प्रथा धर्म

सोवळं म्हणजे नक्की काय?

2 उत्तरे
2 answers

सोवळं म्हणजे नक्की काय?

0


सोवळं म्हणजे नक्की काय


कोकणातले दिवस आजही आठवतात. आम्ही उठायच्या आधी आजीचा दिवस सुरु व्हायचा. ती कायम सोवळे नेसून स्वयंपाक करायची. देवपुजा करताना आजोबा आणि बाबासुद्धा सोवळे वस्त्र परिधान करुन देवाची पुजा करायचे. खूपदा मी आईकडून ऐकले होते, ’आजीचे सोवळे फार कडक असते.’ मी विचार करायचे नक्की हे सोवळे म्हणजे काय? मी घरी आई-वडिलांना विचारले असता समजले की, सोवळे म्हणजे असे वस्त्र जे रेशमाचे किंवा सुती कापडाचे असते. सोवळे वस्त्र म्हणजे पुरुषांसाठी धोतर, पितांबर आणि उपरणे तर स्त्रियांसाठी लुगडे हे स्वच्छ धुतलेले असते. तसेच इतर कपड्याबरोबर ते धुतले किंवा वाळवले जात नाही.
रेशीम विद्युतवाहक आहे. मंत्रोच्चाराने निर्माण होणारी विद्युत ऊर्जा रेशमी आसनाने आणि रेशमी वस्त्राने वाढते. रेशीम सत्वगुणोत्पादकही आहे. रेशमाप्रमाणेच ऊर्जा म्हणजे लोकरही विद्युत्पादक आहे धर्मशास्त्रात म्हटले आहे, `ऊर्जा वातेन शुघ्यति' म्हणजे लोकर केवळ वाऱ्याने म्हणजे वाऱ्यावर झटकल्यानेही शुद्ध होते. ती दररोज धुवावी लागत नाही. सोवळे नेसूनच धार्मिक विधी केले जातात. आधी काही ठिकाणी अगदी घरातला रोजचा स्वयंपाकसुद्धा सोवळे नेसून केला जायचा. आता शहरात हा प्रकार पहायला मिळत नाही पण गावात आजही सोवळे नेसले जाते. आपल्याकडे सत्यनारायण पूजा किंवा कोणते धार्मिक कार्य करताना गुरुजी सोवळे परिधान करतात. स्वयंपाक जर घरी होणार असेल तर जे महाराज किंवा गुरुजी स्वयंपाक करतात ते देखील सोवळ्यात स्वयंपाक करतात. सोवळ्यात असणे याचा अर्थ दुसऱ्याला हात लावू नकोस सांगून हिणवणे असा अर्थ होत नाही. आपल्यापुरती स्वच्छता पाळून आपले हाती घेतलेले कार्य पार पाडावे असे शास्त्राने सुचवले आहे. ही संकल्पना केवळ स्वच्छतेशी निगडित आहे. बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुण्याचा संस्कार आपल्याकडे आहे. खरंतर या संस्काराची आठवण कोरोनाने आपल्याला पुन्हा एकदा करून दिली. हात धुणे, सॅनिटाईज करणे, वस्तू एका जागी ठेवणे हे सुद्धा एक प्रकारचे सोवळेच आहे म्हणायला हवे.
सोवळे याचा अर्थ स्वच्छता असा घेतला जातो म्हणून पुजा करताना किंवा कुठलेही धार्मिक कार्य करताना सोवळ्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. तसेच सोवळे हे कायम एकाच ठिकाणी ठेवले जाते. त्यामुळे आंघोळीपूर्वी किंवा तत्सम काही कारणामुळे सोवळ्याला हात आपण लावत नाही. सोवळ्याला धार्मिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. सोवळे ही खरी तर व्यापक संकल्पना आहे. सोवळे याचा अर्थ ‘स्वच्छता’ किंवा ‘नियमांचे पालन’ असा होतो. मंगलकार्यात पुरुषाने परिधान केलेल्या रंगीत वस्त्रालाही ‘सोवळे’च म्हटले जाते. नऊवारी साडी ही स्त्रियांसाठी एका प्रकारचे सोवळेच आहे. कारण पूर्वीच्या काळात किंबहुना अजूनही काही ठिकाणी नऊवारी परिधान करूनच स्त्रियांचा स्वयंपाक चालतो. नऊवारी परिधान करून स्वयंपाकघरात शिरलेल्या स्त्रीला कोणीही शिवायचे नाही या रूढीला स्वच्छतेच्या संदर्भाशी अनेकदा जोडले जाते. त्याचप्रमाणे सोवळे नेसलेल्या पुरुषाच्या देवपूजेमध्ये अन्य कोणत्या व्यक्तीने व्याधी आणू नये, असाही एक धार्मिक संदर्भ आहे. पूर्वीच्या काळात चालणारे कडक सोवळे सध्या फारसे कुठे पाहायला मिळत नाही.
पारंपरिक सोवळे नेसण्याचीही एक विशिष्ट पद्धत होती. स्त्रिया साडी नेसताना जशा निऱ्या करतात, तशाच प्रकारच्या निऱ्या पारंपरिक सोवळे नेसताना कराव्या लागतात. निऱ्या व्यवस्थित झाल्या नाहीत, तर सोवळे व्यवस्थित नेसले गेले नाही, असे समजले जाते. त्याचप्रमाणे दोन्ही पायांच्या मधून निऱ्या घातलेला भाग पाठीमागील बाजूस खोचला जातो. त्याला ‘कासोटा’ असे म्हटले जाते. या सर्व गोष्टी प्रत्येकाला जमतीलच असे नाही. पारंपरिक सोवळे नेसण्याचे तंत्र जमले नाही तर चांगलीच पंचाईत होते. त्यामुळे गेल्या काही काळापासून विशेषत: गणेशोत्सवादरम्यान सोप्या पद्धतीने नेसता यावे असे सोवळे बाजारात उपलब्ध होऊ लागले आहे.
तसे पाहिले तर सोवळे प्रत्येकाच्या मानण्याचा आणि न मानण्याचा प्रकार आहे. देव, धर्म कार्याशी संबंधित आपण जेव्हा एखादी उपासना करतो तेव्हा देहाइतकीच मनाची शुद्धी राहावी, पावित्र्य राहावे याकरिता अन्य विषय, विकार यांची जडण न होता स्वच्छता जपली जावी हाच उद्देश आहे. या संकल्पनेचा संबंध कोणत्याही ठराविक जातीशी जोडणे चुकीचे ठरेल. धर्मशास्त्राने सर्वांच्या हिताच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने काही नियम घालून दिले आहेत, त्याचे आपण डोळसपणे पालन केले पाहिजे. याठिकाणी सोवळे देहासाठी नसून मनासाठी असायला हवे, हे लक्षात घेतले पाहिजे.
उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 53720
0

