Topic icon

शकुन

0




घरात कावळे येणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रात लपलेयत यामागील संकेत

 : आपण बाहेर नेहमीच कावळ्यांना पाहातो. परंतु कावळ्यांसंबंधीत काही शुभ आणि अशुभ मान्यता आहेत, ज्या आपल्यापैकी बरेच लोक पाळतात. परंतु अनेकांना याबद्दल संपूर्ण माहिती नसते, ज्यामुळे या मान्यतांबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थीत होतात. आज आम्ही तुम्हाला कावळ्यासंबंधीत रहस्य आणि त्याचे शुभ-अशुभ संकेत सांगत आहोत. हे जाणून घेतल्यावर कावळ्यांबद्दलचे तुमचे मत पूर्णपणे बदलेल.

शकुन शास्त्रानुसार घराच्या छतावर कावळ्यांचे आगमन शुभ मानले जाते. असे मानले जाते की, निसर्गाने कावळ्यांना भविष्य पाहण्याची अद्भुत शक्ती दिली आहे. म्हणूनच तो येणार्‍या वेळेचा अगोदरच अंदाज घेतो आणि तुम्हाला त्याबद्दल सावध करण्यासाठी घरी पोहोचतो.

आता कावळा आपल्याला कोण कोणत्या पद्धतीने संकेत देतो? हे जाणून घेऊ या

शकुन शास्त्रानुसार भांड्यात कावळा पाणी पिताना दिसला तर, ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की, नजीकच्या भविष्यात तुम्हाला पैसा मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामात मोठे यश मिळणार आहे.

शिवाय तुम्ही कावळ्यांचा कळप घरांच्या छतावर येऊन आवाज करत किंवा आपापसात भांडत असल्याचे दृश्य तुम्ही अनेकदा पाहिले असेल. शकुन शास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ त्या घराच्या मालकाला लवकरच अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ती व्यक्ती एकतर आर्थिक संकटात बुडणार आहे किंवा घरात कलह निर्माण होणार आहे.

असे मानले जाते की, जर सकाळी उडणारा कावळा आला आणि कोणाच्या पायाला स्पर्श केला तर ते खूप शुभ मानले जाते. म्हणजे समाजात त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढणार आहे. यासोबतच त्या व्यक्तीचे कोणतेही राहिलेलं किंवा अडकलेलं कामही पूर्ण होणार आहे.

जर कावळा तोंडात अन्नाचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा घेऊन बसलेला किंवा उडताना दिसला, तर ते देखील चांगले मानले जाते. शकुन शास्त्रानुसार या अवस्थेत कावळे दिसणे हे लक्षण आहे की, तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

जर कावळा घराच्या मुख्य गेटवर येऊन ओरडत असेल, तर तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याची चिन्हे आहेत. ज्याची माहिती कावळा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हे माँ लक्ष्मीच्या आगमनाचे म्हणजे घरात संपत्तीचे प्रतीक आहे.



उत्तर लिहिले · 12/5/2022
कर्म · 53710
2
कावळा हा पक्षी आहे, त्याला समजत नाही, पण तुम्ही मनुष्य आहात, तुमच्याकडे बुद्धी आहे.
तुम्हाला सर्व भले-बुरे समजते, फालतूच्या अंधश्रद्धांना बळी पडून दुःखी होऊ नये.
उत्तर लिहिले · 9/1/2021
कर्म · 16390
4
फक्त हाच की ह्या विशाल निसर्गातील एका जिवाचा दुसऱ्या जीवाला चुकून स्पर्श झाला. माकडाची शेपटी पकडणे, पाल अंगावर पडणे, विशिष्ट पक्षी बघितला, डावा डोळा फडफडणे हे सगळे मनाचे खेळ आहेत, याने आपल्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नाही. धन्यवाद.😊
उत्तर लिहिले · 26/4/2020
कर्म · 47820
0
चिमणी घरात घरटे बांधणे हे अनेक संस्कृतींमध्ये शुभ मानले जाते. काही मान्यतांनुसार, याचे काही संभाव्य अर्थ खालीलप्रमाणे आहेत:
  • सकारात्मक ऊर्जा: चिमणी सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्यामुळे, चिमणीने घरात घरटे बांधणे हे घरात सकारात्मक ऊर्जा येत असल्याचे लक्षण मानले जाते.
  • समृद्धी आणि सौभाग्य: काही लोकांचा असा विश्वास आहे की चिमणी घरात घरटे बांधल्याने घरात समृद्धी आणि सौभाग्य येते.
  • नवीन सुरुवात: चिमणी नवीन सुरुवात आणि आशावादाचे प्रतीक आहे. त्यामुळे, हे नवीन संधी आणि सकारात्मक बदलांचे संकेत असू शकते.
  • संरक्षण: चिमणीला संरक्षक मानले जाते आणि ती घरात नकारात्मक शक्तींना प्रवेश करण्यापासून रोखते, असा समज आहे.

