मुतखडा निघून जाण्यासाठी काय करावे?
मुतखडे निर्माण होणे म्हणजे काय?
इंग्लिशमध्ये मुतखड्यात (Kidney Stones) आणि Nephrolithiasis अशी दोन नावे आहेत. म्हणून Nephrolithiasis म्हणजे मुतखडा.
हा सामान्य आहे काय?
लोकसंख्येच्या १ ते ५ टक्के च्या दरम्यान लोकांवर याचा परिणाम होतो.
एखाद्या व्यक्तीत सारखे हे खडे निर्माण होऊ शकतात काय?
५० ते ८० टक्के रूग्णांमध्ये हे खडे पुन्हा निर्माण होतात.
मूतखडे असणारे रूग्ण कसे दिसतात? किंवा मूत्रवाहक नलिकेत होणार्या पीडेमुळे उद्भवणारी पोटदुखी म्हणजे काय?
मूत्रपिंडातून मूत्राशयाकडे मूत्र वाहून नेणार्या नलिकेचे आकुंचन होणे जे मुतखड्याचा क्षोभ झाल्यामुळे होते त्याला Renal Colic म्हणतात. ही पोटदुखी साधारण पणे बाजूच्या क्षेत्रात (flank area) सुरू होऊन नंतर ती जांघ, पोट व मांडी यांच्यामधल्या खोलगट भागात जाते. खडा किंवा गाठ वाहून गेल्यानंतर दुखणे कमी होते, पण लघवीवाटे रक्त पडू शकते. जर संसर्ग झाला तर ताप येणे, मूत्रोत्सर्जनात अडथळे आणि मूत्रोत्सर्जन जास्त वेळा होणे ही लक्षणे दिसून येतात.
मुतखड्यावर कोणते उपचार केले जातात?
यावरचे उपचार खडा कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर अवलंबून असतात, म्हणून जेव्हा शक्य असेल तेव्हा हा खडा तपासणीसाठी द्यावा. खालील कारणांमुळे खडे कमी होऊ शकतात.
- लघवीचा Volume राखण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे
- जर आतड्यात कॅल्शियम चे शोषण होते आहे अशी शंका असेल तर दुधाच पदार्थ आणि इतर कॅल्शियम जास्त असलेले पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे.
- जास्त मीठ टाळले पाहिजे, जर खड्यात कॅल्शियम असेल तर सोडियम घेण्याचे प्रमाण वाढून ते कॅल्शियम शरीराबाहेर टाकते.
- कॅल्शियम ऑक्सलेट खडे असतील तर हिरव्या पालेभाज्यांसारखे ऑक्सलेट असलेले अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे.
मुतखडे निर्माण होत असतील तर त्यांचा संपूर्ण अभ्यास केला पाहिजे. या तपासणीत संपूर्ण Metofolic Profile आणि कॅल्शियम, यूरिक ऍसिड, ऑक्सीलीटेट, सायट्रेट इ. चे २४ तासाच्या लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे प्रमाण मोजणे.
मुतखड्याचे वेगवेगळे प्रकार कोणते?
मुतखडे खालील प्रकारचे असतात
- कॅल्शियम फॉस्फेट
- कॅल्शियम ऑक्सालेट
- युरिक ऍसिड
- मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट (Struvite)
मुतखडे कसे निर्माण होतात?
खालील कारणांमुळे
- कमी पाणी पिणे.
- जठर व आतड्यांमधून कॅल्शियमचे वाढत्या प्रमाणात शोषण.
- कॅल्शियमची गळती असणारे मूत्रपिंड ज्याला Hypercalciurea म्हणतात.
- ऑक्सलेटचे वाढत्या प्रमाणात शोषण.
- लाल मांसामध्ये आढळणार्या प्रथिन पदार्थांच्या घटकांचे सेवन ३ ते ५ टक्के रूग्णांमध्ये कोणतेही कारण सापडत नाही.
मुतखडे काढून टाकण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या पध्दती उपलब्ध आहेत?
