शिक्षण वाचन

वाचन म्हणजे काय? वाचनाची उद्दिष्ट्ये स्पष्ट करा.

2 उत्तरे
2 answers

वाचन म्हणजे काय? वाचनाची उद्दिष्ट्ये स्पष्ट करा.

0
वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, योग्य अयोग्य काय याची जाणीव करवून देते. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार होतो . वच म्हणजे बोलणे .वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, योग्य अयोग्य काय याची जाणीव करवून देते. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार होतो . वच म्हणजे बोलणे .वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, योग्य अयोग्य काय याची जाणीव करवून देते. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार होतो . वच म्हणजे बोलणे .






वाचन हा मराठी शब्द आहे. तर वाचणे ह्या क्रियापदाचे सर्वनाम. ह्याला इंग्रजीत ‘Reading’ म्हणतात. हा एक सर्वोत्तम छंद मानला जातो. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण तुम्ही नक्की एकली असाल. वाचन वेगवेगळ्या भाषांमध्ये करता येते. मातृभाषेतून केलेले वाचन समजण्यास सोपे जाते. मराठीत वाचनासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. वाचनाने माणूस शहाणा होतो आणि त्याला पुस्तकासारखा नवा मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. या लेखात आपण वाचन म्हणजे काय व वाचनाचे प्रकार काय आहेत ते जाणून घेणार आहोत.

वाचन म्हणजे काय | वाचनाचे प्रकार व उद्दिष्टे
वाचन म्हणजे काय
आकलनासह ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन. वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा अंगभूत विकास होतो. वाचनाने आवाज जोपासतो. वाचनाने सौंदर्य आणि आनंद दोन्ही प्राप्त होतात. वाचन क्षमतेचा परिपूर्ण विकास त्यातून निर्माण होणाऱ्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो.


वाचन माणसाला माणूस बनवते, जीवनाला नवी दिशा देते, विचार करायला शिकवते, आत्मपरीक्षण करते, बरोबर काय आणि चूक काय याची जाणीव करून देते. संस्कृतमध्ये ‘वचन’ हा शब्द ‘वच’ या धातूपासून बनला आहे. वच म्हणजे बोलणे. आणि वाच तुम्हाला बोलायला लावणारे. अर्थात वाचन हाच सक्षम बनण्याचा मार्ग आहे.


वाचनाचे प्रकार
1. प्रगट वाचन – अक्षराच्या ध्वनीच्या मोठ्या उच्चारांना प्रगट वाचन म्हणतात.


2. सस्वर वाचन – स्ववासासाठी विद्यार्थ्याने वाचन किंवा वाचनाला सस्वर वाचन म्हणतात.

3. सुस्वर वाचन – शिक्षकाने विद्यार्थ्यासाठी केलेल्या वाचनाला सुस्वर वाचन म्हणतात.


4. मुकवाचन – काही न बोलता मूकपणे केलेले वाचन म्हणजे मुकवाचन होय.

वाचनाची मुख्य उद्दिष्टे
ज्ञान संपादन – पुस्तके आणि इतर पुस्तके वाचून ज्ञान संपादन केले जाते.
आनंदप्राप्ती – आनंदासाठी चांगले साहित्य वाचले पाहिजे.
संस्कार – वाचनाने माणसाच्या मनावर चांगले संस्कार तयार होतात.
रसस्वाद – कथा, कविता, कादंबरी, नाटके, ज्यातून रसग्रहण दृष्टी प्राप्त होते.
आनंदवृत्ती – वाचनाने मन आनंदाच्या भावनेने भरते.

उत्तर लिहिले · 31/1/2023
कर्म · 53720
0

वाचन म्हणजे काय?

वाचन म्हणजे केवळ अक्षरे वाचणे नव्हे, तर त्या अक्षरांनी तयार झालेल्या शब्दांचा अर्थ समजून घेणे आणि त्यातून काहीतरी बोध घेणे होय. वाचनामुळे आपल्याला नवीन माहिती मिळते, आपले ज्ञान वाढते आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते.

वाचनाची उद्दिष्ट्ये:

  • ज्ञानवृद्धी: वाचनाचा मुख्य उद्देश ज्ञान मिळवणे आहे. पुस्तके, लेख, वर्तमानपत्रे वाचून आपण जगातील घडामोडी आणि ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील माहिती मिळवू शकतो.
  • समज विकसित करणे: वाचनामुळे आपली आकलन क्षमता वाढते. आपण एखादी गोष्ट वाचतो तेव्हा त्यातील विचार आणि कल्पना समजून घेतो. त्यामुळे आपली विचारशक्ती सुधारते.
  • शब्दसंग्रह वाढवणे: वाचनामुळे आपल्या शब्दांच्या ज्ञानात भर पडते. नवनवीन शब्द आणि त्यांचे अर्थ आपल्याला समजतात, ज्यामुळे आपली भाषा अधिक समृद्ध होते.
  • मनोरंजन: वाचन हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. कथा, कादंबऱ्या वाचून आपल्याला आनंद मिळतो आणि ताण कमी होतो.
  • व्यक्तिमत्व विकास: वाचनामुळे आपल्या विचारांना नवी दिशा मिळते. चांगले साहित्य वाचल्याने आपल्यातील सकारात्मक दृष्टिकोन वाढतो आणि व्यक्तिमत्व विकास होतो.
  • भाषा सुधारणे: वाचनामुळे आपली भाषा अधिक शुद्ध आणि प्रभावी होते. आपल्याला व्याकरण आणि वाक्यरचना यांविषयी अधिक माहिती मिळते.

थोडक्यात, वाचन हे एक अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. त्यामुळे व्यक्तीला ज्ञान, मनोरंजन आणि व्यक्तिमत्व विकास साधता येतो.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

मी २००५ मध्ये इयत्ता १० वी मध्ये नापास झालो आहे, माझा एक विषय गेला आहे. आता मला २०२६ मध्ये १० वी बोर्ड परीक्षा द्यायची आहे, मी परीक्षा देऊ शकतो का? परीक्षा देण्याची पद्धत काय असेल?
मूळ मराठी शिकत असताना शिकण्याची प्रक्रिया अधिक उन्नत कशी करता येईल?
गणेश काय अभ्यास करतो ते सांगा?
12वीला ४८.९३ टक्के आहेत, इंग्रजी थोडे कच्चे आहे, गणित चांगले आहे, पुढे काय करावे सुचत नाही?
औपचारिक शिक्षण म्हणजे काय?
केवळ प्रात्यक्षिकाचा प्रयोग?
माझी मुलगी ११वी सायन्स शाखेत शिक्षण घेत आहे आणि तिला गुण कमी मिळाले आहेत. आता ती १२वी कला शाखेत प्रवेश घेऊ इच्छिते, तर तिला १२वी कला शाखेत प्रवेश मिळेल का? जर मिळत असेल, तर प्रक्रिया काय असेल? कृपया लवकर उत्तर अपेक्षित आहे.