भारत ब्रिटिश इतिहासकार इतिहास

भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार संकल्पना चित्र?

2 उत्तरे
2 answers

भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार संकल्पना चित्र?

0
भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल
  (१) ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल थाने 'द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया' हा ग्रंथ लिहिला, (२) १८१७ साली त्याने तीन खंडांत हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ म्हणून या ग्रंथचे महत्व आहे. (३) तरीही, जेम्स मिलच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. (४) भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा त्याचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन या ग्रंथातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो.

(४) जेम्स प्रेट डफ.

उत्तर : (१) जेम्स ग्रँट डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याने ए हिस्टरी ऑफ द मराठाज्' हा ग्रंथ तीन खंडांत लिहिला. (२) मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिण्याच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रॅट डफ याचा समावेश होतो. ३) भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती जेम्स ग्रँट डफच्या या इतिहास ग्रंथातही जाणवते. परंतु पहिला सुसूत्र, एकसंध मराठ्यांचा इतिहास हे या ग्रंथाचे मूल्य महत्त्वाचे आहे.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात प्रवेश झाल्यावर रॉबर्ट ऑर्म या कंपनीच्या अधिकृत इतिहासकाराने लिहिलेल्या त्रिखंडात्मकहिस्टरी ऑफ द मिलिटरी ट्रँझॅक्शन्स ऑफ द ब्रिटिश नेशन इन इंदोस्तान या पुस्तकापासून भारताच्या इंग्रजी इतिहासलेखनास प्रारंभ झाला. भारताच्या ब्रिटिशपूर्व इतिहासाच्या सर्वांगीण संशोधनाला चालना कलकत्त्यास सर विल्यम जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली १७८४ मध्ये स्थापन झालेल्या ‘एशियाटिक सोसायटी’ या संस्थेमुळे मिळाली. संस्थेच्या एशियाटिक रिसर्चेस या नियतकालिकात भारतीय इतिहासलेखनाची बरीच सामग्री उपलब्ध होऊ लागली. पण भारताचा पहिला सर्वांगीण इतिहास जेम्स मिल (६ खंड–१८१८) याचा. त्याने इंग्‍लंडमधील सरकारी कागदपत्रांचा वापर केला. त्याने भारतात पाऊलही ठेवले नव्हते, तरी उपयुक्ततावादी दृष्टीकोनातून भारतीयांच्या संस्कृतीवर प्रखर टीका केली. कंपनीच्या सनदी नोकरांसाठी हा इतिहास क्रमिक पुस्तक म्हणून नेमला गेला. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. हॉरिस हेमन विल्सन हा संस्कृतचा अभिमानीत्याने मिलच्या इतिहासात आणखी चार खंडांची भर टाकली व आपल्या टिप्पणांतून जागोजाग मतभेद व्यक्त केला (१८४४). एकोणिसाव्या शतकातील बहुसंख्य इंग्रज इतिहासकारांवर मिलचा विलक्षण प्रभाव होता. जॉन मॅल्कम, पीटर ओबर, एडवर्ड थॉर्नटन, जॉन कॅपर यांच्या साम्राज्यवादी पवित्र्यांचा उगम मिलमध्ये आहे. १८५७ च्या उठावावर अनेक इतिहासग्रंथ लिहिले गेले. त्यांतील कित्येक आठवणींच्या स्वरूपाचे, निव्वळ व्यक्तिपूजक म्हणून वगळलेतरी उरलेल्यांत एतद्देशीय शिपायांच्या अत्याचारांच्या वर्णनांचे व तदानुषंगिक भारतीयांवरील टीकेचे भरपूर खाद्य आहे. विशेषतः १८५७ नंतर साम्राज्यवाद्यांचे पीकच आले. मेकॉलेने आपल्या निबंधातून क्लाइव्हला गौरविले होते पण वॉरन हेस्टिंग्जवर टीका केली होती. ब्रिटिश साम्राज्य आणि त्याचा मोठेपणा हा केंद्रबिंदू धरून लिहिण्याच्या इंग्रज प्रवृत्तीवर ठळक प्रकाश पडतो, तो रूलर्स ऑफ इंडिया या मालेमुळे. विल्यम हंटर हा अभ्यासू सनदी नोकरपण त्याने संपादिलेल्या या २८ चरित्रांच्या मालेत २२ चरित्रे इंग्रजांची आहेत. जॉन केसारख्या विपुल इतिहासलेखन करणार्‍याने अफगाणयुद्धसुद्धा एकतर्फी रंगविले. इंग्रजांच्या मोठेपणाच्या गुणगानात बरेच इतिहासग्रंथ लिहिणाऱ्या मॅलेसनने फ्रेंचांच्या गौरवाची भर टाकली. बेव्हरिज, सर जॉन सीली यांसारखे इतिहासकार तर उघडच वसाहतवादी होते. पण जॉर्ज फॉरेस्ट, सॅम्युअल हिल यांनी अस्सल कागदपत्रेही याच कामी उपयोगात आणली. जॉन मार्शमन, जॉर्ज पोप यांसारख्या मिशनरी आणि विल्यम मोरलंडसारख्या आर्थिक इतिहासकारांचा हेतूही ब्रिटिश राज्यामुळे भारताची भौतिक आणि नैतिक उन्नती झाली, हे दाखविण्याचा होता. ॲल्फ्रेड लायलसारख्याने त्यात सखोलपणा आणला पण व्हिलरसारख्या सामान्य इतिहासकाराला त्याची आवश्यकता भासली नाही. सामान्यतः ब्रिटिश सनदी नोकरांचे इतिहासलेखन महसुलासारखे शासकीय प्रश्न सोडवण्याच्या अनुरोधाने झाले. व्हिन्सेंट स्मिथने मात्र प्राचीन व मध्ययुगीन भारताचा सखोल अभ्यास केलापण त्याच्या इतिहासलेखनात भारतीय जनतेत घडून येत असलेल्या परिवर्तनाची चाहूलही लागत नाही. व्हर्नी लव्हेटने राष्ट्रीय चळवळीचा इतिहास लिहिला (१९१८) त्यातही राष्ट्रवाद ही पाश्चात्त्य कल्पना भारतीय बहुजनसमाजाला अज्ञात आहे, हा सिद्धांत मांडला. स्मिथच्या प्राचीन भारताच्या इतिहासाचा नायक अलेक्झांडर आहे. मिलचा आणि त्या परंपरेतील लेखकांचा विसाव्या शतकातील अवतार म्हणजे केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया (६ खंड, १९२१–२८). त्यांत प्राचीन व ब्रिटिश अंमलातील लोकजीवनाकडे सामान्यतः दुलर्क्ष केले आहे.
उत्तर लिहिले · 31/1/2023
कर्म · 9455
0

