2 उत्तरे
2
answers
नारळाचा जन्म कसा झाला?
0
Answer link

नारळाचा जन्म कसा झाला
हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्त्व आहे. पूजा विधी तसेच प्रत्येक शुभ आणि मंगल कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. त्याला श्रीफळ असेही म्हणतात. परंतु तुम्हाला हे फळ कुठून आले, त्याला धार्मिक कामात एवढे महत्त्व का दिले गेले हे माहीत आहे का. चला तर मग आज जाणून घेऊयात नारळाचा जन्माची कथा.
प्राचीन काळी इक्ष्वाकु वंशात सत्यव्रत नावाचा राजा राज्य करत होता. सत्यव्रत रामाचा पूर्वज होता. तो अत्यंत धार्मिक आणि पुण्यवान होता. त्याच्या राज्यात सर्वत्र सुख समृध्दी होती. एवढे सारे सुख असताना राजाची स्वर्गलोकात जाण्याची इच्छा होती. त्याला स्वर्ग लोकाचे सौंदर्य आकर्षित करत होते. परंतु राजाला स्वर्गलोकात जाण्याचा रस्ता माहीत नव्हता.
तरुणपणात सत्यव्रताला त्याच्या वडिलांनी राज्यातून हाकलून दिले होते. त्याच्या वनवासाच्या काळात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी ऋषी विश्वामित्र हे वनामध्ये घोर तपश्चर्या करायला गेलेले होते. कुटीपासून चालत चालत खूप दूर निघून गेले होते. अनेक महिने ते परत आले नाहीत त्यामुळे त्यांचे कुटुंब तहान आणि भुकेने व्याकूळ झाले होते. सत्यव्रत राजाला हे समजल्यानंतर त्याने ऋषी विश्वामित्र यांच्या परिवाराला अन्न धान्य देऊन मदत केली. सत्यव्रताने ऋषी विश्वामित्रांच्या पत्नी आणि मुलांचे रक्षण केले. सत्यव्रत नंतर त्याच्या राज्याचा राजा झाला.
ऋषी विश्वामित्र घोर तपश्चर्या करून, अनेक महान सिद्धी प्राप्त करून काही काळाने कुटीमध्ये आले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सुखी पाहिल्यावर ते अत्यंत आनंदी आणि चकित झाले. त्यांनी कुटुंबाला विचारले की मी इथे नसताना तुमची कोणी काळजी घेतली. तेव्हा सर्वांनी राजाने त्यांची कशी मदत केली याचे गुणगान गायले. हे ऐकून ऋषी विश्वामित्र लागलीच आभार मानण्यासाठी राजाच्या महालात गेले आणि त्यांनी राजाची भेट घेतली. सत्यव्रतने त्यांचा आदर सत्कार केला करून येण्याचे कारण विचारले तेव्हा विश्वामित्र यांनी केलेल्या मदतीसाठी राजाचे आभार मानले आणि वरदान मागण्यास सांगितले.
तेव्हा मनात दडून बसलेली राजाची इच्छा बाहेर आली व राजा म्हणाला की मला एकदा स्वर्गलोक पाहायची इच्छा आहे. कृपा करून मला तिथे जाण्याचे वरदान द्यावे. आपला पराक्रम सिद्ध करण्यासाठी ऋषी विश्वामित्र यांनी त्यांच्या प्राप्त केलेल्या शक्तीने राजासाठी स्वर्गलोकात जाणारा रस्ता बनवला.
हे पाहून सत्यव्रत अत्यंत आनंदी झाला आणि तत्काळ त्या बनवलेल्या रस्त्याने स्वर्ग लोकात गेला. परंतु सत्यव्रत आपल्या नश्वर शरीराने स्वर्गात पोहोचला तेव्हा ते नियमांच्या विरुद्ध असल्याने इंद्र क्रोधित झाला. त्याने सत्यव्रताला स्वर्गातून हाकलून दिले. त्यामुळे सत्यव्रत जमिनीवर येऊन पडला. राजाने दुःखी होऊन घडलेली घटना विश्वामित्र यांनी सांगितली.
राजाची गोष्ट ऐकून विश्वामित्र रागावले. त्यांनी सर्व देवतांना झालेल्या घटनेबद्दल विचारणा केली आणि या समस्येतून एक तोडगा काढला. त्यानंतर राजासाठी एक नवीन स्वर्ग लोक बनवण्यात आले. कोणालाच काही अडचण होऊ नये म्हणून नवीन स्वर्ग लोकाला पृथ्वी आणि देवांच्या स्वर्गलोकामध्ये बनवण्यात आले.
नवीन स्वर्गलोक जोरदार वाऱ्याने पडू नये अशी चिंता ऋषी विश्वामित्र यांना वाटली. जर असे झाले तर राजा सत्यव्रत परत खाली पडेल!खूप विचारविमर्श करून ऋषींना एक उपाय सुचला. त्यांनी स्वर्गलोकाला आधार मिळावा म्हणून त्याच्या खाली एक लांबलचक मोठा खांब लावला.
असेही म्हणतात की, राजाला इंद्राने हाकलून लावल्यानंतर जेव्हा ऋषी विश्वामित्रांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या जादूची शक्ती वापरली आणि सत्यव्रताला पृथ्वीवर पडण्यापासून रोखले. त्यामुळे सत्यव्रत हवेत लटकून राहिला. त्याला मदत करण्यासाठी विश्वामित्राने त्याच्या खाली एक खांब ठेवला अशी ही एक कथा आहे.
असे मानले जाते की नवीन स्वर्ग लोकाच्या खाली लावण्यात आलेला खांब एका मोठया वृक्षाच्या रूपात बदलला. एवढेच नाही तर काही काळाने सत्यव्रत राजाच्या मृत्यू नंतर त्यांचे डोके एका फळामध्ये रुपांतरीत झाले. राजाचे डोके नारळ म्हणून ओळखले जाऊ लागले. याच गोष्टीमुळे नारळाचे झाड एवढे लांब असतात आणि त्याचे फळ सुद्धा खूप उंचावर असते असे म्हणतात.
काही कथांनुसार पृथ्वीलोक आणि स्वर्गलोकाच्यामध्ये लटकून राहिल्यामुळे राजाला त्रिशंकू असे नाव मिळाले. ज्याचा अर्थ होतो ना इकडचा ना तिकडचा. नारळाचे खरखरीत बाहेरील तंतुमय आवरण हे प्रतिकात्मकपणे राजा सत्यव्रताच्या केसांसारखे दिसते आणि बाहेरील दोन प्रमुख काळे डाग हे राजाचे डोळे आहेत असे मानले जाते.
या कथेतून अशी शिकवण मिळते की जर शुध्द पवित्र मनाने आपण कोणाची मदत केली तर ईश्वर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. चांगले कर्म करणे हेच आपल्या हाती असते बाकी देणारा परमेश्वर एवढा प्रेमळ आहे की सत्यव्रत साठी स्वर्गाचा रस्ता बांधला तसा चांगल्या व्यक्तीसाठी तो पुढील सुखाची वाट तयार करतच असतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा.
0
Answer link
नारळाचा जन्म एका विशिष्ट कथेनुसार खालीलप्रमाणे झाला आहे:
एका गरीब माणसाला एका दुष्ट राजाने मारले. त्या माणसाच्या कबरीवर नारळाचे झाड उगवले. म्हणून, नारळ हे त्या गरीब माणसाचे प्रतीक आहे.
या कथेनुसार, नारळाच्या झाडालाSymbolism आहे.
टीप: ही कथा केवळ एक मान्यता आहे आणि नारळाच्या जन्माचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: