2 उत्तरे
2
answers
वाचनाचे प्रमुख प्रकार काय आहेत आणि त्याचे स्वरूप लिहा?
0
Answer link
वाचनाचे प्रमुख प्रकार
1. प्रकटवाचन
2. मूकवाचन
अ) प्रकटवाचन
प्रकटवाचन ही एक कला आहे. प्रकटवाचन हे नेहमी दुसऱ्यांसाठी केले जाते. त्यामुळे प्रकटवाचन सूव्यवस्थित, स्पष्ट व शुद्ध असावे लागते. त्याचप्रमाणे ते प्रभावी असावे लागते. साधारणपणे, गद्यपाठ, कविता, नाट्य, वृत्त इत्यादींचे प्रकटवाचन केले जाते. चांगल्या प्रकटवाचनासाठी निकष खालीलप्रमाणे सांगता येतात.
1. अक्षरांचे, शब्दांचे स्पष्ट व शुद्ध उच्चार करता येणे..
2. आवाजात सहजता असणे, योग्य चढ-उतार असणे.
3. योग्य विरामचिन्हासहित वाचने.
4. सुयोग्य गतीने वाचन येणे.
5. लेखनातील भावनेशी समरस होऊन वाचता येणे व त्या भावना वाचनात प्रतिबिंबित करता येणे.
आ) मूकवाचन :
अक्षरांचे डोळयांद्वारे ग्रहण करून मेंदूद्वारे त्याचे अर्थग्रहण करणे, उच्चार करतांना मनातल्या मनात वाचणे याला मूकवाचन म्हणतात. मूकवाचन हे
दुसऱ्यांसाठी नसून स्वत:साठी केले जाते. त्यामुळे मूकवाचनातून अर्थग्रहण करण्याची जबाबदारी स्वतःची असते. वाचन, अवांतर वाचन, विस्तृत वाचन हे सुद्धा मूकवाचनच असते. चांगल्या मूकवाचनाचे निकष पुढीलप्रमाणे सांगता येतात.
1. एकाच दृष्टीत जास्तीत जास्त शब्द सामावून शीघ्र गतीने वाचता येणे.
2. वाक्यातील विविध शब्दांचा संदर्भानुसार असणारा अर्थ चटकन लक्षात घेणे.
3. शब्दाचा वाच्यार्थ, लक्षार्थ व ध्वन्यार्थ लक्षात येणे.
4. एका परिच्छेदाचा दुसऱ्या परिच्छेदाशी असणारा संबंध लक्षात ठेवून वाचता येणे.
5. वाचत असताना उताऱ्यातील प्रमुख विचारांची, कल्पनांची, भावनांची नोंद मनात करता येणे.
0
Answer link
वाचनाचे प्रमुख प्रकार आणि त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे:
वाचनाचे प्रमुख प्रकार:
- सस्वर वाचन:
स्वरूप: मोठ्या आवाजात वाचणे. हे वाचन मुख्यतः लहान मुले करतात, ज्यामुळे त्यांना शब्द आणि अक्षरांची ओळख होते.
- मौन वाचन:
स्वरूप: मनातल्या मनात वाचणे. हे वाचन आकलनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. यात ओठ हलत नाहीत किंवा आवाज काढला जात नाही.
- द्रुत वाचन:
स्वरूप: कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती वाचणे. हे वाचन परीक्षेच्या वेळी किंवा माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त आहे.
- विश्लेषणात्मक वाचन:
स्वरूप: वाचलेल्या माहितीचे विश्लेषण करणे, त्यातील सत्यता तपासणे आणि त्याबद्दल विचार करणे.
- समग्र वाचन:
स्वरूप: एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी विस्तृत वाचन करणे.