लघु उद्योग अर्थशास्त्र

लघु उद्योगांना सबसिडी मिळते का आणि ती कशा प्रकारे मिळवता येते? उदाहरणार्थ, स्नॅक सेंटर, पानटपरी इत्यादी उद्योगांसाठी सबसिडी उपलब्ध आहे का?

2 उत्तरे
2 answers

लघु उद्योगांना सबसिडी मिळते का आणि ती कशा प्रकारे मिळवता येते? उदाहरणार्थ, स्नॅक सेंटर, पानटपरी इत्यादी उद्योगांसाठी सबसिडी उपलब्ध आहे का?

2
माफ करा सर स्नॅक्स सेंटर किंवा पानटपरी हा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे , उद्योग किंवा लघु उद्योग नाही.

देशातील बड्या उद्योगांना दिलेल्या अनुदानामुळे सरकार देशातील तरुणांना मदत करते. याशिवाय लघु उद्योगांना अनुदान देऊन सरकार देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अनुदानाच्या माध्यमातून दुर्बल घटकांना मदत केली जाते. शासनाच्या अन्नपदार्थांवर मिळणार्‍या अनुदानामुळे दुर्बल घटकांना आर्थिक मदत मिळते.
ज्या उद्योगात 10 लाखांपेक्षा जास्त आणि एक कोटीपेक्षा कमी गुंतवणूक असेल त्या उद्योगाला लघु उद्योग म्हटले जाईल. अशा लघुउद्योगांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • घर कूलर बनवणे
  • ॲल्युमिनियम फॅब्रिकेशन
  • हॉस्पिटल स्ट्रेचर बनवणे
  • करंट मीटर किंवा व्होल्ट मीटर बनवणे
  • कार हेडलाइट तयार करणे
  • पिशवी बनवणे
  • काटेरी तार बनवणे
  • टोपली बनवणे इ.
याशिवाय लघुउद्योगांची अनेक उदाहरणे देता येतील. यामध्ये एखादा उद्योग छोटा आहे की नाही, हे प्रामुख्याने त्याच्या खर्चावरून कळते.


लघुउद्योग : औद्योगिक धंद्यांचे स्थूलमानाने (१) मोठे उद्योग, (२) मध्यम उद्योग व (३) लघुउद्योग असे वर्गीकरण करतात. अशा वर्गवारीसाठी अनेक गमके सुचविण्यात आली आहेत. गुंतविलेले भांडवल, एकूण रोजगार, उत्पादित मालाची किंमत, त्या उद्योगधंद्यांचे व्यवस्थापकीय स्वरूप ह्यांसारख्या कसोट्यांवर हे वर्गीकरण केले जाते. तथापि गुंतविलेले भांडवल व रोजगार ह्या कसोट्यांनाच प्राधान्य दिले जाते.

लघुउद्योगांची व्याख्या अनेकदा बदलली आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ३०,००० रु. भांडवल गुंतविलेल्या कारख्यान्यास लघुउद्योग म्हटले जात होते. पंचवार्षिक योजनांच्या प्रारंभी भारत सरकारच्या ‘लघुउद्योग मंडळा’ने पाच लाख रुपयांहून कमी भांडवली गुंतवणूक असलेला व यंत्रशक्ती वापरात असल्यास ५० पेक्षा कमी कामगार असलेला कारखाना, अशी लघुउद्योगाची व्याख्या केली होती. पुढे भांडवल व कामगार या दोन कसोट्यांऐवजी भांडवलाचीच कसोटी लावण्याचा निर्णय घेतला गेला. कालांतराने सतत होत जाणारी भाववाढ लक्षात घेऊन भांडवलाची कमाल मर्यादा वेळोवेळी वाढविण्यात आली. तसेच लघुउद्योगात एक लाख रुपयांहून कमी गुंतवणूक असलेल्या एककांचे अतिलघू असे वर्गीकरण करण्यात आले. १९८० साली जाहीर केलेल्या व नंतर सुधारलेल्या भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे लघुउद्योगांचे प्रचलित वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे : (१) यंत्रे व कारखाना यांमध्ये दोन लाख रु. हून कमी गुंतवणूक असलेल्या व ५०, ००० हून कमी लोकवस्तीच्या गावी असलेल्या एककांचा ‘अतिलघू विभाग’ (२) ३५ लक्ष रुपयांहून कमी गुंतवणूक असलेल्यांचा ‘लघुविभाग’ आणि (३) अंगभूत उद्योग असल्यास ४५ लक्ष रुपयांहून कमी गुंतवणुकीच्या उद्योगांचा ‘अंगभूत विभाग’. जे उद्योग इतर उत्पादक एककांना यंत्राचे घटक भाग, त्यांच्या उत्पादनासाठी उपजुळवण्या, हत्यारे वा अर्धपक्व माल व त्यांच्या सेवेच्या वा उत्पादनाच्या ५०% मूल्यापर्यंत माल वा सेवा पुरवितात, त्यांचा समावेश अंगभूत उद्योगांत करण्यात आला आहे.

