2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी रेजिमेंटची स्थापना कोणी केली?
            1
        
        
            Answer link
        
        २१ ऑक्टोबर १९४३ चा दिवस. सिंगापूर मधलं कॅथे चित्रपटगृह. तुडुंब गर्दीने भरलेल्या त्या चित्रपटगृहात व्यासपीठावर उभ्या राहिलेल्या नेताजींनी स्वतंत्र भारताच्या अस्थायी सरकारची घोषणा केली. जमलेल्या समूहात चैतन्याची लाट उसळली. यातच लक्ष्मी सहगल देखील होत्या. त्यांनी नेताजींची भेट घेऊन  त्यांना सांगितले की
        " मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा असून एक फौज बनवायची आहे."
दुसऱ्याच दिवशी झाशीराणी पथकाची स्थापना होऊन लक्ष्मीना पथकाची ‛कॅप्टन’ बनवण्यात आलं. नेताजींनी त्यांना आझाद हिंदच्या अस्थायी मंत्रीमंडळात सहभागी करून घेतलं. लक्ष्मी सहगल त्याच्या एकमेव स्त्री सदस्या होत्या.
पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात..
            0
        
        
            Answer link
        
        नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४२ मध्ये आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी रेजिमेंटची स्थापना केली. ही रेजिमेंट संपूर्णपणे महिलांची बनलेली होती.