प्रशासन तक्रार तक्रार निवारण

तक्रार निवारण यंत्रणेवर टीप?

2 उत्तरे
2 answers

तक्रार निवारण यंत्रणेवर टीप?

0

 तक्रार निवारण यंत्रणा
यूआयडीएआय तक्रार निवारण
युआयडीएआयच्या मुख्यालयात साधारणपणे पुढील पद्धतींनी तक्रारी स्वीकारल्या जातात :

यूआयडीएआय संपर्क केंद्रांच्या माध्यमातून
आधार नावनोंदणी, अद्यतन आणि इतर संबंधित सेवांच्या संदर्भातील प्रश्न व तक्रारींची हाताळणी करण्या करिता यूआयडीएआय यांनी संपर्क केंद्र स्थापन केले आहे. नावनोंदणी केंद्रात नावनोंदणीची प्रक्रिया केल्यानंतर नावनोंदणी करणारा ऑपरेटर रहिवाशाला ईआयडी (नावनोंदणी क्रमांक) असलेली पोच पावती देईल. या ईआयडी चा वापर करून रहिवाशाला खालील माध्यमांतून यूआयडीएआय संपर्क केंद्रात जाता येऊ शकेल.


पोस्टाद्वारे
यूआयडीएआय मुख्य कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयांत तक्रारी पोस्टाद्वारे / हार्डकॉपी द्वारे प्राप्त होतात. तक्रारींचे परीक्षण होते व त्यावर सहाय्यक महासंचालक यांची मंजूरी मिळाल्यानंतर हार्डकॉपी संबंधित क्षेत्रीय कार्यालय/मुख्य कार्यालयातील संबंधित विभाग, यूआयडीएआय मधील सार्वजनिक तक्रार अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येते. तक्रार कोश, यूआयडीएआय, मुख्य कार्यालय सूचनेच्या अंतर्गत संबंधित क्षेत्रीय कार्यालय/संबंधित विभाग तक्रारदाराला थेट प्रत्युत्तर देऊन तक्रार निरस्त करतात. अंतरिम प्रत्युत्तरे देणे आवश्यक असल्यास, ती संबंधित क्षेत्रीय कार्यालये/मुख्य कार्यालयातील संबंधित विभागातर्फे देण्यात येतात.

भारत सरकारच्या सार्वजनिक तक्रार पोर्टल द्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी
यूआयडीएआय यांच्याकडे भारत सरकारच्या pgportal.gov.in या पीजी पोर्टल द्वारे तक्रारी प्राप्त होतात. या pgportal मध्ये खालीलप्रमाणे प्रकार आहेतः

डीपीजी (सार्वजनिक तक्रार संचालनालय),
डीएआरपीजी (प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रारी विभाग)
पालक संघटना,
थेट प्राप्ती,
राष्ट्रपती सचिवालय,
पेन्शन,
मंत्री कार्यालय,
पंतप्रधानांचे कार्यालय.
तक्रारींचे परीक्षण केले जाते व त्यांवर यूआयडीएआय चे सार्वजनिक तक्रार अधिकारी असलेल्या सहाय्यक महासंचालक यांची मंजूरी मिळाल्यानंतर त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालय/ मुख्य कार्यालयातील संबंधित विभागाकडे ऑनलाईन अग्रेषित केल्या जातात. संबंधित क्षेत्रीय कार्यालय/विभाग तक्रारीचे ऑनलाईन निवारण करते. अंतरिम प्रत्युत्तरे देणे आवश्यक असल्यास, ती संबंधित क्षेत्रीय कार्यालय/मुख्य कार्यालयातील संबंधित विभागातर्फे देण्यात येतात.

ईमेल द्वारे
यूआयडीएआय अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा तक्रार ई-मेल द्वारे प्राप्त होत असतात. अशा ईमेल्स चे परीक्षण केले जाते व ते संबंधित क्षेत्रीय कार्यालय/मुख्य कार्यालयातील संबंधित विभागाकडे अग्रेषित केले जातात. त्यानंतर तक्रार कोशाकडून सूचना मिळाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालय/मुख्य कार्यालयातील संबंधित विभाग तक्रारदाराला ई-मेल पाठवून तक्रारीचे निवारण करते.

उत्तर लिहिले · 22/2/2023
कर्म · 53720
0
तक्रार निवारण यंत्रणा:

तक्रार निवारण यंत्रणा म्हणजे कोणत्याही संस्थेशी किंवा कंपनीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तयार केलेली एक प्रणाली. यात ग्राहक, कर्मचारी, भागधारक किंवा इतर हितधारक यांच्या तक्रारींचा समावेश असू शकतो.

तक्रार निवारण यंत्रणेची उद्दिष्ट्ये:

  • तक्रारींचे जलद आणि प्रभावीपणे निराकरण करणे.
  • तक्रार निवारण प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता आणणे.
  • संबंधित संस्था किंवा कंपनीची प्रतिमा सुधारणे.
  • ग्राहक आणि इतर हितधारकांचे समाधान वाढवणे.

तक्रार निवारण यंत्रणेचे घटक:

  • तक्रार स्वीकारण्याची प्रक्रिया (उदा. ऑनलाइन फॉर्म, हेल्पलाईन, ईमेल).
  • तक्रारींचे वर्गीकरण आणि नोंदणी.
  • तक्रारींची चौकशी आणि विश्लेषण.
  • तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना.
  • तक्रार निवारणाच्या प्रगतीचा मागोवा घेणे.
  • तक्रारकर्त्याला निराकरणाबद्दल माहिती देणे.

भारतातील काही महत्त्वाच्या तक्रार निवारण यंत्रणा:

  • ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (https://consumeraffairs.nic.in/acts-and-rules/consumer-protection): हा कायदा ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करतो आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विविध यंत्रणा पुरवतो.
  • लोकपाल (https://lokpal.nic.in/): हे केंद्र सरकारमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आहे.
  • बँकिंग लोकपाल (https://cms.rbi.org.in/rbi/vividh/english/pgs/bankingombudsman.aspx): बँकिंग सेवांविरुद्धच्या तक्रारींसाठी ही यंत्रणा आहे.
  • Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) (https://www.irdai.gov.in/): विमा कंपन्यांविरुद्धच्या तक्रारींसाठी ही यंत्रणा आहे.

प्रत्येक संस्थेत एक मजबूत तक्रार निवारण यंत्रणा असणे आवश्यक आहे, जी जलद, प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने कार्य करते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

ग्रामीण रुग्णालयावरील कर्मचाऱ्यांची तक्रार कुठे करावी?
ग्रामीण रुग्णालयावरील कर्मचाऱ्यांची तक्रार कुठे आणि कशी करावी?
महावितरण कंपनीच्या कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार करावी जर मेन कनेक्शनची तार तुटलेली असेल तर?
आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत पथदिवे (high-mast light) लावण्यात आले होते, तरी ती सध्या बंद पडलेली आहे. ती चालू करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल?
प्रयोगशाळेने आपले निष्कर्ष जिल्हा मंचाला किती दिवसात पाठवायचे असतात?
या सुविधे संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास आपण कोणाकडे तक्रार करतो?
एअरटेल कंपनी विषयी कोणती तक्रार असल्यास ती कोणाकडे किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडे शेअर करावी?