सोवळं म्हणजे हिंदू धर्मातील एक आचार आहे. यात शारीरिक आणि मानसिक शुद्धता पाळण्यावर भर दिला जातो. सोवळं आचरणात असणारे लोक विशिष्ट कामे करताना काही नियम पाळतात, ज्यामुळे त्यांची शुद्धता टिकून राहावी असे मानले जाते.

सोवळं पाळण्याचे काही नियम:

  • स्नान करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करणे.
  • विशिष्ट ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय धुणे.
  • अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळणे.
  • ठराविक अन्नपदार्थ खाणे किंवा टाळणे.

सोवळं पाळणे हे व्यक्तिपरत्वे आणि कुटुंबपरत्वे बदलू शकते. काही लोक फक्त पूजा करताना सोवळं पाळतात, तर काही जण नेहमीच पाळतात.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

अरबी कल्याणम ही केरळमधील प्रथा काय आहे?
कोणत्या मंदिरात देवीला चप्पलची माळ अर्पण केली जाते?
वडिलांच्या मृत्यूनंतर नवीन खरेदी का करू नये?
ख्रिश्चन धर्मामध्ये स्त्रिया टिकली का लावत नाहीत?
रात्रीच्या वेळी शिट्टी का वाजवू नये?
महिलांनी मारुतीला जावे का नाही?
करगोटा का वापरतात?