याव्यतिरिक्त, चिमण्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुमच्या घरात चिमणीने घरटे बांधल्यास, ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा.

टीप: ही माहिती विविध मान्यतांवर आधारित आहे आणि त्यामध्ये अंधश्रद्धा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
पुढील माहिती किती खरी खोटी याची मला कल्पना नाही....पण समाजात नेहमी चर्चिल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत...या बरोबरच इतर पक्ष्यांचे काही संकेत असतात ..(मी फक्त संकलित माहीत देत आहे...माझं वैयक्तिक मत नाही)

◆वटवाघूळघरात शिरल्यावर : घरात वटवाघळाचा प्रवेश होणार्‍या मृत्यूचे संकेत देतं. काही लोकांप्रमाणे हे घर रिकामे होण्याचे संकेतही देतं. इतर काही लोकांप्रमाणे वटवाघूळ असे रोग पसरवतं ज्याचा प्राचीन किंवा मध्यकाळात उपचार संभव नव्हता. म्हणून हा मृत्यूचा दूत मानला जात होता.
*



■भविष्य सूचित करतात हे पक्षी, जाणून घ्या 10 मान्यता

   



दुनियाभरात हजारो-लाखो प्रकाराच्या धारणा प्रचलित आहे. तसे यामागील सत्य कोणालाच माहीत नाही. खरं म्हणजे हा प्रकार वैज्ञानिक संशोधकाचा विषय असू शकतो किंवा केवळ अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकतं.

 

आता श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा परंतु प्राचीन काळातील लोकांच्या अनुभवाने हा मान्यता गडलेल्या गेल्या आहे. येथे प्रस्तुत आहे अश्याच 10 धारणा ज्या पक्ष्यांच्या हालचालींशी जुळलेल्या आहेत. 

◆भूकंप: टिटहरी, एक लांब चोचीचा किनाऱ्यालगत आढळणारा मोठा पक्षी, ज्या दिवशी झाडावर बसलेला दिसतो त्या दिवशी भूकंप येण्याची शक्यता असते. कारणी हे पक्षी कधी झाडावर राहत नाही ते जमिनीवरच अंडी देतात आणि जमिनीवरच राहतात.





◆कावळ्याचा आवाज: पहिल्या प्रहरीत कावळ्याचा आवाज येणं पाहुणे येण्याचे संकेत देतं. 

◆दुसर्‍या प्रहरी आवाज ऐकू आल्यास व्यवसायात लाभ होतो. 

◆पहिल्या प्रहरी दक्षिण दिशेत कावळ्याचा आवाज ऐकू आल्यास लाभ मिळतो.

◆मध्यान्ह मध्ये आवाज ऐकू आल्यास पद प्राप्ती होते.

परंतु तिसर्‍या आणि चौथ्या प्रहरी कावळ्याचा आवाज आल्यास वाईट समाचार प्राप्त होतात.



◆एखाद्या शहरात किंवा गावात कावळ्यांचा कळप वाद निर्माण करतं.

