गुंतवणूक शेअर बाजार अर्थशास्त्र

शेयर मार्केट बद्दल माहिती मिळेल का ?

2 उत्तरे
2 answers

शेयर मार्केट बद्दल माहिती मिळेल का ?

33
शेयर म्हणजे काय:
शब्दकोशामध्ये शेयर (Share) म्हणजे हिस्सा. जेव्हा एखाद्याला खूप मोठी कंपनी काढायची असते तेव्हा तो कंपनीसाठी हिस्सेदार शोधतो. आणि हे हिस्से खरेदी करणारा जितके टक्के हिस्से खरेदी करतो तितक्या टक्के त्या कंपंनीचा हिस्सेदार असतो. ज्याच्याकडे ५० टक्केहून अधिक हिस्से असतात तो त्या कंपनीचा मालक असतो. 

शेअर बाजाराचे कामकाज: 
शेअर बाजारातून पैसे कसे मिळवता येऊ शकतात हे जर का तुम्हाला समजून घ्यावयाचे असेल तर तुम्हाला शेअर बाजाराचे कामकाज कशा प्रकारे चालते हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या व्यक्तीला शेअर्सची खरेदी किंवा विक्री बाजारात करावयाची असेल तर त्याला प्रथमत: ब्रोकरकडे ऑर्डर नोंदवणे गरजेचे असते. जेव्हा अशाप्रकारे शेअर्सच्या खरेदीची ऑर्डर ब्रोकरकडे नोंदवली जाते तेव्हा ब्रोकर त्याच्या सिस्टीमव्दारे ती एक्सचेंजकडे पाठवण्याचे काम करतो. त्यानंतर ती एक्सचेंजच्या सिस्टीममध्ये रांगेत (क्यू) उभी रहाते व त्यानंतर ती सिस्टीममध्ये लॉग झाल्यानंतर तिची सिस्टीममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणा-या शेअर्समधून खरेदीच्या व्यवहाराची पुर्तता केली जाते. अशाप्रकारे व्यवहार झाल्यानंतर ते शेअर्स ब्रोकरच्या मार्फत खरेदीदाराच्या डिमँट खात्यात वर्ग (जमा) केले जातात (किंवा पेपर रुपात खरेदीदाराला प्रत्यक्ष दिले जातात).

भारतीय शेअर बाजार – एक धावती नजर:
मुंबई (बॉंम्बे) स्टॉक एक्सचेंज (बीएसई) व नँशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हि दोन प्राथमीक एक्सचेंजेस् भारतात अस्तित्वात आहेत. या व्यतरिक्त २२ प्रादेशीक स्टॉक एक्सचेंजेस् कार्यरत आहेत. परंतु बीएसई व एनएसी हिच महत्वाची दोन एक्सचेंजेस् असून भारतातील ८०% व्यवहार हे या दोन एक्सचेंजेस् च्या माध्यमातून दर दिवशी केले जातात. दोन्ही एक्सचेंजेस् वर जवळपास सारख्यास संख्येत रोजच्या व्यवहारांची उलाढाल होत असते. सन १९९७-९८ मध्ये रोजची सरासरी उलाढाल रु.८५१ कोटी होती, ती २०११-१२ सालात रु.२३००० कोटी एवढी वाढली आहे.  एनएसी मध्ये 2120 कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.५४.१७ लाख कोटी एवढे आहे. बीएसई मध्ये ५१३३ पेक्षा जास्त कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.५९.७० लाख कोटी एवढे आहे. बहुतांशी प्रमुख कंपन्याचे शेअर्स हे दोन्ही स्टॉक एक्सचेंजीस् वर नोंदवलेले असल्यामुळे त्यांचे व्यवहार दोन्ही ठिकाणी केले जात असतात त्यामुळे गुंतवणूकदार दोन्ही पैकी कोणत्याही एका ठिकाणी त्याचे व्यवहार करु शकतो. दोन्ही एक्सचेंजीसची व्यवहार पुर्ततेचा कालावधी थोडा वेगवेगळा असल्यामुळे गुंतवणूकदार त्यांची पोझीशन शिफ्ट करु शकतो. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा प्राथमीक इंडेक्स बीएसई सेनेक्समध्ये ३० कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. तर एनएसई चा एस अँड पी एनएसई ५० इंडेक्स (निफ्टी) मध्ये पन्नास कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. बीएसई सेनेक्स हा एक जुना इंडेक्स असून तोच जास्तकरुन गुंतवणूकदारांमध्ये प्रचलीत आहे. दोन्ही कडील इंडेक्सचे अंश (indices) हे त्यामध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व कंपन्यांच्या मिळून एकत्रीत भांडवली मुल्यावर व रोजचे रोज प्रत्येक क्षणी गणले जातात. दर शनिवार व रविवारी शेअर बाजाराचे व्यवहार बंद असतात. दोन्हीकडे आता स्वयंचलीत पुर्णत: संगणकीकृत थेट (Online) व्यवहार केले जातात त्याला बोल्ट (BSE on  Line Trading) आणि नीट  (National Exchange Automated Trading) सिस्टीम म्हणून ओळखले जाते.  यामुळे अत्यंत प्रभावीपणे व वेगाने सर्व व्यवहार केले जातात ज्यामध्ये स्वयंचलीतपणे ऑर्डर जुळवली जाणे, व्यवहारांची वेगवान पुर्तता केली तर जातेच परंतु महत्वाचे म्हणजे या सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाते. बीएसई वर ज्या शेअर्सचे व्यवहार केले जातात त्यांचे ‘A’, ‘B1’, ‘B2’ ‘C’ ‘F’ व ‘Z’ या विभागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. यातील ‘A’ या विभागात असे शेअर्स असतात कि जे बदला (Carry Forward) मध्ये समाविष्ठ असतात. ‘F’ विभागात कर्जरोखे बाजाराचे निश्र्चित उत्पन्न साधनांची नोंद केली जाते (Debt Market - Fixed Income Securities) व यांचे व्यवहार केले जातात. ‘Z’ या विभागात काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्याचे शेअर्स असतात.  ‘C’ विभागात ‘A’, ‘B1’, ‘B2’ मधील ज्या सिक्युरिटीजचे ऑड लॉट मध्ये व्यवहार केले जातात अशा सिक्युरिटीजची नोंद केलेली असते. सर्व स्टॉक एक्सचे्जीस्, ब्रोकर (दलाल), डिपॉझीटरीज,  डिपॉझीटरी पार्टीसीपन्टस्, म्युच्युअल फंडस्, परदेशी अर्थसंस्था आणि अन्य सर्व सहभागीदार जे भारतातील प्राथमीक व दुय्यम भांडवली बाजारात सहभागी होतात त्या सर्वांवर सेबी (Securities and Exchange Board of India) या नियंत्रक संस्थेचे नियंत्रण असते.
 सौजन्य: mutualfundmarathi

