भारत भूगोल हवामान

भारताचे हवामान कोणत्या प्रकारात आहे?

4 उत्तरे
4 answers

भारताचे हवामान कोणत्या प्रकारात आहे?

0
मानसून
उत्तर लिहिले · 16/1/2023
कर्म · 5
0
भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपुर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मौसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळते. भारतात साधारणपणे ६ मुख्य प्रकारचे हवामान आढळून येतात त्यात अंदमान मध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरीत जंगलांपासुन ते पश्चिम राजस्थान मधील थरचे वाळवंट पण आढळते. दक्षिण भारतातील उष्ण दमट हवामानापासुन ते उत्तरेतील हिमालयामध्ये पाइन वृक्षाची जंगले तसेच हिमनद्या व शीत वाळवंटाचा समावेश होतो. परंतु या वैविध्यतेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते मौसमी वारे व त्यानी येणारा पाउस ज्यावर संपूर्ण भारत, खासकरून शेती उद्योग अवलंबुन आहे. भारतात ढोबळमानाने ४ ऋतु आढळून येतात. मौसमी पावसाचा काळ (जून ते सप्टेंबर), मौसमी पावसानंतरचा काळ (ऑक्टोबर ते डिसेंबर), हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी) व उन्हाळा (मार्च ते मे).

भारतीय हवामानात वैविध्यता येण्यास मुख्यत्वे येथील भौगोलिक परिस्थिती जवाबदार आहे व हवामानाचे संपूर्ण नियंत्रण हे उत्तरेतील हिमालय व पश्चिमेतील थरच्या वाळवंटामुळे होते. हिमालय मुख्यत्वे उत्तरेकडून गोबीच्या वाळवंटाकडून येणारे जबरदस्त थंड वारे रोखुन धरतो व थरचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंद महासागरातू व अरबी समुद्रातुन बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो. यामुळे भारताचे एकूणच हवामान वर्षभर गरमच असते. तसेच कर्कवृत हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्याने भारताला तसे विषुववृतिय देशातच धरले जाते. इतर विषुववृतिय देशांप्रमाणे भारतात देखील हवामानात टोकाचे बदल होउ शकतात. खूप पाउस, प्रचंड दुष्काळ, चक्रिवादळे, पुर व इतर नैसर्गिक आपत्तिंचा या देशाला बरेचदा सामना करावा लागतो.
उत्तर लिहिले · 16/1/2023
कर्म · 7460
0

भारताचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे.

भारताच्या हवामानावर अनेक घटकांचा प्रभाव असतो, ज्यात भारताची भौगोलिक स्थिती, हिमालय पर्वतरांगा आणि मान्सून वाऱ्यांचा समावेश होतो.

हवामानाची वैशिष्ट्ये:

  • उष्ण तापमान: येथे वर्षभर तापमान जास्त असते.
  • मान्सून वारे: नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस येतो.
  • ऋतू: भारतात प्रामुख्याने तीन ऋतू असतात: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. महाराष्ट्र टाइम्स: भारताचे हवामान
  2. लाईव्ह मिंट: एल নিনो आणि भारतीय मान्सून
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

सचेत ॲप हवामानाबद्दल काय माहिती देते?
हवामानासाठीचे संकेत देणारे ॲप्स कोणते आहेत?
सचेत ॲप व दामिनी ॲप बद्दल माहिती?
हवेतील बाष्पाचे संघनन होऊन काय तयार होते?
हिमाल‌याच्या क्षेत्रात कोनत्या स्वरूपाचा पाऊस पढ़ता ?
हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ का असतो?
भारत व ब्राझील यांचे स्थान, विस्तार व हवामान, तापमान, पर्जन्यमान या घटकांमध्ये होणारे देश आणि दिशानुसार बदल विश्वकोश किंवा इंटरनेटचा वापर करून सांगा?