◆घरावर अनेक कावळे बसल्यास मृत्यूतुल्य कष्ट झेलावं लागतं.

◆रस्त्यावर चालताना डोक्यावर कावळ्याचा स्पर्श आरोग्य आणि आयुष्यासाठी वाईट परिणाम देणारं असतं.

◆रात्री कावळे ओरडतं असल्या मोठी गडबड होण्याचे संकेत असतं.


◆घरातचिमणीचं घरटं: असे मानले आहे की घरात, अंगणात किंवा बाल्कनीमध्ये चिमणीने घरटं तयार केलं तर समजून जा घरात आनंदी वातावरण राहील. याने संकट दूर होतं आणि घरातील सदस्यांचे चित्त प्रसन्न राहतं. काही लोकांप्रमाणे चिमणीने घरट्यात अंडी दिली असल्यास घरात नवीन पाहुणा येण्याची चाहूल लागते.




◆वर्षा विचार: * जर माठातील पाणी गरम झालं, चिमणी धूळेत मस्ती करत असेल आणि मुंग्या अंडी घेऊन जाताना दिसत असतील तर लवकर पाऊस पडणार आहे.
 

◆* तितरचं जोडपं जेवत असेल आणि बृहस्पती पुष्य नक्षत्रात असल्यास त्या दिवशी पाऊस पडतो.



◆* पावसाळ्यात कावळ्यांचे आवाज केल्याविना घरटी परतणे झमाझम पाऊस येण्याचे संकेत देतं. याविपरित आभाळ दाटून आल्यावरही कबूतरांचा कळप आकाशात उड्डाण भरण्याऐवजी झाडावर शांत बसलेले असेल तर याचा अर्थ गरजणारे ढग बरसणार नाही.


◆घुबड: घुबडाची आवाज रात्रीच्या प्रथम, द्वितीय आणि चुतुर्थ प्रहरी ऐकण्यास आली तर याला आपली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मानावे. याने अर्थ लाभ, व्यवसायात लाभ आणि राजदरबारात लाभ मिळेल. परंतु एकच दिशेत वारंवार आवाज होणे, दिसणे संकटाची सूचना देतं.  याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.




◆कोकिळेचा आवाज:  दिवसाच्या प्रथम प्रहरी कोकिळेचा आवाज ऐकू आल्यास नुकसान होऊ शकतं.




◆बहिरी ससाणा: बहिरी ससाणा पक्षी दिवसाच्या प्रथम प्रहरी पूर्वीकडे दिसणे किंवा त्याची आवाज ऐकणे शुभ मानले आहे. वारंवार असं होत असल्यास शेती चांगली होते. परंतु इतर वेळी आवाज ऐकू येण्याने राज्यात संकट होण्याचे संकेत देतं.




◆कोंबडा: दिवसाच्या प्रथम किंवा दुसर्‍या प्रहरी कोंबड्यांची आवाज ऐकू आल्यास जुन्या व्यक्तीची भेट होते व सुख-सुविधांमध्ये वृद्धी होते. तिसर्‍या आणि चौथ्या प्रहरी आवाज ऐकू आल्यास जखमी होणे किंवा आगीने पेटण्याचा वाईट प्रसंग घडू शकतो.




◆कबुतराची आवाज: दिवसाच्या प्रथम प्रहरी कबुतराची गूतर गू ऐकू आल्यास अर्थ लाभ, तिसर्‍या प्रहरी ऐकू आल्यास विवाह किंवा प्रेम संबंध बनण्याचे योग असतात. परंतु चौथ्या प्रहरी ऐकू आल्यास हानी होते. कबुतर डोक्यावर उडून गेला तर जीवनातील कष्ट कमी होतात. परंतु कबुतर एखाद्या जागी राहत असल्यास त्याजागी राहणार्‍याचा नुकसान होतं


उत्तर लिहिले · 20/3/2018
कर्म · 123540
8
काही नाही होणार, थोड्या गुदगुल्या होतील पायाला एवढेच होईल.
उत्तर लिहिले · 24/6/2017
कर्म · 0