2 उत्तरे
2
answers
राज्यसंस्थेचे अंतिम अधिष्ठान कोणते?
0
Answer link
राज्यसंस्थेचे अंतिम अधिष्ठान म्हणजे
सत्तेचे वरिष्ठ वा अंतिम अधिष्ठान म्हणजे ... राज्यसंस्थेचे अंतिम उद्दिष्ट होय .
सत्तेचे वरिष्ठ वा अंतिम अधिष्ठान म्हणजे सार्वभौमत्व, सत्तेची युक्तता वा न्याय्यता (लिजिटिमसी) सनदशीर म्हणजे संविधानसहित सत्ता, सत्तारहित म्हणजे अराजक आणि सत्तायुक्त समाज, निसर्गातील दैवी किंवा धार्मिक पावित्र्य आणि सत्ता यांचा संबंध, शुद्ध नैतिक सामाजिक जीवन आणि सत्तेचा व्यवहार, समाजरचनेचे विविध प्रकार आणि त्यांची कार्ये यांचा सत्तेशी असलेला संबंध, राज्य हा सत्तेचा विकसित आविष्कार व त्या आविष्काराचे प्रकार, या आविष्कारांवाचून अस्तित्त्वात असलेले मागासलेले समाज आणि आदर्श अराजक स्थिती, एकात्मक केंद्रराज्य आणि संघराज्य यांच्यातील वैशिष्ट्ये आंतरराष्ट्रीय संबध, युद्धसंस्था इ. विषयांचा राजकीय तत्त्वज्ञान व राजकीय विज्ञान यामध्ये सोपपत्तिक ऊहापोह असतो. सनदशीर म्हणजे संविधानाशी संबद्ध सत्ता. कायद्याचे शासन, एक किंवा अनेक सत्ताधाऱ्यांचे मनमानी शासन, विशेषतः राजकीय ध्येयवाद उदा., लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद, साम्यवाद, मानवी मूलभूत हक्क, राजसत्ता, बेबंदशाही (दुरवस्था) आणि तिची कारणे यांचे अध्ययन राज्यशास्त्रांत करावयाचे असते. धार्मिक शासन आणि इहवादी शासन यांच्या संबंधाची मीमांसाही राज्यशास्त्रात विस्ताराने केलेली असते. कित्येक वेळा धर्मसंस्था ऐहिक शासन चालवीत असते. कित्येक वेळा ऐहिक शासन धर्मसंस्थेच्या प्रभावाखाली असते. कित्येकदा धार्मिक सत्ता आणि ऐहिक सत्ता यांच्यात समन्वय वा समतोल असतो. कित्येकदा ऐहिक शासनच वरिष्ठ दैवी शक्तिचे पाठबळ मिळालेले मानले जाते. वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीनंतरच्या आधुनिक युगात गेल्या दोनशे-अडीचशे वर्षांत इहवादी राज्ये शासन करू लागली आहेत. या सर्व मुद्यांचा राज्यशास्त्रात ऊहापोह असतो.
0
Answer link
राज्यसंस्थेचे अंतिम अधिष्ठान सार्वभौमत्व (Sovereignty) असते.
सार्वभौमत्व म्हणजे काय?
- सर्वोच्च अधिकार: सार्वभौमत्व म्हणजे राज्याला आपल्या अंतर्गत आणि बाह्य धोरणे ठरवण्याचा अंतिम अधिकार असतो.
- स्वतंत्र निर्णय: राज्य कोणाच्याही दबावाशिवाय निर्णय घेऊ शकते.
- अंतिम सत्ता: राज्याच्या आत कोणताही व्यक्ती किंवा संस्था राज्याच्या निर्णयाला आव्हान देऊ शकत नाही.
थोडक्यात, सार्वभौमत्व हे राज्यसंस्थेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे राज्य आपले कार्य स्वतंत्रपणे करू शकते.