भारताचा इतिहास लिहिणाऱ्या काही ब्रिटिश इतिहासकारांची संकल्पना चित्रे:

1. जेम्स मिल (James Mill):
  • 'द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया' (The History of British India) हे पुस्तक लिहिले.
  • या पुस्तकात भारताच्या इतिहासाला हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश अशा तीन कालखंडांमध्ये विभागले.
  • त्यांच्या लिखाणात প্রাচ्यवादी (Orientalist) दृष्टिकोन दिसतो, ज्यामुळे भारतीय संस्कृती आणि इतिहासाकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले गेले.
2. विन्सेंट स्मिथ (Vincent Smith):
  • 'अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया' (Early History of India) आणि 'ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया' (Oxford History of India) यांसारखी पुस्तके लिहिली.
  • त्यांच्या लेखनात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रित केले.
  • भारतीय इतिहासाला समजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काही ठिकाणी साम्राज्यवादी दृष्टिकोन दिसतो.
3. विलियम विल्सन हंटर (William Wilson Hunter):
  • 'द इंडियन एम्पायर: इट्स हिस्ट्री, पीपल अँड प्रोडक्टस' (The Indian Empire: Its History, People and Products) हे पुस्तक लिहिले.
  • भारताच्या सामाजिक आणि आर्थिक पैलूंचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला.
  • ब्रिटिश प्रशासनाच्या दृष्टिकोनातून भारताकडे पाहिले.
4. माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन (Mountstuart Elphinstone):
  • 'हिस्ट्री ऑफ इंडिया' (History of India) हे पुस्तक लिहिले.
  • या पुस्तकात भारतीय इतिहासाचे विस्तृत विश्लेषण केले आहे.
  • त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा आदर करण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रिटिश दृष्टिकोन कायम ठेवला.

या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाला ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून मांडले, ज्यामुळे त्यांच्या लेखनात काही त्रुटी आणि पूर्वग्रह दिसतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5220

Related Questions

भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार कोण आहेत?
भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार?
भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार कोण?