मानसशास्त्र अहंकार

"मी अहंकारी नाही", काय हा अहंकार नाही? 'मी पण नसण्याचा' अहंकार माणसाला होऊ शकतो काय? "मला अहंकार नाही" काय याचा अहंकार मनुष्याला होऊ शकतो?

2 उत्तरे
2 answers

"मी अहंकारी नाही", काय हा अहंकार नाही? 'मी पण नसण्याचा' अहंकार माणसाला होऊ शकतो काय? "मला अहंकार नाही" काय याचा अहंकार मनुष्याला होऊ शकतो?

3
मी अहंकारी नाही का हा स्वतः ला प्रश्न विचारल्या सारखे झाला
माणसाला अहंकार कधी होतो त्याने चांगले वा‌ईट कृत्य करतो तेव्हा मीपणा जागृत होतो
उदाहरणार्थ मी असं केलं मी तसं केलं मी सर्व काही केलं आहे तो अहंकार
अहंकार निर्माण करू नये  अहंकार कसा हि असू शकतो माणसाला अहंकार निर्माण होतो 
मीपणाचा अहंकार असू नये स्वतः चा अभिमान गर्व वाटलं पाहिजे
आपला अहंकार आपल्याला जाणवत नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांना कळत 
पम आपल्याला अहंकार कळतो आपल्या कडून काही गोष्टी व‌ईट घडतात तेव्हा आपला अहंकार कळतो
अहंकार हा आपली उर्जा कमी करत.
स्वतः मी पणा जपावे .

********************************

‘अहंकार’ हा माणसाचा फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला कर्तृत्वाचा अहंवार असतो. तो येता-जाता साऱ्यांना सांगतो, ‘मी शून्यातून जग उभ केलं आहे.’ अरे तू खरंच विश्वमित्र आहेस का? नवीन जग बनविणारा? कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, माज. अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं.
अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही. ‘आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. ‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर रामकर्ता हा जप सतत करावा. मी कोणीच नाही ही भावना असावी. ‘अहं’चा त्याग केला की आपण सोSहं च्या मार्गावरून जातो.‘अहंकाराचा वारा न लागो मनाला‌’ असं समाजावलं की जगणं उज्ज्वल होतं..
उत्तर लिहिले · 12/7/2023
कर्म · 53710
0

तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:

"मी अहंकारी नाही", काय हा अहंकार नाही?

होय, "मी अहंकारी नाही" हे विधान अहंकार असू शकते. हे विधान स्वतःच्या नम्रतेचा दावा करते, परंतु तो दावा करताना, व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ किंवा वेगळी समजू शकते. हा सूक्ष्म अहंकार आहे.

'मी पण नसण्याचा' अहंकार माणसाला होऊ शकतो काय?

'मी पण नसण्याचा' अहंकार म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडणे किंवा स्वतःला शून्य मानणे. काहीवेळा, आध्यात्मिक मार्गावर चालणारे लोक 'मी' पणाला हरवण्याचा प्रयत्न करतात, पण या प्रयत्नात सुद्धा अहंकार डोकावू शकतो. त्यामुळे 'मी पण' नसण्याचा अहंकार होणे शक्य आहे.

"मला अहंकार नाही" काय याचा अहंकार मनुष्याला होऊ शकतो?

नक्कीच, "मला अहंकार नाही" याचा अहंकार मनुष्याला होऊ शकतो. हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. जेव्हा एखादी व्यक्ती असा दावा करते की तिला अहंकार नाही, तेव्हा ती व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा अधिक आध्यात्मिक किंवा श्रेष्ठ मानत असते. त्यामुळे, "मला अहंकार नाही" असे म्हणणे देखील अहंकाराचे लक्षण असू शकते.

अहंकार अनेक सूक्ष्म रूपांमध्ये प्रकट होऊ शकतो, त्यामुळे त्याबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1080

Related Questions

आपला सर्वात मोठा शत्रू कोणता ज्यामुळे आपण ईश्वरापासून खूप दुरावतो?
ईगो म्हणजे काय आहे?