रूढी धर्म

स्त्रिया नारळ का फोडत नाहीत?

2 उत्तरे
2 answers

स्त्रिया नारळ का फोडत नाहीत?

1


स्त्रिया का नाही फोडत नारळ


 हिंदू धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्‍याही देव-देवतांची पूजा नारळाविना अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की नारळ चढवल्याने धनसंबंधी समस्या दूर होते. पण आपण नेहमी मंदिराचे पंडित किंवा घरातील पुरुषांनाच नारळ फोडताना बघितले असतील. कारण हिंदू धर्मात स्त्रियांना नारळ फोडण्याचा हक्क मिळालेला नाही. शास्‍त्रामध्‍ये स्त्रियांनी नारळ फोडणे अशुभ असल्याचे सांगितले आहे.

 
हे ऐकून आश्चर्य वाटणे साहजिक आहे की यामागे काय कारण आहे ज्यासाठी स्त्रियांना या कामापासून वंचित करण्यात आले असावे. यामागे एक कथा अशी आहे की ब्रह्म ऋषी विश्वामित्र यांनी विश्‍व निर्मित करण्यापूर्वी नारळ निर्मित केले होते. याला मानवाचा प्रतीरूप मानले आहे. नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे. स्त्रिया बीजरुपात बाळाला जन्माला घालते म्हणून स्त्रियांनी नारळ फोडणे अशुभ मानले आहे.

.
उत्तर लिहिले · 14/8/2023
कर्म · 53710
0
स्त्रिया नारळ का फोडत नाहीत याबद्दल अनेक समज आणि मान्यता आहेत, त्या खालीलप्रमाणे:
  • पौराणिक कारण: नारळ हे बीज स्वरूपात मानले जाते आणि ते सृजनाचे प्रतीक आहे. स्त्रिया या सृजनाच्या जननी मानल्या जातात, त्यामुळे त्या नारळ फोडत नाहीत, असे मानले जाते.
  • शारीरिक कारण: नारळ फोडण्यासाठी विशिष्ट शारीरिक शक्तीची आवश्यकता असते, जी पुरुषांमध्ये अधिक असते, त्यामुळे स्त्रिया नारळ फोडत नाहीत, असा समज आहे.
  • धार्मिक कारण: काही धार्मिक मान्यतांनुसार, स्त्रिया नारळ फोडणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे काही ठिकाणी स्त्रिया नारळ फोडत नाहीत.
  • सामाजिक कारण: काही समाजांमध्ये स्त्रिया नारळ फोडणे हे पुरुषांचे काम मानले जाते, त्यामुळे स्त्रिया ते काम करत नाहीत.

या सर्व समजुती आणि मान्यता आहेत. यामागे कोणतेही ठोस वैज्ञानिक कारण नाही.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कुंभविवाह करावा का?
घर आणि कुटुंब वरवंटा फिरणे, घर फिरणे, ती घराचे वासेही फिरतात?
बहू असोत सुंदर?
स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श का नाही करत?
लग्नानंतर हळदीच्या अंगाने बाहेर का जाऊ नये?
कुंकू टिकली लावण्याचे अनेक फायदे आहेत, मग जगातील सर्व स्त्रिया कुंकू टिकली लावतात का?
बाळ जन्माला आल्यावर घरात विटाळ का पाळतात?