3 उत्तरे
3
answers
रा. प. महामंडळामध्ये महिला सक्षमीकरण ५० टक्के सवलत कधी सुरू झाली?
2
Answer link
महाराष्ट्र राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
0
Answer link
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये महिला सक्षमीकरणासाठी ५० टक्के सवलत 17 मार्च 2023 रोजी सुरू झाली.
हे ध्यानात ठेवा:
- या योजने अंतर्गत, महिलांना एस. टी. च्या सर्व प्रकारच्या बसमधून (शहर बस, साधी बस, निमआराम, शिवशाही) प्रवास करताना तिकिटामध्ये ५०% सवलत मिळते.
- या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे आहे.
अधिक माहितीसाठी:
- तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: MSRTC Official Website
- तसेच, विविध बातम्यांच्या संकेतस्थळांवर आणि सरकारी परिपत्रकांमध्ये तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळू शकते.