लघुउद्योग ह्या संज्ञेत खास लघुउद्योग व कुटिरोद्योग अशा दोहोंचाही अंतर्भाव होतो. ह्या दोहोतील फरकांची साधारणतः खालील गमके सांगता येतील : (१) कुटिरोद्योगात प्रायः उत्पादनकार्यात यंत्रशक्तीचा व विद्युत्‌शक्तीचा उपयोग केला जात नाही. परंतु लघुउद्योगांबाबत असे विधान करता येणार नाही. परंपरागत तंत्र वापरून, परंपरागत मालाचे उत्पादन करणारे परंपरागत धंदे असे कुटिरोद्योगांचे वर्णन केले जाते. (२) कुटिरोद्योगांच्या मालाला बाजारपेठ साधारणपणे स्थानिक असते, तर लघुद्योगांची बाजारपेठ अधिक विस्तृत असते. (३) कुटिरोद्योगांत बहुसंख्येने मालकांचे कुटुंबीयच काम करतात व वेतनदार कामगारांची संख्या मर्यादित असते. लघुद्योगांत ह्याच्या उलट परिस्थिती असते. (४) कुटिरोद्योगाला लागणारा कच्चा माल प्रायः स्थानिक बाजारपेठेतच उपलब्ध असतो, तर लघुउद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाची बाजारपेठ इतकी मर्यादित नसते. कुटिरोद्योग व लघुद्योग यांमधील भेद दाखविताना राज्यवित्तीय आयोगाने असे म्हटले आहे की, कुटिरोद्योग सर्वसाधारणतः शेतीशी संलग्न असतात आणि ते ग्रामीण भागात अर्धवेळ व शहरात पूर्णवेळ काम पुरवितात [⟶ कुटिरोद्योग]. लघुद्योग बव्हंशी शहरी विभागात पसरलेले असून ते पूर्णपणे रोजगार उपलब्ध करून देतात. भारताच्या सातव्या पंचवार्षिक योजनेत ग्रामीण उद्योगांचे व लघुउद्योगांचे आठ उपविभाग केले आहेत, ते असे : (१) खादी, (२) कुटिरोद्योग, (३) हातमाग, (४) रेशीम उत्पादन, (५) हस्तव्यवसाय, (६) काथ्या, (७) लघुउद्योग, (८) यंत्रमाग, यांपैकी ७ व ८ यांत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते व बव्हंशी ते नागरी क्षेत्रात असतात. त्यांच्यात कामगारांना पूर्ण रोजगार मिळतो व त्यांची वाढ पहिल्या सहांपेक्षा वेगाने होते. पहिल्या सहा उपविभागांतील उद्योग पारंपरिक स्वरूपाचे आणि ग्रामीण किंवा अर्धनागरी क्षेत्रातील असतात. त्यांत कामगारांना पूर्ण किंवा कमी वेळ रोजगार मिळू शकतो. त्यांच्यामुळे देशातील शिल्पकौशल्य व सांस्कृतिक कलाकृतींचा वारसा टिकून राहू शकतो.

लघुउद्योगांचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात येते : (१) शहरांत व खेड्यांत पूर्णवेळ व अर्धवेळ काम असणारे लघुउद्योग, ह्या कसोट्या लावून व (२) लघुउद्योगांचे मोठ्या धंद्यांशी असलेले नाते लक्षात घेऊन. पहिली कसोटी लावून लघुउद्योगांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल : (१) नागरी अर्धवेळ लघुउद्योग : ह्या उद्योगधंद्यांत हंगामी स्वरूपाचे काम असून मातीकाम, विटा बनविणे वगैरे धंद्यांचा ह्या वर्गात समावेश होतो. (२) नागरी पूर्णवेळ लघुउद्योग : ह्यात पूर्णवेळ रोजगार देणाऱ्या लघुउद्योगांचा अंतर्भाव होतो. उदा., विणमाल, अभियांत्रिकी, छापखाने, फीतध्वनिमुद्रक, दूरचित्रवाणीसंच, संगणकासाठी लागणाऱ्या आणि इतर इलेक्ट्रॉनिकीय वस्तू, कातडी सामान, रंग, साबण वगैरे लहान कारखाने. (३) हंगामी ग्रामीण लघुउद्योग : शेतीच्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा ह्यांत समावेश होतो उदा., गूळ, भातसडीच्या गिरण्या, खांडसरी इत्यादी. (४) पूर्णवेळ ग्रामीण लघुद्योग : ह्यांत लोहारकाम, तेलघाण्या, हस्तव्यवसाय, खेळणी, काचसामान, सुतारकाम वगैरेंचा समावेश होतो.