तसेच शेयर मार्केट साठी अकाउंट कसे उघडावे आणि पैसे कसे कमवावे याकरता खालील उत्तर तुम्ही वाचू शकता:
उत्तर लिहिले · 25/10/2016
कर्म · 283320
0

शेअर मार्केट (Share Market) म्हणजे काय?

शेअर मार्केट, ज्याला इक्विटी मार्केट (Equity Market) देखील म्हणतात, हे एक असं ठिकाण आहे जिथे सार्वजनिक कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. हे गुंतवणुकदारांना कंपन्यांमध्ये मालकी खरेदी करण्याची संधी देते.

शेअर मार्केट कसे काम करते?

शेअर मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून होते. भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज खालीलप्रमाणे:

  • बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)
  • राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE)

कंपन्या त्यांचे शेअर्स पहिल्यांदा IPO (Initial Public Offering) द्वारे जारी करतात, त्यानंतर ते स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होतात. एकदा लिस्ट झाल्यानंतर, गुंतवणूकदार हे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

  1. डीमॅट खाते (Demat Account) उघडा: शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. हे खाते तुम्ही कोणत्याही स्टॉक ब्रोकरकडे उघडू शकता.
  2. संशोधन करा: शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीबद्दल माहिती मिळवा. कंपनीचे आर्थिक अहवाल, व्यवसाय मॉडेल आणि भविष्यातील योजनांचा अभ्यास करा.
  3. गुंतवणूक करा: तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरून शेअर्स खरेदी करू शकता.

गुंतवणुकीचे फायदे:

  • उच्च परतावा: शेअर्समध्ये गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
  • लाभांश (Dividend): कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही भाग लाभांश म्हणून भागधारकांना देतात.
  • मालकी: शेअर्स खरेदी केल्याने तुम्ही कंपनीचे भागधारक बनता.

गुंतवणुकीतील धोके:

  • बाजारातील अस्थिरता: शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होऊ शकतात, ज्यामुळे गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते.
  • कंपनीचे धोके: कंपनीच्या कामगिरीवर शेअर्सची किंमत अवलंबून असते.

टीप: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि आपल्या जोखमीची क्षमता विचारात घ्या.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5280

Related Questions

भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा?
1850000 लोन घेतले आहे 17139 रुपये प्रति महिना हप्ता आहे 25 वर्षासाठी हप्ता चे सहाव्या महिन्यानंतर चार लाख रुपये भरले तर मला वर्षे कीती कमी होईल साधारण पणे व्याजदर 10.25 आहे ?
1850000.₹17,139 प्रति महिना हप्ता आहे. 25 वर्षांच्या नाहप्त्याच्या सहाव्या महिन्यानंतर ₹4 लाख भरले, तर माझी मुदत किती कमी होईल? साधारणपणे व्याजदर 10.25% आहे.
₹17,139 प्रति महिना हप्ता आहे. 25 वर्षांच्या हप्त्याच्या सहाव्या महिन्यानंतर ₹4 लाख भरले, तर माझी मुदत किती कमी होईल? साधारणपणे व्याजदर 10.25% आहे.
कृषी कर्जाचे विविध स्रोत कोणते आहेत? कृषी कर्ज व्यवस्थेतील समस्या व उपाय सांगा.
टिपा लिहा निर्बंध मुक्त बाजार?
टिपा लिहा मागणी पुरवठ्यास स्वतंत्र?