अंधश्रद्धा सामान्यज्ञान प्रथा

रात्रीच्या वेळी शिट्टी का वाजवू नये?

2 उत्तरे
2 answers

रात्रीच्या वेळी शिट्टी का वाजवू नये?

3
शिट्टी म्हणजे रात्री भुरट्या चोरी करणाऱ्या चोरांचा कोडवर्ड असतो . म्हणुन रात्री शिट्टी वाजवून नये असे लोक म्हणतात. चोरी दरोडा घालण्याच्या उद्देशाने आलेले चोर आपले सहकारी वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या ठिकाणी टेहाळणी करण्यासाठी किंवा तिथे आपला माणूस असेल तर सोपे पडेल म्हणून पाठवत.
आमच्याकडील उदाहरण सांगते

पूर्वी आमचा गावाकडे असताना घराजवळ आजूबाजूला जंगल असायचे. घरामध्ये शौचालय नसायचे. तसेच पाण्याची विहीर किंवा झरा किंवा धरण थोड्या दूर अंतरावर निर्मनुष्य अशा ठिकाणी असायचे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव रात्री घराबाहेर पडायचे झाल्यास शिट्टीमुळे निशाचर प्राण्यांचे संकट आपसूकच स्वतःवर ओढवले जाण्याचा धोका अधिक असायचा.

काही वेळेस रात्रीच्या प्रवासातून दरोडेखोरांचा धोका व्हायचा. त्यामुळे जुने लोक त्यांचा पुढच्या पिढीला चार अनुभवाच्या गोष्टी सांगताना रात्री शिट्टी वाजवू नये असे सांगायचे. हे ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीला जाई.

सध्या शहरात असताना रात्रीची शिट्टी वाजवणे त्या दृष्टीने धोकादायक नाही. परंतु एखाद्या परस्त्रीसमोर वाजवली असता तोही गुन्हा ठरू शकतो. तेव्हा जरा जपून. हो एकांतात असताना किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये असताना बिनधास्त वाजवा.

बरे या शिट्टीचा उपयोग मोठमोठ्या गुप्तहेरांनी सांकेतिक इशारे करण्यासाठी केलेला आहे असे इतिहास सांगतो. आणि बऱ्याचदा या मोहीम रात्रीच्याच असायच्या. असो.


उत्तर लिहिले · 11/3/2022
कर्म · 121765
0
रात्रीच्या वेळी शिट्टी वाजवू नये याबद्दल अनेक समज आणि मान्यता आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • नकारात्मक ऊर्जा: काही लोकांचे असे मानणे आहे की रात्रीच्या वेळी शिट्टी वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि घरात अशांती निर्माण होते.
  • वाईट शक्ती: अजून एक समज असा आहे की रात्री शिट्टी वाजवल्याने वाईट शक्तींना आमंत्रण मिळतं.
  • आरोग्यावर परिणाम: काही लोकांच्या मते, रात्री शिट्टी वाजवल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि नकारात्मक विचार वाढतात.
  • झोपमोड: रात्रीच्या वेळी शिट्टी वाजवल्याने आजूबाजूच्या लोकांची झोपमोड होते, ज्यामुळे ते लोकdisturb होऊ शकतात.
  • धार्मिक कारणे: काही धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीच्या वेळी शिट्टी वाजवणं शुभ मानलं जात नाही.
या समजुती किती खऱ्या आहेत याबद्दल ठोस पुरावा नाही, परंतु अनेक वर्षांपासून या गोष्टी लोकांमध्ये रूढ आहेत.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

गोसावी लागणे म्हणजे काय?
कपाळावर दारिद्र्याचा शाप असलेली?
शाप म्हणजे काय?
झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? अशी का मान्यता आहे?
विज्ञान आणि अंधश्रद्धा यावर चर्चा करा?
अंधश्रद्धा हा एक सामाजिक आजार आहे का?
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने जोर धरला, कारणे लिहा?