सरकार
UPSC - केंद्र लोकसेवा आयोग
प्रशासन
अधिकारी
अधिकार
जिल्हाधिकारी (IAS) यांच्याकडे कोणकोणते अधिकार व पॉवर असतात?
2 उत्तरे
2
answers
जिल्हाधिकारी (IAS) यांच्याकडे कोणकोणते अधिकार व पॉवर असतात?
26
Answer link
जिल्हाधिकारी यांच्याकडे खालील अधिकार आणि Power असतात:

१. जमिनीचे व्यवहार पाहणे - जसे कि जमीन हक्क, भाडे, ई.
२. Record of Rights नियमनांतर्गत चौकशी करणे. Record of Rights ही एक महसूल संबंधी नियमावली आहे. अधिक माहितीसाठी ही लिंक वाचा: http://www.landsofmaharashtra.com/recordofright.html
३. जमिनीचे एरिया करेक्शन, बाउंडरी करेक्शन करणे. (म्हणूनच बऱ्याचदा शेतीच्या बांधावरून झालेले भांडणे मिटवण्यासाठी कलेक्टर येतो :) )
४. आयकर जमा करणे - विविध जमिनींतून होणार महसूल, मनोरंजन, एक्साईज(उत्पादन शुल्क) इ गोष्टींवरील टॅक्स कलेक्शन करणे.
५. मुरूम, वाळू, खडी यासाठी खोदकामाला परवानगी देणे आणि त्याबदल्यात रॉयल्टी घेणे
६. नैसर्गिक आपत्तीमुळे (पूर, भूकंप, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, ई.) नुकसान पोहोचणाऱ्या लोकांना मदत करणे
७. लोकशाही दिनाच्या दिवशी लोकांच्या तक्रारी ऐकणे. दर महिन्यातील पहिला सोमवार हा लोकशाही दिन असतो.
८. पोलीस फायरिंग केसची चौकशी करणे, पोलीस लॉक अप मधील मृत्यूची चौकशी करणे

९ . जमीन रेकॉर्डस् च्या डिपार्टमेन्टवर नियंत्रण ठेवणे - हे डिपार्टमेंट मुख्यतः ७-१२ सारखी कागदपत्रे जोपासण्याचे काम करते.
१०. लोकसभा आणि विधानसभा मतदानादरम्यान कलेक्टर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतो. यात मतदारांचे फोटो ID बनवणे, मतदारसंघांतील रोल्स हे सगळे कलेक्टरच्या देखरेखीत होतात.
११. सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जो काही निधी येतो त्यावर आणि त्याच्या खर्चावर जिल्हाधिकारी नजर ठेवतो. तसेच MP/MLA यांना येणारे निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्याचे व्यवस्थापन जिल्हाधिकारी करतो.
0
Answer link
जिल्हाधिकारी (IAS) यांच्याकडे अनेक अधिकार आणि पॉवर असतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- जिल्हा प्रशासनाचे प्रमुख: जिल्ह्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांवर त्यांचे नियंत्रण असते.
- कायदा व सुव्यवस्था: जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची असते. पोलीस विभागावर त्यांचे नियंत्रण असते.
- जमीन व्यवस्थापन: जमिनीRecords चे व्यवस्थापन, Land Records, Land Revenue Collection आणि जमिनी संबंधित इतर कामांची जबाबदारी त्यांच्याकडे असते.
- निवडणूक अधिकारी: जिल्हाधिकारी निवडणुकीच्या काळात निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात.
- आपत्ती व्यवस्थापन: जिल्ह्यामध्ये कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास, त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असते.
- विकास कामे: जिल्ह्यामध्ये विकास योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते.
- परवाना अधिकारी: विविध प्रकारचे परवाने (Licenses) देण्याचा अधिकार त्यांना असतो.
- न्यायिक अधिकार: जिल्हाधिकाऱ्यांकडे काही न्यायिक अधिकार देखील असतात.
या व्यतिरिक्त, शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी वेळोवेळी इतर कामे देखील करतात.