीचे विज्ञान विकसित न झाल्यामुळे त्यात बऱ्याचशा अर्थशून्य प्रथा रूढ झाल्या. हळू-हळू रूढी जणू काही समाजाच्या अवचेतन मनातच उतरत जातात. कालांतराने या कामांशी संबंधित लोक सुद्धा सतत त्याच कामात रत असल्यामुळे कायमचे अपवित्र मानले जाऊ लागले. त्यांचे गावात राहणे सुद्धा दूषणावह मानले जाऊ लागले, आणि म्हणून त्यांना गावकुसाबाहेर रहावे लागत असे. मग बळी तो कान पिळी या न्यायाने त्यांचे दमन-शोषण हे ही पर्यायाने आलेच. याचाच अजून एक कंगोरा म्हणजे वैद्य आणि किरवंत हे लोक जन्माने उच्चवर्णीय असले तरी रोग आणि मृतदेहांशी संबंधित पेशा असल्यामुळे त्यांना काही अंशी, विशेषतः रोटी व्यवहारात आणि किरवंतांसाठी बेटी व्यवहारात सुद्धा अस्पृश्यांसारखी वागणूक मिळत असे. मग हे केवळ भारतात झाले का? तर नाही. चीन, कोरिया, जपान या आणि इतरही काही देशांमध्ये अस्पृश्य वर्ग अस्तित्वात होता. जपानमध्ये यांना 'बुराकुमिन' असे म्हणतात. हे लोक सुद्धा तथाकथित 'अपवित्र' कामे करत. आताच्या काळात उघडपणे अस्पृश्यता नसली तरी आजही त्यांच्यासोबत काही प्रमाणात भेदभाव होतो. थोडक्यात सांगायचे तर अस्पृश्यता हे स्वच्छातेच्या आग्रहाचे एक अतिविकृत रूप आहे.
उत्तर लिहिले · 28/12/2021
कर्म · 121765
0

शूद्र गावाबाहेर का राहत होते याबद्दल अनेक कारणं दिली जातात, त्यापैकी काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे आहेत:

  1. सामाजिक भेदभाव:

    प्राचीन भारतीय समाजात वर्णव्यवस्था होती, ज्यात ब्राह्मणांना सर्वोच्च स्थान होते आणि शूद्रांना सर्वात कनिष्ठ मानले जाई. यामुळे त्यांना अनेक सामाजिक अधिकार नव्हते आणि त्यांना गावाबाहेर रहावे लागे.

  2. व्यवसाय:

    शूद्रांना विशिष्ट कामं दिली जात होती, जसे की साफसफाई करणे किंवा इतर शारीरिक श्रम करणे. त्यामुळे ते गावाबाहेर राहत असत, जेणेकरून त्यांच्या कामामुळे इतरांना त्रास होऊ नये.

  3. सुरक्षा:

    काही इतिहासकारांच्या মতে, शूद्रांना स्वतःच्या संरक्षणासाठी गावाबाहेर रहावे लागत असे. गावामध्ये उच्चवर्णीय लोकांचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता होती.

  4. आर्थिक कारणं:

    शूद्रांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते गावाबाहेर स्वतःच्या सोयीनुसार जागा शोधून राहत होते. गावामध्ये जमिनी आणि घरांच्या किंमती जास्त असल्यामुळे त्यांना ते परवडणारे न्हवते.

हे सर्व मुद्दे एकत्रितपणे दर्शवतात की, सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे शूद्र गावाबाहेर राहत होते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

दलित शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो?
समाज या शब्दाचा सविस्तर अर्थ काय होतो?
ठाकर समाज नक्की कुठल्या प्रवर्गामध्ये येतो? अनुसूचित जाती की अनुसूचित जमाती?
सामाजिक मूल्य आत्मकथन म्हणजे काय?
आडनाव हा प्रकार/प्रघात कधी व का सुरू झाला?
महार वस्तीला राजवाडा का म्हणतात?
Samaj ka sab taiyar ho to?