मानसशास्त्र विचार

अज्ञान असावे पण अहंकार असू नये, का म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

अज्ञान असावे पण अहंकार असू नये, का म्हणतात?

0

अज्ञान असावे पण अहंकार असू नये, का म्हणतात  

अहंकार अशी गोष्ट आहे जी भल्या भल्यांचा घात करते. ज्ञानाचा, पैशाचा, सुंदरतेचा किंवा अजूनही अनेक गोष्टींचा अहंकार माणसाला असतो. त्यातूनच त्याच्या आयुष्यात वाईट गोष्टी घडतात. त्यातून तो कधी कधी दुसऱ्यांना दोष देतो, बोल लावतो. पण जोपर्यंत त्याला आपल्यामध्ये अहंकार आहे याची जाणीवच होत नाही तोपर्यंत त्याचे सुधारणे अशक्य असते. म्हणूनच म्हटले जाते, "अज्ञान असावे पण अहंकार असू नये." कारण अज्ञानी माणसाला ज्ञान शिकवले जाऊ शकते. त्याच्याकडे गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. मात्र अहंकारी माणूस काहीही जाणून घेण्याची इच्छा ठेवत नाही. कारण आपल्याला सगळं काही माहिती आहे या भ्रमातच तो सुखी असतो.
अज्ञानामुळे व्यक्ती आणि त्याच्या विचारांवर वाईट प्रभाव पडून त्याचा परिणाम सामाजिक जीवनावर देखील होऊ शकतो. परंतू अज्ञानी व्यक्तीला त्याची चूक दाखवून देऊन हाताबाहेर गेलेली परिस्थिती बदलण्याची एक संधी असते. जी संधी अहंकारी माणूस कधीच घेऊ शकत नाही. मला अमुक एका गोष्टीतले काही माहिती नाही किंवा मला ही गोष्ट येत नाही याला आपण अज्ञान असे म्हणतो. पण हेच मला सगळ्यातलं सगळं काही येतं, सगळं काही माहिती आहे, हा झाला अहंकार. अज्ञान ही गोष्ट जेवढ्या सहजतेने स्वीकारली जाऊ शकते तेवढा अहंकार स्वीकारला जात नाही. मुख्य म्हणजे अहंकारी माणसाला तुला अहंकार आहे असे तोंडावर जरी सांगितले तरी त्याला ते पटणारे नसते. म्हणजेच काय तर कोणतीही गोष्ट आपल्यात आहे अशी स्वीकारली तर ती बदलता येते पण जिथे ती आपण स्वीकारच करत नाही, तिथे ती बदलणं अशक्य असतं.
अहंकारी माणूस आपल्याच हाताने स्वतःचा घात करुन घेण्यासाठी समर्थ असतो. ही केवळ बोलायची गोष्ट झाली असे नाही तर संशोधनातून देखील हे सिद्ध झालं आहे. इतरांवर टीका करणे, जज करणे, आपला दोष इतरांवर ढकलणे अशाप्रकारच्या नकारात्मक विचारांची पैदास अहंकारी व्यक्तीमध्ये होत असते. अहंकारी व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत असतो त्यामुळे त्याचे सगळ्यांवर नेहमी नियंत्रण असावे असे त्याला वाटत असते. माझ्या मैत्रिणीसोबत नेमके हेच झाले. तिला आपण हुशार असण्याचा प्रचंड गर्व होता. एकदा ऑफीसमध्ये एक नवीन कामाची जबाबदारी आम्हा दोघींवर सोपवण्यात आली. मला ते काम जमत नाही, त्याची फारशी माहिती नाही असे मी माझ्या सीनिअरकडे जाऊन प्रांजळपणे कबूल केले आणि माझ्या अज्ञानाचा स्वीकार केला. त्यामुळे सरांनी कसं काय काम करायचं याची कल्पना दिली. मात्र माझ्या मैत्रिणीच्या अहंकारापायी तिने कोणालाही काहीही विचारण्याचे कष्ट घेतले नाहीत व सगळे काम चुकीचे केले. यामुळे साहजिकच तिला ओरडा तर खावा लागलाच, शिवाय झालेल्या नुकसानामुळे महिनाभराचा पगार देखील तिला मिळाला नाही. म्हणजेच काय तर अज्ञान कधीच माणसाचे नुकसान करत नाही पण अहंकार मात्र रावाचा रंक करू शकतो.
मुळात आपण अज्ञानी आणि अहंकारी आहोत, हे स्वीकारले तर गोष्टी बदलायला सोप्या जातात. कारण अहंकार व्यक्तीला कोणत्याच मार्गाने उपयोगी नसतो. अहंकार केवळ माणसामाणसांत फूट पाडतो. गरीब-श्रीमंत अशी दुफळी निर्माण होण्यामागे अहंकाराचा वाटा सर्वाधिकच असतो. शिवाय नात्यामध्ये येणारी कटुता, द्वेष हे कधीच माणसाला सुखी, समाधानी आयुष्य देऊ शकत नाहीत. त्यामुळे जर आपल्यामध्ये अहंकाराची भावना बळावत असेल तर त्याचा निःसंकोचपणे स्वीकार करा. आपल्यात चांगले बदल घडवून आणा. नवनवीन गोष्टी, माहिती, ज्ञान घेण्यासाठी सदा तत्पर राहा. आपली चूक मान्य करण्यात कोणताही कमीपणा न बाळगता ती चूक सुधारण्याला प्राधान्य द्या. आत्मपरीक्षण करण्याला वाव द्या आणि अज्ञान व अहंकाराचा नेमका अर्थ लक्षात घेऊन योग्य अयोग्य विचार करण्याची सवय स्वतःला लावून सुखी आयुष्य जगा.
उत्तर लिहिले · 14/2/2023
कर्म · 53715
0

