प्रशासन सामन्याज्ञान शासकीय सेवा

पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक कसे मिळवावे?

2 उत्तरे
2 answers

पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक कसे मिळवावे?

1
कोणत्याही शासकीय कार्यालयात तसे वैयक्तिक नंबर लावलेले नसतात. कार्यालयाचा एक लँडलाइन नंबर असतो. सदर नंबर सुरु असेलच असे नाही. तरी काही विभागात अधिकारी किंवा कर्मचारी स्वतःचा मोबाईल नंबर भिंतीवर लावतात, त्या माध्यमातून संपर्क क्रमांक मिळेल. तसेच आपण एखाद्या विभागात काम घेऊन गेलात, तर आपणास अधिकारी मोबाईल क्रमांक त्यांच्या मर्जीने देतील. यात अनेक लोकांचे फोन कॉल घेणे जिकिरीचे होते आणि ऑफिस कामाच्या वेळा सोडूनही नागरिक फोन करतात, पर्यायाने अधिकारी फोन उचलत नाही किंवा नंबर देत नाही व बंद करतात. तरीही आपण विनंती करून कर्मचाऱ्याकडून नंबर घेऊ शकतात व ऑफिस वेळेत फोन करू शकतात.
उत्तर लिहिले · 15/2/2023
कर्म · 11785
0
पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काही मार्ग वापरू शकता:
  1. पंचायत समिती कार्यालय: तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन तुम्ही थेट संपर्क क्रमांक मिळवू शकता.
  2. ग्रामपंचायत कार्यालय: तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधा. तेथील कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला पंचायत समितीतील संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळू शकतील.
  3. जिल्हा परिषद: जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर किंवा कार्यालयात संपर्क साधून पंचायत समिती अधिकाऱ्यांची माहिती मिळवता येते.
  4. RTI अर्ज: माहिती अधिकार (RTI) अर्ज दाखल करून तुम्ही पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवू शकता.

ॲप्स आणि वेबसाईट: काही ॲप्स (Apps) आणि वेबसाईटवर शासकीय कार्यालयांतील संपर्क क्रमांक उपलब्ध असतात, त्यांची मदत घ्या.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3000

Related Questions

आपले सरकार पोर्टल व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे का?
महा ई सेवा केंद्रात मी नाव बदलण्याबाबत विचारले असता, एका केंद्रावर गॅझेट करावे लागेल आणि 1000 रुपये फी लागेल असे सांगितले, तर दुसऱ्या महा ई सेवा केंद्रात 850 रुपये सांगितले. असे का? याबद्दल तक्रार करता येईल का?
जर मला ७/१२ सायबर कॅफे मध्ये जाऊन काढायचा आहे, तर तो कसा काढावा?
महाराष्ट्रामधील कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल आणि नॅशनलिटी हे सर्व सर्टिफिकेट्स आपण मोबाईलवर काढू शकतो का?
आपण ७/१२ ऑनलाईन पाहू शकतो, तसेच ग्रामपंचायतचा कारभार किंवा घरपट्टी स्टेटस पाहू शकतो का?