व्यसन शरीर आरोग्य

तंबाखूसेवनामुळे शरीराची हानी होते का?

2 उत्तरे
2 answers

तंबाखूसेवनामुळे शरीराची हानी होते का?

1
तंबाखूच्या सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यात प्रामुख्याने कॅन्सर म्हणजेच कर्करोग होतो. यात तोंडाचा कर्करोग, ओठाचा, जबड्याच्या, फुफुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कॅन्सर इत्यादी तंबाखू सेवनाने होतात. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ९० टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे. तंबाखूमुळे छातीत दुखणे, हृदयविकार झटका येणे, रक्तवाहिन्याचे विकार इत्यादी रोग जडतात. जर धूम्रपान जास्त केले तर टी बी सुद्धा होऊ शकतो. जितके जास्त धूम्रपान तेवढा जास्त टी बी माणसाला होतो. तंबाखू शरीरातील धमण्याच्या पापूद्र्याला नुकसान पोहचवतात. धूम्रपान किंवा तंबाखू हे अचानक रक्तदाब वाढविते तसेच हृदयाकडे जाणार रक्तपुरवठा कमी करते. धूम्रपानामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त बळावते. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत जाते. जी व्यक्ती धूम्रपान करते तिला हृदयरोग व पक्षाघात हा न धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या तीप्पटिने लवकर होतो. 

तंबाखूच्या सेवनामुळे ताकत कमी होते
तंबाखूच्या सेवनामुळे शारीरिक ताकत कमी होते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते. तंबाखू सेवनाने तोंडाची दुर्गंधी, केसांची दुर्गंधी, डोळ्यांखाली काळेपणा येणे, दातांना इजा पोहोचणे हे परिणाम होतात. जर गरोदर स्त्री धूम्रपान करत असेल तर त्यांच्यात गर्भपाताच्या समस्या निर्माण होतात, मूल कमी वजनाचे भरते, बाळाचा अचानक मृत्यू देखील होऊ शकतो. तंबाखूच्या सेवनाने पुरुषांमध्ये नपुंसकत्व निर्माण होते. जगात दर आठ सेकंदात एका व्यक्तीचा मृत्यू धूम्रपान केल्यामुळे होतो. एवढे दूरगामी दुष्परिणाम करणारे रोग होत असले तरी तंबाखू खाणारे मात्र याला डोळेझाकून सेवन करतात.


उत्तर लिहिले · 12/3/2024
कर्म · 765
0

तंबाखू सेवनामुळे शरीरावर अनेक प्रकारे गंभीर परिणाम होतात. काही मुख्य दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

1. कर्करोग (Cancer):

  • तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा, घशाचा, अन्ननलिकेचा, फुफ्फुसाचा, मूत्राशयाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

2. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (Cardiovascular Diseases):

  • धूम्रपान आणि तंबाखू सेवनाने रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack) आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

3. श्वसन समस्या (Respiratory Problems):

  • फुफ्फुसांना गंभीर इजा होते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि Chronic Obstructive Pulmonary Disease (COPD) सारखे आजार होऊ शकतात.

4. प्रजनन समस्या (Reproductive Problems):

  • पुरुषांमध्ये नपुंसकत्व आणि महिलांमध्ये वंध्यत्व येण्याची शक्यता वाढते. तसेच, गर्भवती महिलांनी तंबाखूचे सेवन केल्यास गर्भावर वाईट परिणाम होतो.

5. रोगप्रतिकारशक्ती कमी होणे (Weakened Immunity):

  • तंबाखू सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे विविध संक्रमण आणि आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते.

6. इतर समस्या:

  • दात आणि हिरड्यांचे रोग, दृष्टी कमी होणे, हाडे ठिसूळ होणे (Osteoporosis) यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

तंबाखूचे सेवन कोणत्याही स्वरूपात केले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक असते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. Ministry of Health and Family Welfare, Government of India
  2. World Health Organization (WHO)
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

पायाच्या अंगठ्याचा कोपरा दुखत आहे, ते बरे होण्यासाठी कोणते लिक्विड ऑइंटमेंट (liquid ointment) त्यावर सोडावे?
इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?