2 उत्तरे
2
answers
व्यसन म्हणजे काय?
1
Answer link
"व्यसन‘ हा एक संस्कृत शब्द आहे. संस्कृत वाङ्मयात तो विभाजन, नाश, अधःपात, दुबळेपणा, दुर्भाग्य, चुकीच्या सवयी, गुन्हा, पाप अशा अनेक अर्थांनी वापरलेला सापडतो; तर आयुर्वेदात तो रोग, पीडा, विषबाधा, दुःख, संकट या अर्थांनी वापरलेला आढळतो. थोडक्यात, संदर्भानुसार व्यसन शब्दाचा अर्थ निरनिराळा होऊ शकत असला, तरी त्यातून व्यसनामधील नकारात्मकताच अधोरेखित होताना दिसते.
व्यसन म्हणजे अशी सवय, जी मनुष्याला परावलंबी करून टाकते, असे म्हणता येईल. जेव्हा एखाद्या गोष्टीवाचून चालत नाही, तिच्या हव्यासापोटी काय चांगले, काय वाईट याचे भान राहत नाही, तेव्हा त्याला व्यसन म्हटले जाते. "द्यूतमद्यवेश्यादिनि व्यसनानि‘ म्हणजे द्यूत (सध्या ज्याला जुगार म्हणता येईल), मद्यपान, वेश्यागमन वगैरे गोष्टींचा आयुर्वेदात व्यसन म्हणून उल्लेख केलेला आहे. मद्यपान, धूम्रपान, अफू-भांग-गांजा वगैरेंचे सेवन, ड्रग्ज, सट्टेबाजी, जुगार, वेश्यागमन, हस्तमैथुन वगैरे अनेक प्रकारची व्यसने सध्या मोठ्या प्रमाणावर दिसतात.
0
Answer link
व्यसन म्हणजे काय?
व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय लागणे आणि ती गोष्ट न मिळाल्यास अस्वस्थ वाटणे. व्यसन हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही असू शकते.
व्यसनाचे प्रकार:
- शारीरिक व्यसन: या प्रकारात, शरीर एखाद्या पदार्थावर अवलंबून राहते. उदाहरणार्थ, सिगारेट, दारू किंवा ड्रग्सचे व्यसन.
- मानसिक व्यसन: या प्रकारात, व्यक्तीला एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा होते आणि ती न मिळाल्यास मानसिक त्रास होतो. उदाहरणार्थ, व्हिडिओ गेम्स, सोशल मीडिया किंवा जुगार खेळणे.
व्यसनाची कारणे:
- आनुवंशिकता: काही लोकांमध्ये व्यसनाधीन होण्याची शक्यता जास्त असते.
- वातावरण: मित्र आणि कुटुंबाचा प्रभाव.
- मानसिक आरोग्य: तणाव, चिंता आणि नैराश्य.
व्यसनाचे दुष्परिणाम:
- शारीरिक: हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, कर्करोग.
- मानसिक: नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश.
- सामाजिक: कौटुंबिक समस्या, आर्थिक नुकसान, गुन्हेगारी.
उपाय:
- व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन उपचार घेणे.
- मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे.
- समर्थन गटांमध्ये सामील होणे.
- स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे.
अधिक माहितीसाठी: