कृषी फळझाडे

तोडलीचा फायदा काय आहे?

2 उत्तरे
2 answers

तोडलीचा फायदा काय आहे?

1
आपण तोंडलीची भाजी दररोजच खात नाही, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. -तोंडलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी तोंडली फायदेशीर आहेत. तोंडली लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे.
    
आपण तोंडलीची भाजी दररोजच खात नाही, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तोंडली खाण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? 
 : आपण तोंडलीची भाजी दररोज खात नाहीत, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंडलीच्या भाजीच्या चवीपेक्षाही त्यात जीवनसत्त्वाचा खनिज खूप मोठ्या प्रमाणात आहे. 100 ग्रॅम तोंडलीमध्ये सुमारे 1.4 मिलीग्राम लोह, 0/08 मिलीग्राम व्हिटॅमिन बी -2 , 0.07 मिलीग्राम व्हिटॅमिन-बी 1, 1.6 ग्रॅम फायबर आणि 40 मिलीग्राम कॅल्शियम असते. (
-तोंडलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी तोंडली फायदेशीर आहेत. तोंडली लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे. यामुळे आपल्या नियमित आहारात तोंडल्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.


-रोज तोंडली खाल्ल्याने एसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तोंडली अत्यंत महत्वाची मानली जातात. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते.

-तोंडल्यामध्ये कॅलरी कमी असतात. खूप वेळ पर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. ताप, घशाच्या समस्यांवरील इलाजावर औषधाचे काम देखील तोंडली करते. नियमित तोंडली खाल्ल्याने सर्दी आणि ताप वारंवार येण्यावर नियंत्रण आणले जाऊ शकते.

-उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात तोंडली नियमित समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. तोंडली नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.

-मधुमेह असलेल्या लोकांसाठी तोंडली फायदेशीर आहेत. दररोज तोंडलीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित केली जाते. यात प्रतिरोधक स्टार्च असतो, जो सहजपणे शरीरात शोषला जात नाही.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)


उत्तर लिहिले · 4/9/2021
कर्म · 121765
0
तोडली (Tordali) एक भाजी आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत:
  • पोषक तत्वे: तोडलीमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
  • कॅलरीज: ह्या भाजीमध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रणात मदत करते.
  • पचन: तोडली पचनासाठी चांगली असते.
  • मधुमेह: रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • इतर फायदे: रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि त्वचेसाठी चांगली असते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

नारळाचा जन्म कसा झाला?
संत्री लिंबू झुडपे आहे का?
ऑलिव्ह कशाची जात आहे?
पुणे परिसरात आंब्याची कलमी झाडे कोठे मिळतील?
फणस या झाडाविषयी माहिती द्या. त्याची रोपे कुठे मिळतील? परिपक्व झाडाचे लाकूड लावले तर फुटते का?
नारळाची फुले कशी असतात?
माझ्या घरात पाच फूट उंचीचे पेरूचे झाड आहे, त्याला कलम कसे करावे?