4 उत्तरे
4
answers
ईगो म्हणजे काय आहे?
9
Answer link
इगो म्हणजे अहंकार. यालाच माज असे म्हणतात.एखाद्या गोष्टीचा अति जास्त गर्व असणे उदा,श्रीमंतीचा अहंकार.एखादा माणूस श्रीमंत असेल तर तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो.फक्त जगात मी एकटाच श्रीमंत आहे असे समजतो त्यामुळे तो त्यापेक्षा खालच्या वर्गाला कमी लेखतो व त्यांना किंमत न देता प्रत्येक गोष्टीमध्ये ते खालच्या वर्गातील आहेत असे दाखवून देतो.
‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय?
उल्हास हरी जोशी
एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता. त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे गट्ट करावा. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याच्या मागे लागली आहेत. ती गिधाडे बघुन तो कावळा घाबरला. त्याला वाटले की ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहेत. त्या गिधाडांच्या तावडीतुन सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना. कावळ्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला काही फार उंचावरून उडता येईना. एक गरूड ही गंमत बघत होता. शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा! काय भानगड आहे? तु एवढा घामाघुम का झाला आहेस?’
तो कावळा म्हणाला, ‘ हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासुन माझ्या मागे लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी मी अजुन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.’
कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला, ‘ अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत, तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहेत. तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते!’
कावळ्याने त्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडुन दिला. मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली. मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली.
आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक मांसाचा जड तुकडा आयुष्यभर आपल्या पंजात पकडुन आपण जगत असतो. या मांसाच्या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःवीषयीच्या काही भ्रामक कल्पना.
प्रत्येकाला ईगो हा असतोच. आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे अनेक जण भेटत असतात आणि आपण पण खुशी खुशी हरभऱ्याच्या झाडावर चढत असतो. आपण कोणीतरी खास आहोत, कुणीतरी स्पेशल आहोत, आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत, आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घरण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात, नातेसंबंध संपुष्टात आले तरी त्याची त्यांना पर्वा नसते. त्यांना त्यांचा ‘ईगो’ नावाचा मांसाचा तुकडाच प्राणप्रीय असतो. मग कितीही गिधाडे मागे लागली तरी त्याची यांना पर्वा नसते. गिधाडे उंच उडुन जातात पण हे मात्र मागेच रहातात. पण ज्यांना ‘ईगो’ नावाचा मांसाचा तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात.
एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेऊन बघा. विसरून बघा. ईगोपासुन सुटका करून बघा!
बघा काय चमत्कार होतो ते!
अर्थात असे करायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे

ego हा शब्द कुठुन आला आणि ego म्हणजे
काय पहा.
मानसशास्त्रज्ञ डॉ.सिग्मंड फ्रॉईड यांनी
व्यक्तिमत्वाचे तीन घटक सांगितले
१)इदम् (id)
२)अहम्(Ego)
३)पराहम्(super Ego)
व्यक्तिच्या वर्तनात या तीन घटकाचे कार्य
कसे चालते पहा
१)इदम्- हा मानसिक उर्जेचा संचयक आहे.
इदम् हा सुख तत्वावर चालतो.
कोणत्याही परिस्थितींमध्ये याला सुख
हवे असते.अतिशय हट्टि असतो.
उदा: लेक्चर सुरु असताना भुक लागली
आहे.
लहान मुलांमध्ये जास्त असते बघा
पाहिजे म्हणजे पाहिजे.
२)अहम्- हा व्यक्तिमत्वाचा प्रशासकिय भाग
आहे.
Ego हा वास्तववादी तत्वावर चालतो.
उदा: भुक लागली आहे पण आपण आत्ता
कुठे आहोत याचे भान असते.
३) पराहम्: हा नैतिक मुल्य यापासुन बनलेला
आहे.
पराहम् हा आदर्श तत्वावर चालतो.
उदा: भुक लागली असली तरी स्वत:वर
नियंत्रण ठेवा. लेक्चर सुरु असताना
उठुन जाणे आपल्या नैतिकतेत बसत
नाही.
यालाच व्यक्तिमत्वाचे सिध्दांत असे म्हणतात.
* प्रत्येक व्यक्तिच्या वर्तनात हे तीन घटक असतात व हळुहळु त्यांचा विकास होत असतो
लहान मुलांमध्ये पहिल्यांदा इदम् या घटकाचा
विकास होतो त्यामुळे ते हट्ट करत असतात.
नंतर हळुहळु त्यांच्यात समजुतदारपणा येतो
म्हणजेच अहम् व पराहम् यांचा विकास होतो.

0
Answer link
ईगो (Ego): 'ईगो' हा शब्द मानसशास्त्रातील एक संकल्पना आहे.
व्याख्या: ईगो म्हणजे 'मी' किंवा 'अहं' ची भावना. ही भावना व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. 'मी', 'माझे' आणि 'मला' या भोवती ती फिरते.
ईगोचे कार्य:
- व्यक्तीला स्वतःच्या गरजा व इच्छा पूर्ण करण्याची प्रेरणा देणे.
- बाह्य जगाशी जुळवून घेण्यास मदत करणे.
- वर्तन आणि विचार संतुलित ठेवणे.
नकारात्मक ईगो: जेव्हा 'ईगो' जास्त प्रभावी होतो, तेव्हा तो नकारात्मक रूप धारण करतो.
- अहंकार वाढतो.
- व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते.
- इतरांबद्दल आदर कमी होतो.
सकारात्मक ईगो: योग्य प्रमाणात 'ईगो' आत्मविश्वास वाढवतो आणि ध्येय साध्य करण्यास मदत करतो.
Freud यांच्यानुसार: सिगमंड फ्रয়েড यांच्या मानसशास्त्रात, 'ईगो' व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे, जो 'इड' (Id) आणि 'सुपरईगो' (Superego) यांच्यामध्ये संतुलन राखतो. Source