अज्ञान असावे पण अहंकार असू नये, असे म्हटले जाते कारण अज्ञान आणि अहंकार दोन्ही नकारात्मक गोष्टी आहेत, पण त्यातील अहंकार अधिक घातक आहे.

अज्ञान:

  • अज्ञान म्हणजे माहितीचा अभाव.
  • अज्ञानामुळे माणूस काही गोष्टी करू शकत नाही, पण तो शिकू शकतो आणि ज्ञान मिळवू शकतो.
  • अज्ञान हे सुधारले जाऊ शकते.

अहंकार:

  • अहंकार म्हणजे स्वतःला खूप मोठे समजणे आणि इतरांना कमी लेखणे.
  • अहंकारामुळे माणूस शिकण्यास तयार नसतो, कारण त्याला वाटते की त्याला सर्व काही माहीत आहे.
  • अहंकारामुळे माणूस इतरांचे ऐकत नाही आणि त्यामुळे त्याची प्रगती थांबते.
  • अहंकार माणसालाBlind बनवतो.

म्हणून, अज्ञान असले तरी ते सुधारता येते, पण अहंकारामुळे माणूस स्वतःलाच सुधारण्याची संधी देत नाही. यामुळेच अज्ञान असावे पण अहंकार असू नये, असे म्हटले जाते.

अधिक माहितीसाठी आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

पटतंय का बघा? हा प्रश्न ही तू वर निर्भर आहे, म्हणजे तू हा विश्वास, स्थिर मन, विवेक, दृष्टीकोन आहे आणि समाज मोठा तर राष्ट्र मोठे ही सद्भावना ध्यानात घेता, हे विश्वचि माझे घर अशी संकल्पना कधी अवतरीत होईल, त्यावेळी माणूस माणसाला प्रिय असेल आणि रामराज्य अवतरेल?
स्टीफन पेंढार यांनी आधुनिकतावादी लेखकासमोर कोणते विचार मांडले ते स्पष्ट करा?
कोणतेही काम कमी दर्जाचे नसते या विधानाविषयी तुमचे मत सांगा?
कोंबडी शिवाय उरूस नाही....अन् भानगडी शिवाय पुरुष नाही.. हे व पु.काळे यांनी म्हंटले होते काय?
सर्जनशीलता म्हणजे काय? सर्जनशीलतेचे विचार स्पष्ट करा.
लेखकांचा विचार व त्यांची सूत्रे यांचा संबंध स्पष्ट करा?
शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्ती आहे, असे फिरोझ मसानी का म्हणतात?