लघुउद्योगांचे मोठ्या उद्योगांशी नाते लक्षात घेता त्यांचे तीन विभागांत वर्गीकरण करता येईल : (१) जे लघुउद्योग संघटित उद्योगधंद्यांशी स्पर्धा करत नाहीत असे उदा., कुलपे, बटणे, मेणबत्त्या, चपला वगैरेचे कारखाने, (२) ज्या लघुउद्योगांना समान उत्पादनामुळे मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते, उदा., कापड, तेलघाण्या, भातसडीच्या गिरण्या, इलेक्ट्रॉनीय उपकरणे व माल इत्यादी. आणि (३) जे लघुउद्योग मोठ्या उद्योगधंद्यांस पूरक आहेत अशा उद्योगधंद्यांत, मोठ्या कारखान्यांत निर्माण होणाऱ्या मालाचे काही घटक निर्माण केले जातात उदा., सायकलीचे व इतर वाहनांचे सुटे भाग, विजेचे सामान, शेतीअवजारांचे सुटे भाग इत्यादींचे कारखाने.

लघुउद्योगांच्या उत्पादनात विविधता आहे. उपभोग्य वस्तू, अर्धपक्व माल, लहान यंत्रे, हत्यारे व अवजारे, मोठ्या यंत्रांचे भाग, त्यांच्यासाठी विविध भागांच्या उपजुळवण्या असे सर्व प्रकारचे उत्पादन हे उद्योग करू शकतात. यामुळे विकसित देशांतही लघुउद्योगांना महत्त्वाचे स्थान आहे. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत एकूण कामगारांपैकी साधारणपणे ४५ टक्के कामगार लघुउद्योगांत असून एकूण उत्पादनापैकी ३४ टक्के उत्पादनाचा वाटा लघुउद्योगांचा असतो. ग्रेट ब्रिटनमध्ये एकंदर कामगारांपैकी २९ टक्के कामगार ५ ते ३० कामगार असलेल्या कारखान्यांत आहेत व अशा कारखान्यांचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या १९ टक्के आहे. जपानमध्ये जवळजवळ निम्मे कामगार लघुउद्योगांत गुंतलेले आहेत.


उत्तर लिहिले · 23/8/2023
कर्म · 9415
0

लघु उद्योगांना सबसिडी (अनुदान) मिळते का आणि ती कशा प्रकारे मिळवता येते याबद्दल माहिती खालीलप्रमाणे:

  • लघु उद्योगांसाठी सबसिडी:

    होय, लघु उद्योगांना सरकार आणि इतर संस्थांकडून सबसिडी (अनुदान) मिळते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लघु उद्योगांना आर्थिक साहाय्य पुरवतात.

  • सबसिडी कशा प्रकारे मिळवता येते:

    सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला विशिष्ट योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.

  • उदाहरणार्थ, स्नॅक सेंटर, पानटपरी इत्यादी उद्योगांसाठी सबसिडी:

    स्नॅक सेंटर, पानटपरी यांसारख्या उद्योगांसाठी खालील योजनांमधून सबसिडी मिळू शकते:

    1. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY):

      या योजनेअंतर्गत, लहान उद्योगांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कर्ज दिले जाते. मुद्रा योजनेची वेबसाइट

    2. स्टार्ट-अप इंडिया योजना:

      नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी ही योजना आहे. यामध्ये आर्थिक साहाय्य, कर सवलती आणि इतर फायदे मिळतात. स्टार्ट-अप इंडियाची वेबसाइट

    3. MSME साठी क्रेडिट गॅरंटी फंड योजना:

      लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) कर्ज मिळवण्यासाठी सरकार गॅरंटी देते, ज्यामुळे बँका सहजपणे कर्ज देतात. MSME मंत्रालय वेबसाइट

    4. राज्य सरकार योजना:

      महाराष्ट्र सरकार देखील लघु उद्योगांसाठी विविध योजना चालवते. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP) आणि ‘प्रधानमंत्री रोजगार योजना’ (PMEGP) यांचा समावेश आहे.

  • कुठे संपर्क साधावा:
    • जिल्हा उद्योग केंद्र (DIC)
    • MSME विकास संस्था
    • अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील उद्योग विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकता.

टीप: कोणत्याही योजनेत अर्ज करण्यापूर्वी, योजनेचे नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

गहाणखत म्हणजे काय?
कर्ज झाले आहे काय करू?
दसादशे पाच टक्के दराने 16000 रुपयांचे मुद्दलाचे दोन वर्ष आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
दसादशे पाच टक्के दराने १६०० रुपये मुद्दलाचे दोन वर्षे आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
चक्रवाढ व्याजाचे सूत्र काय आहे?
महेशच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे, तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे?
माझी पत्नी १३००० रुपये कमावते आणि माझा खर्च मी स्वतः कमावतो. मला कोणतेही व्यसन नाही. ५ लोकांचे कुटुंब आहे, त्यामुळे शिल्लक काहीच रहात नाही. मी आजारी आहे, पण माझा खर्च मी स्वतः कमावतो. पत्नी घरखर्च चालवते.