- आधी भौतिक विद्युत लिथोट्रिपसी. Lithotripsy पहिल्यांदा १९८० साली केली गेली आणी तेव्हापासून यशस्वीरितीने तिचा वापर केला जात आहे. उच्च विस्तारक विद्युत लहरी सोडल्यामुळे त्या खड्यांचे चूर्ण करतात. यात शस्त्रक्रियेची गरज नाही. ही पध्दत लहान खड्यांसाठी जास्त उपयोगात आणली जाते. यात ९० ते ९५ टक्के यश मिळते. मोठे खडे असतील तर जास्त वेळा उपचार घ्यावा लागतो.
- त्वचाप्रवेशी (Percutaneous) Nehrostolithodomy: यात पाठीमागून मूत्रपिंडात शिरून खड्यांवर उपचार केला जातो.
- Ureteroscopy मूत्राशयमुखातून मूत्रनलिकेत तंतू घातले जातात. अल्ट्रासोनिक लहरींद्वारे किंवा लेसर किरणांद्वारे मुतखड्याचे तुकडे केले जातात. सामान्यपणे नेहेमी उपयोगात आणली जाते.
- मूत्राशयातील खडे काढण्यासाठी करावयाची शस्त्रक्रिया: यात उदरपोकळी उघडून खडे काढले जातात.
♍ *मुतखड़ा* उपचार ♍
माहीती सेवा गृप पेठवड़गाव
मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2 चमचे घ्यावे.
एक उपाय म्हणजे पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रॅम, रोज एक वेळ (सकाळी रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर द्यावे. त्यानंतर चार-पाच तास तोंडाने काहीही न घेण्याची सूचना द्यावी. याप्रमाणे दीड महिना रोज उपचार करावेत. पाच-सहा महिन्यांनंतर परत एकदा महिनाभर हाच उपाय करावा. हा उपाय लागू पडल्यास लघवीतून खडयाची खर बाहेर पडताना जाणवते. औषध चालू केल्यानंतर आठ-दहा दिवसांत हा परिणाम दिसणे अपेक्षित आहे.माहिती सेवा गधप पेठवड़गाव याचबरोबर कुळीथाचा काढा (25 ग्रॅम कुळीथ + 200 मि.ली. पाणी मंद आचेअर उकळून 50 मि.ली द्रव तयार करणे) रोज द्यावा. असे तीन ते सात दिवस देऊन तीन-चार आठवडे थांबून परत 3 ते 7 दिवस हाच उपाय करावा.
पुनर्नवा वनस्पतीही मुतखडयावर उपयुक्तआहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.♍
या उपायांबरोबरच टोमॅटो, कोबी, अळू,, इत्यादी भाज्या जेवणातून वर्ज्य कराव्यात♍
___
मुतखडा (Kidney stone) निघून जाण्यासाठी काही उपाय:
- भरपूर पाणी प्या: दिवसातून किमान 3-4 लीटर पाणी प्यावे. पाण्यामुळे मुतखडा विरघळण्यास मदत होते आणि तो लघवीवाटे बाहेर पडतो.
- लिंबूवर्गीय फळे: लिंबू, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांमध्ये सायट्रिक ऍसिड (Citric acid) असते, जे मुतखडा तयार होण्यास प्रतिबंध करते.
- जवस (Flaxseed): जवसमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड (Omega-3 fatty acids) असते, ज्यामुळे मुतखडा कमी होण्यास मदत होते.
- डाळिंब: डाळिंबाचा रस मुतखड्यांसाठी चांगला असतो.
- कुलिथ डाळ (Horse gram): कुलिथ डाळ मुतखडा विरघळवण्यासाठी उपयुक्त आहे. ती पाण्यात उकळून ते पाणी प्यावे.
- पालक आणि टोमॅटो टाळा: ज्या पदार्थांमध्ये ऑक्सलेटचे (Oxalate) प्रमाण जास्त असते, ते टाळावेत, कारण त्यामुळे मुतखडा वाढू शकतो.
- सोडियमचे प्रमाण कमी करा: जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा.
- मांसाहार कमी करा: मांसाहारामुळे यूरिक ऍसिड (Uric acid) वाढते आणि मुतखडा होण्याची शक्यता वाढते.
डॉक्टरांचा सल्ला घ्या: हे सर्व उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण मुतखड्याचा आकार आणि तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार ते योग्य मार्गदर्शन करू शकतील.
टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे.
संदर्भ: