कुटुंब अभ्यास मानसशास्त्र एकाग्रता

मी जेव्हा अभ्यासाला बसतो, तेव्हा मला मोबाईलचे distraction होते आणि मला सारखी माझ्या कुटुंबाची आठवण येते, मी या साठी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

मी जेव्हा अभ्यासाला बसतो, तेव्हा मला मोबाईलचे distraction होते आणि मला सारखी माझ्या कुटुंबाची आठवण येते, मी या साठी काय करावे?

2
जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा मोबाईलचे distraction होते आणि सारखी कुटुंबांची आठवण येते तर काय करावे
आपण जे ध्येय ठरवले आहे. तर अभ्यासाचे महिन्यांचे, आठवड्यांचे नियोजन असेल. कितीही कंटाळा आला तरी हे काम पूर्ण करायचेच अशी चिकाटी असेल. मोबाईल, मित्र, झोप, टिवी या उपद्रवी गोष्टींपासून अभ्यासाच्या वेळात दूर रहाण्याची शिस्त असेल. या काळासाठी मोबाईल घरातून नष्ट करा.
अभ्यास करताना मोबाईल बाजुला ठेवा मोबाईल बाजूला ठेवण्या आधी आपल्या कुटुंबाला फोन करा आणि मोबाईल तुमच्या पासून दूर ठेवा मग तुमचं मन विचलित होणार नाही.   आणि अभ्यास करताना कुटुंबाची आठवण येणार नाही.

जसं की मोबाईल चार्ज करता तसं आपण हि आपला मेंदू चार्ज करावा आपल्या कुटुंबाशी बोलून मग अभ्यासात लक्ष लागेल.
अभ्यासासाठी शांत जागा असू द्या. काही लोकांचा एकाच जागी एकांतात अभ्यास होतो तर काहींचा लोकांमधे. मी पहील्या प्रकारात होतो.

भोवताली गोंगाट असेल तर हेडफोन लावून काहीतरी शांत संगीताचा उपयोग होतो असे माझी मूले सांगतात. मला ते पटायला अवघड जाते पण त्यांचे निकाल बघून काही बोलू शकत नाही.

ध्यानधारणा करून मनात कल्लोळ उडवणारे विचार दूर होऊन लक्ष एकाग्र होण्यासाठी मदत होते.

वाचन व लेखन असा मिश्र अभ्यास असेल तर पेंगायला होत नाही. म्हणून गरज नसली तरी नोट्स काढणे, समरी चीटशीट तयार करणे अशी काही लिखाणाची कामे करू शकता. लिहीलेल्या गोष्टी जास्त लक्षात रहातात.

दिवसाचा काही भाग मन रमवायला ठेवा. तुम्हाला कुठले वाद्य वाजवायची आवड असेल, मैदानावर जाऊन फुटबाॅल खेळायला आवडत असेल - असे काहीतरी करायला दिवसाचा काही वेळ ठेवा.

योग्य प्रमाणात सौम्य जेवा. तुम्हाला उर्जेची भरपूर गरज असते, पण सुस्ती येऊन चालत नाही. अती मसालेदार न खाल्लेले बरे असे वाटते.

काही सुचले ते लिहीले. पण शेवटी आपण स्वत:ला ओळखतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते.
उत्तर लिहिले · 27/12/2022
कर्म · 53750
0
अभ्यासाला बसताना मोबाईलचे distraction टाळण्यासाठी आणि कुटुंबाची आठवण कमी करण्यासाठी काही उपाय:

मोबाईलचे डिस्ट्रॅक्शन (Mobile Distraction) टाळण्यासाठी:

  • मोबाईल दूर ठेवा: अभ्यास करताना तुमचा मोबाईल फोन तुमच्यापासून दूर ठेवा. शक्य असल्यास तो दुसऱ्या खोलीत ठेवा.
  • नोटीफिकेशन्स बंद करा: अभ्यासाला बसण्यापूर्वी तुमच्या मोबाईल फोनच्या सर्व نوਟੀफिकेशन्स बंद करा. त्यामुळे तुम्हाला अभ्यासात व्यत्यय येणार नाही.
  • ॲप ब्लॉकर (App Blocker) वापरा: काही ॲप ब्लॉकर ॲप्स तुम्हाला विशिष्ट वेळेसाठी काही ॲप्स वापरण्यापासून रोखू शकतात.
  • ब्रेक घ्या: दर 45-50 मिनिटांनी 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या. त्या ब्रेक मध्ये तुम्ही मोबाईल वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला सतत मोबाईल वापरण्याची इच्छा होणार नाही.

कुटुंबाची आठवण कमी करण्यासाठी:

  • वेळ ठरवा: कुटुंबासोबत बोलण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवा. त्यामुळे तुम्हाला सतत त्यांची आठवण येणार नाही आणि तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल.
  • संपर्कात राहा: दिवसातून एकदा कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोला.
  • फोटो/व्हिडिओ पाहा: कुटुंबासोबतचे फोटो किंवा व्हिडिओ पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि कुटुंबाची आठवण कमी होईल.
  • ध्येयावर लक्ष केंद्रित करा: तुम्ही अभ्यास का करत आहात, हे तुमच्या ध्यानात ठेवा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि कुटुंबाची आठवण कमी होईल.

इतर उपाय:

  • अभ्यासाची जागा बदला: नेहमी एकाच जागी अभ्यास करण्याऐवजी अभ्यासाची जागा बदला. लायब्ररी किंवा शांत ठिकाणी जाऊन अभ्यास करा.
  • नियमित व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने तुमचे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.
  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने तुमची एकाग्रता वाढते.
  • ध्यान करा: रोज 10-15 मिनिटे ध्यान केल्याने तुमचे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2240

Related Questions

आशा टीपा लिहा?
माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?
सामाजिक परिपक्वता कशी निर्माण करावी?
हजरजबाबीपणा नसल्यामुळे दुसऱ्यांसमोर कमजोर ठरतो का?
आपण शिस्त का पाळत नाही?
मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?